शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

स्कोपच नाही तर इंजिनिअर्स करतील काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:01 PM

स्पर्धा परीक्षाच द्यायच्या होत्या तर मग इंजिनिअर का झालात? या प्रश्नाचं उत्तर ग्रामीण-शहरी वादात नाही तर व्यवस्थेत आहे.

ठळक मुद्दे... तरच व्यावसायिक शिक्षण घेतलेले त्या क्षेत्नाकडे आकर्षित होतील . 

जयप्रकाश संचेती 

स्पर्धा परीक्षाच द्यायच्या होत्या तर मग इंजिनिअर का झालात? हा प्रवीण घोडेस्वार यांचा लेख (लोकमत ऑक्सिजन, 25 जून 2क्2क्) वाचला.अभियंते प्रशासकीय सेवेकडे का वळत आहेत याचं उत्तर प्रशासकीय सेवेच्या तुलनेत अभियांत्निकी सेवेची जी अवहेलना सरकारकडून होतेय त्यात आहे.पदवीधर अभियंत्यांची एमपीएससीद्वारे सहायक अभियंता (श्रेणी 2), सहायक अभियंता (श्रेणी 1) आणि सहायक कार्यकारी अभियंता अशी त्रिस्तरीय नेमणूक होते. सहायक अभियंता (श्रेणी 2)  या पदाचं वेतन नायब तहसीलदार समकक्ष आहे. शिवाय 25/30 र्वष पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.सहायक अभियंता (श्रेणी 1) या पदाचे वेतन उपजिल्हाधिकारी समकक्ष असते आणि एक पदोन्नती घेऊन ते कार्यकारी अभियंता पदावर निवृत्त होतात. या उलट सरळसेवा भरतीतील उपजिल्हाधिकारी 15 वर्षाच्या सेवेनंतर आयएएसमध्ये नॉमिनेट होतात.अशा परिस्थितीमध्ये चांगल्या उन्नतीसाठी (बेटर प्रॉस्पेक्ट)साठी अभियंत्यांनी  प्रशासकीय सेवेकडे का वळू नये? सहायक कार्यकारी अभियंतापदावर नियुक्ती  होते, यातील बहुतांश अभियंते एक पदोन्नती घेऊन अधीक्षक अभियंतापदावर रिटायर होतात.1973 मध्ये स्व. वसंतराव दादा मुख्यमंत्नी असताना जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवपदी अभियंता नियुक्त करण्यात आले; परंतु स्वत: अभियंता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 2क्12/13 मध्ये या विभागातील अभियंता सचिव हटवून आयएएस सचिव आणले. अधीक्षक अभियंता हे एकेकाळी आयुक्ताच्या समकक्ष पद होते आज ते कलेक्टरच्या जवळपास आणले आहे. अभियांत्निकीच नव्हे तर आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, प.दु.म, कृषी, विधि व न्याय, वनीकरण, शिक्षण, पोलीस, सहकार, ऊर्जा  ही तज्ज्ञ सेवा असलेले विभाग आहेत; परंतु या विभागातसुद्धा आयएएस सचिव आहेत. व्यावसायिक शिक्षण घेऊन त्या विभागातील सर्वोच्च पदांपासून वंचित राहावे लागत असेल, नेहमी प्रशासकीय सेवा ही ‘बेस्ट अमंग इक्वल्स’  हे सुनावले जात असेल, प्रशासकीय सेवेसारखी कालबद्ध पदोन्नती नसेल तर अभियंतेच नव्हे तर इतर व्यावसायिक शिक्षण घेणारे चांगल्या उन्नती  (बेटर प्रॉस्पेक्ट)साठी प्रशासकीय सेवेकडे वळले तर त्यामध्ये त्यांचा काय दोष? आयआयटी किंवा अशाच प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेतलेले अभियंते मोठय़ा प्रमाणावर प्रशासकीय सेवेकडे, संशोधनासाठी परदेशाकडे वळत आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये देशाचे नुकसान आहे हेही खरंच.हे नको असेल तर व्यावसायिक  खाते   /संशोधन संस्था / महामंडळाचे  सचिव/ अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक  त्याच  विषयातील  तज्ज्ञ  असावेत. विद्यापीठाचे कुलगुरु नियुक्तीप्रमाणो त्यांची नियुक्ती करण्यात  यावी. व्यावसायिक सेवेचा दर्जा, वेतन, सन्मान यामध्ये आकर्षक सुधारणा करणारे निर्णय शासनाने घेतले तरच व्यावसायिक शिक्षण घेतलेले त्या क्षेत्नाकडे आकर्षित होतील . 

ग्रामीण विरुद्ध शहरी आणि इतर वाद निर्माण करणं अयोग्यच कारण अभियांत्निकी आणि इतर सर्व व्यावसायिक शिक्षणांमध्ये आरक्षणाची सोय आहे. विशेष म्हणजे माङया पिढीतील बहुतांश अभियंते /डॉक्टर्स आणि उच्चशिक्षित हे दुष्काळी भागातून आलेले आहेत आणि त्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश आहे. 

कार्यकारी अभियंता ( नि) जलसंपदा, अहमदनगर