शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:47 IST

माझं शिक्षण विचारा, एम.ए., एम.एड., नेट/सेट उत्तीर्ण, पीएच.डी. मात्र प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली विनाअनुदान महाविद्यालयात. आर्थिक संकटानं अस्वस्थ होतो मग ठरवलं आपल्याला जे आवडतं, ते करायचं.

ठळक मुद्देउत्तम स्वयंपाक करता येत होता, मग लोक काय म्हणतील याचा विचार न करता मी टिफिन सेवा सुरू केली!

 - प्रा. सोपान  दहातोंडे

‘अपना टाइम आएगा’ हा लेख वाचला आणि वाटलं की, ही तर आपलीच गोष्ट.हा असा प्रवास मीही करतोच आहे. त्या प्रय}ांबद्दल लिहितो आहे, यश-अपयशापेक्षाही हे प्रय} मला मोलाचे वाटतात. माझं शिक्षण म्हणाल तर एम.ए., एम.एड., नेट आणि सेट उत्तीर्ण, पीएच.डी. पण केलं आहे. उच्चशिक्षित म्हणताच येईल. मुळात मला  शिक्षणाची खूप आवड; पण घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शिकताना काम करणं सरावाचं होतं. दुसर्‍यांच्या शेतीत मोलमजुरी करून मी शिक्षण घेतलं. घरी शेती नव्हती. त्यामुळे आपण शिकायचं आणि शिक्षणानंच आपलं आयुष्य बदलायचं हे डोक्यात पक्कं होतं. म्हणून मग मिळेल ते काम केलं आणि शिक्षण पूर्ण केलं. 2008 साली पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. वाटलं होतं या नोकरीनंतर आपलं आयुष्यच बदलून जाईल. त्यासाठी मी रात्नंदिवस कष्ट करून खूप अभ्यास केला. प्राध्यापकपदासाठी आवश्यक असणार्‍या नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. मात्र दरम्यान, शासनाच्या आदेशामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयात नोकरी  मिळू शकली नाही. एक-दोन ठिकाणी अनुदानित महाविद्यालयात मुलाखती दिल्या तर त्या ठिकाणी नोकरीसाठी वारेमाप पैशांची मागणी करण्यात आली. परिस्थिती साधारण असल्यामुळे हे पैसे भरून नोकरी घेणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळे जेव्हा विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरी मिळाली तेव्हा जी मिळेल ती स्वीकारणं भाग होतं. एकदिवस भरतीवरील बंदी उठेल आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आपण प्राध्यापक म्हणून उत्तम काम करू हे स्वप्न मनात होतं. या भाबडय़ा आशेवरच दिवस ढकलण्याचं काम चालू होतं. नोकरी करतच होतो. लग्न झालं. पत्नी सुषमा ही एम.कॉम., बी.एड. जी.डी.सी.एण्ड ए. तिचे को-ऑपरेटिव्ह ऑडिटर लायसन्स काढलं. मात्र सहकार कायदा बदलल्यामुळे सोसायटय़ांच्या ऑडिटमध्ये अनंत अडचणी निर्माण झाल्या. माझं महाविद्यालय एमआयडीसी परिसरात असल्यामुळे आम्ही पत्नी सुषमासाठी एका सीएकडे दोन वर्षे ट्रेनिंग घेतलं. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये अकाउण्ट या पदावर ती काम करते. परिवारामध्ये निदान एका बाजूने तरी भक्कम आर्थिक आधार निर्माण झाला. मात्र मला चैन पडत नव्हतं. वाटत होतं, आपण काहीतरी करावं. मला लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड. आईला घरकामात मदत करायचो. उत्तम स्वयंपाक करता येतो. भाज्यांचे, मसाल्यांचे वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड त्यातूनच निर्माण झाली. एकदा वाटलं विनाअनुदानित महाविद्यालयाच्या या कधीही न संपणार्‍या चक्रातून  बाहेर पडायला हवं. त्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये आम्ही व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं.          एमआयडीसी परिसरामध्ये कंपन्यांचे कामगार तसंच विविध महाविद्यालये आहेत.  विद्यार्थी हा मोठा ग्राहकवर्ग तिथं उपलब्ध होता. त्यामुळे टिफिन सव्र्हिस बिजनेस सुरू करण्याचे ठरवलं. 31 डिसेंबर 2017 रोजी आरंभ केला. ‘एस. स्क्वेअर मील, अ टेस्ट ऑफ होम’ या नावाने शॉप अ‍ॅक्ट व फुड लायसन्स काढून ‘घरचा डबा’ नावानं टिफिन सेवा सुरू केली.मनात प्रश्न होतेच. सगळ्यात मोठा प्रश्न होता, लोक काय म्हणतील? एक प्राध्यापक असून, असं डबे बनवण्याचं काम करतो हे शोभतो का असं लोक म्हणतील, असं मनात येत होतंच. पण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ठरवलं आपला व्यवसाय नेमानं करायचा.   महाविद्यालयातील नोकरी सांभाळून सकाळी व संध्याकाळी दोन्हीवेळा टिफिन बनवणं/पोहोच करणं ही जबाबदारी पार पाडणं सुरू झालं. माझ्या महाविद्यालयानंही मला सहकार्य केलं आणि एक तासभर वेळ महाविद्यालय प्रशासनाने मोठय़ा मनानं  उपलब्ध करून दिला. त्यामुळे दोन्ही जबाबदार्‍या अतिशय सुव्यवस्थितपणे पार पाडता आल्या. माझी पत्नी सुषमा, आईवडील, भाचा आदित्य व मुलगी इच्छा यांचीही मदत होतीच. पोळ्या बनवण्यासाठी एक वैष्णवीताई आणि भांडी घासण्यासाठी मंगलताई मदतीला येतात. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानं आमची उमेद वाढली.  व्यवसायामुळे आमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या आम्ही सोडवू शकलो याचा आनंद आहे. या माध्यमातून भविष्यात आणखी मोठं काम करण्याचा मानस आहे. शिक्षण- पद या सार्‍याचा बाऊ न करता मी काम सुरू केलं आणि मग लक्षात आलं की, आपल्या आवडीचं काम आपल्याला समाधान देतं. उभारी देतं. आणि रडत न बसता झगडत राहण्याची जिद्दीही देतं.