शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 07:00 IST

आयआयटीमधून पासआउट मेकॅनिकल इंजिनिअर, त्यानं शहरी वाट नाकारली आणि कुपोषणमुक्तीसाठी थेट खेडय़ापाडय़ात पोहोचला!

ठळक मुद्दे कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.

- चेतन ननावरे

आयआयटी गांधीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तो उत्तीर्ण झाला. खरं तर त्याला कुठंही उत्तम पगाराची चकाचक कार्पोरेट नोकरी मिळाली असती; पण  24 वर्षाचा या तरुणानं कुपोषण या विषयात काम करायचं ठरवलं. करण पळसकर. त्याची आई अंगणवाडी सेविका. तिच्या कामाच्या निमित्तानं त्यानं गावखेडय़ातलं वास्तव अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मोठय़ा शहरात काम करण्यापेक्षा आणि तिथं समाधान शोधण्यापेक्षा खरंखुरं समाधान शोधत त्यानं खेडय़ापाडय़ाची वाट धरली.  कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.केंद्र सरकार आणि टाटा ट्रस्टने एक करार केला आहे. त्याअंतर्गत महिला व बालविकास विभागासाठी स्वस्थ भारत प्रेरक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात करण सध्या काम करतो आहे. आता राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांसोबत ग्राउण्ड लेव्हलवर काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोखरी येथील शाळेत करणनं प्राथमिक शिक्षण घेतले. करणची हुशारी पाहून तेथील शिक्षकांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी येथील जवाहर नवोदय विद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. इथंच करणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हुशार असल्यानं त्यानं आयआयटी गांधीनगर्पयतचा प्रवास सहज केला. तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पदवी प्रशिक्षण घेताना करणला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. या महाविद्यालयात औपचारिक शिक्षण सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी विद्याथ्र्याना डेव्हलपमेंटल स्टडीज आणि ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी हे विषय शिकावे लागतात. या विषयांच्या माध्यमातून करणने गुजरात सरकारसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर दोन महिने काम केलं. हा अनुभव करणसाठी मोलाचा होता. त्या काळात करण यूपीएससीची तयारीही करत होता. याच काळात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या उपक्रमात स्वस्थ भारत प्रेरक म्हणून कुपोषणमुक्तीसाठी काम करण्याची संधी चालून आली. याआधी आईसोबत कुपोषणमुक्तीवर चर्चा करणार्‍या करणला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कुपोषणमुक्तीचं काम करण्याची संधी मिळाली. मनुष्यबळाच्या मदतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कुपोषणमुक्तीचं ध्येय लवकर साध्य करता येईल असं करण नेहमी आईला सांगायचा. आज हीच वाक्य खरी करून दाखवण्याची किमया करण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीवर तो सरकारसोबत काम करत आहे. जिल्हास्तरावरील माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना संकलित करून देणं, शासनाच्या निधी सोबतच  लोकसहभागातून कुपोषणमुक्तीसाठी  प्रयत्न करणं असं त्याच्या कामाचं स्वरूप आहे.  गेल्या सात महिन्यांपासून ग्रामीण भागात काम करत असताना आपल्या शहरी मित्रांचीही त्याला मोठी मदत होत आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं ध्येयही त्याच्यासोबत आहेच. मात्र प्रत्यक्ष गावपातळीवर काम करण्याचा अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करतोय असं तो सांगतो!