यंदा दिवाळीत काय घ्याल?
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30
दिवाळी जवळ आली की, अनेकांच्या अंगात शॉपिंग येतंच. पण बेभान होऊन शॉपिंग करण्यापेक्षा यंदाच्या दिवाळीत नेमकं काही कसं निवडाल?

यंदा दिवाळीत काय घ्याल?
>दिवाळी आता अगदी आठवडय़ावर येऊन ठेपलीये.
म्हणजे तसे हे शॉपिंग अंगात येण्याचे दिवस. घरच्यांकडे ‘अजून जास्त’ पैसे मागत आणि तरीही पुरेसे पैसे हाताशी नाहीत असंच रडगाणं गात शॉपिंग करावं लागतं.
एवढं करून दरवर्षी हरदासाची कथा मूळ पदावर येतेच. ऐन दिवाळीत इतरांच्या अंगावर भारी कपडे दिसतात आणि आपले काही फार खास आहेत असं वाटत नाही.
किंवा आपण फारच आऊट ऑफ फॅशन काहीतरी उचलून आणलं असं वाटू शकतं.
तसं व्हावं असं वाटत नसेल तर जरा होमवर्क करा!
शॉपिंगचा आणि होमवर्क?
असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, पण ते खरंय!
जर होमवर्क न करता, काहीच माहिती करून न घेता शॉपिंग केलं तर हमखास आपण काहीतरीच उचलून आणलं असं होण्याची शक्यता असते.
त्यामुळे अभ्यास महत्त्वाचा, तो विंडो शॉपिंग करूनही करता येतोच.
पण तेवढाही वेळ नसेल तर जरा चार फॅशन वेबसाईट्स पाहा, ऑनलाइन विक्री करणा:या साइट्स पाहा, अंदाज येईलच.
पण तरीही ही एक यादी.
यंदा दिवाळी शॉपिंग करताना काय घ्यायचं आणि काय नाही, याची पूर्वतयारी!
- श्रवणी बॅनर्जी
मुलींसाठी.
एथनिक स्टोल
यावर्षी सगळ्यात आधी ही एक गोष्ट तुम्ही तातडीनं घ्या. एखादा सुंदर, डिझायनर, एथनिक स्टोल तुमच्याकडे हवाच. जरा महागडा वाटला तरी चालेल, एखादा ड्रेस कमी घ्या किंवा यंदा दिवाळीत एवढा स्टोलच घ्या. कारण हा स्टोल ही तुमची इन्व्हेस्टमेण्ट आहे. त्याचे तुम्हाला उत्तम फायदे मिळू शकतात. चांगला एथनिक स्टोल असेल तर कुठल्याही साध्याशा ड्रेसचा लूक बदलू शकतो. हा स्टोल वापरल्यानं साधा ड्रेस डिझायनर लूकचा दिसेल. त्यामुळे एथनिक स्टोल, भरगच्च, स्टायलिश, ब्राईट कलरचा असा तुमच्या कपाटात हवाच.
डिझायनर साडी
दिवाळीत अनेक मुलींना साडी घेण्याची इच्छा होते. पण साडी घ्यायची कशी? पारंपरिक जरीकाठी साडय़ांची फॅशन कधी जात नाही. पण यंदा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर डिझायनर साडी घ्या. त्यातही महागडीच घ्यायला हवी असा काही नियम नाही. तुम्ही साडी स्वत: डिझाइन करू शकता किंवा विकत घेतली तर त्यातले वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता. सध्या लेहेंगा स्टाईल साडी, शेडेड साडी, हाफ साडी असे अनेक प्रकार फॅशनच्या चक्रात आहेत. यापैकी काहीही घ्या.
मात्र या सगळ्यात एक नियम चांगला अंडरलाइन करून ठेवा.
