टेक क्रांतीत पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 06:00 IST2017-09-28T06:00:00+5:302017-09-28T06:00:00+5:30

डिजिटल क्रांती + सोशल मीडिया यांच्या मदतीने येत्या काळात लवकरच काय काय बदलेल याची ही एक झलक.

What's next in the tech revolution? | टेक क्रांतीत पुढे काय?

टेक क्रांतीत पुढे काय?

डिजिटल क्रांती + सोशल मीडिया यांच्या मदतीने येत्या काळात लवकरच काय काय बदलेल याची ही एक झलक.

जाहिरात चकटफू
सोशल मीडिया वापरून आपण आपल्या कामाची, वस्तू, उत्पादन, सेवेची जाहिरात स्वत:च करू शकतो. अलीकडेच झालेला एक अभ्यास सांगतो की, ८६ टक्के ग्राहक आता जुन्या पारंपरिक जाहिरात प्रकार अथवा माध्यमांवर विश्वास ठेवत नाहीत. सोशल मीडियातल्या गोष्टींना पर्सनल टच असल्यानं तिथली माहिती अधिक खरी वाटते. आजच्या घडीला जगातली ३९ टक्के जनता सोशल मीडियात लाइव्ह माहिती टाकत असते. त्यांच्यापर्यंत थेट फुकट पोहचण्याचं माध्यम आपल्या हाती आहे हे विसरायचं नाही.

सीएक्स आणि इएक्स
कन्झ्युमर एक्सपिरिअन्स आणि यूजर एक्सपिरिअन्स असे हे दोन शब्द. तसा या शब्दांत फार फरक नाही. अगदी सूक्ष्मभेद आहे. पण नव्या काळात हा यूजर एक्सपिरिअन्स महत्त्वाचा. आपणही तेच करत असतो. अनेकदा आपण नेटवर माहिती वाचत असतो आणि जाहिराती येतात. त्यांना म्हणतात बॅनर अ‍ॅड्स. त्या आपण वाचतच नाही. ५४ टक्के यूूजर्स त्या बॅनर अ‍ॅड्स पाहतच नाही असं अभ्यास सांगतात. पण मग ते काय वाचतात, सोशल मीडियात तरी एखाद्याचा वस्तू अगर सेवा वापराचा अनुभव वाचतात. त्यामुळे आपण घरबसल्या आपल्या वस्तू वा सेवेची माहिती अशी यूजरला देऊ शकतो. आपण घरबसल्या आपला बिझनेस वाढवू शकतो.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी
हे प्रकरण फार दूर नाही. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसाठीचे विशिष्ट हेडसेट लावून आपण अवतीभोवतीचा सारा माहौलच अनुभवू शकतो. लवकरच हे सारं आपल्या टप्प्यात असेल. स्टॅटिस्टा डॉट कॉमच्या अंदाजानुसार २०१८ पर्यंत जगभरात १७ कोटींहून अधिक लोक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतील.

इमेज मेसेजिंग
आपण हल्ली मेसेज पाठवतो, इमेज फॉरवर्ड करतो. येत्या काळात येइल इमेज मेसेजिंग. म्हणजे काय तर लिहिण्यापेक्षा आपण सरळ फोटो काढून पाठवू. आजही काही सोशल मीडिया साइट्स इमेज मेसेजिंग करू देतातच. पण येत्या काळात त्याचं प्रमाण वाढेल.

व्हिज्युअल सर्च

आपण आता गूगलवर माहिती शोधतो. पुढे फोटो आणि व्हिडीओच जास्त शोधू. त्याला म्हणायचं व्हिज्युअल सर्च. त्या सर्चमध्ये आपले फोटो आणि व्हिडीओ यावेत याचा विचार आजच करावा लागेल.

व्हाइस सर्च
म्हणजे आवाजाचा सर्च. म्युझिकच्या जगासह अन्य ऐकण्याच्या गोष्टींसाठी हे व्हाइस सर्च वापरले जातील. रेकॉर्ड करणं वाढेल. आणि ऐकणंही.

Web Title: What's next in the tech revolution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.