साडी कितीही चांगली, वाईट, महागडी असो नसो, तिचा सगळा लूक ब्लाऊजवर ठरतो. त्यामुळे डिझायनर, फॅशनेबल, भरजरी, स्टायलिश, जरासं हॉट ब्लाऊज एकतर रेडिमेड विकत घ्या किंवा वेळेत शिवून तरी घ्या.
तरच हे साडी प्रकरण दिवाळीत भन्नाट दिसेल!
3) फ्लोअर लेंथ अनारकली
अनारकली ड्रेसेसची फॅशन कमी झाली असं अनेकांचं मत असलं तरी तसं काही नाही. फक्त अनारकली घेताना नेहमीचे कॉमन पॅटर्न घेऊ नका. फ्लोअर लेन्थ अनारकली म्हणजेच थेट पायघोळ, जमिनीर्पयत येणारा अनारकली घ्या. त्यावर कुंदन, जरी, रेशम, जरदोसी असं नाजूक वर्क घ्या. शक्यतो खडे, मोती, टिकल्या नको. हे अनारकली फार सुंदर दिसतात.
4) डिझायनर पंजाबी ड्रेस
कुणी सांगितलं की डिझायनर पंजाबी ड्रेस महाग असतात. सध्या एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाइन शॉपिंगचा. तिथं हाफ स्टिच डिझायनर पंजाबी सूटचं कापड मिळेल ते घ्या. आणि आपल्या मापाचा ड्रेस मस्त शिवून घ्या.
5) पटियाला सलवार-कमिज
फार बजेट नसेल किंवा अगदी साधंसं नंतर डेली युजसाठी वापरता येईल असं काही घ्यायचं असेल तर मस्त पटियाला सलवार, त्यावर कॉण्ट्रस्ट कुर्ती आणि कॉटन ओढणी घ्या. परफेक्ट दिवाळी पार्टी लूक तयार.
6) मोठ्ठे कानातले
सगळ्यात महत्त्वाचं कानातले उत्तम घ्या. गळ्यात मोठ्ठालं काही घालण्याची फॅशन सध्या नाही. त्यापेक्षा मोठे, भरगच्च कानातले घाला. आठवा दीपिका पदुकोनचे कुठलेही मोठे कानातले. यंदा तसे कानातले फेस्टिव्हल लूकसाठी हवेच.
मुलांसाठी.
कफलिंक
कुर्ते, शेरवानी, जीन्स, शर्ट हे सारं तर दर दिवाळीत घेताच. यंदा पहिली खरेदी या कफलिंकची करा. कफलिंक म्हणजे खरंतर पुरुषांसाठी महत्त्वाचा दागिनाच. मस्त बाह्यांना लावता येतील असे सुंदर कफलिंक घ्या. तसेच ब्रुच छातीवर लावायला घ्या.
साध्याशा कुत्र्याचा लूकच या कफलिंकने बदलतो. कुणाला गिफ्ट द्यायलाही हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
बेल्ट
हा आणखी महत्त्वाचा मुद्दा. कपडे नवीन पण बेल्टच्या चिंधडय़ा असं अनेक तरुण मुलांचं होतं. त्यामुळे चांगला, उत्तम दर्जाचा बेल्ट यंदा दिवाळीत तातडीनं घ्या. वर्षभर आपल्याला तो वापरायचा आहे असं डोक्यात ठेवून मग बेल्ट निवडा.
शूज
तरुणांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी, सगळ्यात महागडी खरेदी. बजेट मोठं.
पण इथं कॉम्प्रमाईज करू नका. उत्तम क्वालिटीचे, चांगलेच बूट निवडा. त्यातून तुम्ही व्यायाम करत असाल, पळायला जात असाल तर बूट निवडताना चांगली पारख महत्त्वाची.
ब्रेसलेट
दिवाळीत काही खास खरेदी करायची असेल तर चांगलं ब्रेसलेट विकत घ्या. अगदी चांदीच्या कडय़ापासून काहीही.
हे ब्रेसलेट यंदा सगळ्यात जास्त फॅशनेबल ठरतंय!