शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

परीक्षेपुरतं शिक्षण, नोकरीपुरती डिग्री यापलिकडे जगण्याचं ध्येय काय? -वाचा ही 6 सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:29 IST

करिअरसाठी, जॉब्जसाठी अभ्यास तरुण मुलं करतात. ते करताना माहिती मिळते, हाताला कौशल्यही मिळतात. पण जगण्याचा, आपण जे काम करणार ते काम करण्याचा हेतू? उद्देश? पर्पज? त्याचं काय? ते कसं शोधणार?

ठळक मुद्देआपण जे काम करतो, त्याचा समाजाला उपयोग होतो का, त्यातून समाधान-आनंद मिळतो का?- विचारा स्वत:ला..

-अमृत बंग

मी गडचिरोलीलाच शिकलो. दहावीपर्यंत शाळेत गेलो नाही. बर्‍यापैकी होम-स्कूल्ड होतो. माझी एक धारणा पक्की झाली की, शिक्षण ही व्यक्तीची स्वतर्‍ची प्राथमिक जबाबदारी आहे. मला आठवतं की माझ्या बाबांनी एकदा मला एक खूप सुंदर सूत्र सांगितलं होतं. ते मला असं म्हणाले होते की, सहसा आपण म्हणतो की, वाचाल तर वाचाल, वाचणार नाही तर कसं तू परीक्षेत नापास होशील, हे होईल, ते होईल. जणू काही वाचण्यासाठी भीती हीच प्रेरणा. अपयशाची भीती आणि जर अपयशी व्हायचं नसेल तर वाचा. अशा प्रकारे आपण नेहमी वाचण्याकडे आणि शिक्षणाकडे बघतो. तर बाबा मला एकदा गमतीत म्हणाले होते की, ‘‘अरे वाच - वाच नाहीतर असाच पास होत जाशील’’. तर तो एक सुंदर मानसिक बदल होता. वाचन हे आनंददायी आणि स्वतर्‍ला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे हे तेव्हा कळलं. ती गोष्ट सगळ्याच शिक्षणाला लागू होते. मी जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो, तेव्हा मला स्वतर्‍च्या बाबतीतदेखील काही गोष्टी जाणवल्या. मला इतर अनेक तरुण मित्रमैत्रिणी जे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये होते त्यांच्याशी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्यांच्याही बाबतीत एक गोष्ट घडताना दिसली. ती काय? ती अशी की काही दुर्मीळ अपवादवगळता, आपल्याकडचं बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे मोठय़ा प्रमाणात माहिती देतं, क्वचितप्रसंगी कौशल्य देतं; पण एक गोष्ट जवळपास कधीच देत नाही ती म्हणजे हेतू किंवा पर्पज.मला मिळालेली माहिती किंवा कौशल्य (दुर्दैवाने ते कमीच मिळतं) याचा उपयोग मी कोणासाठी करू? कशासाठी करू? याचं उत्तर सहसा आपल्या नेहमीच्या शिक्षणपद्धतीमध्ये मिळत नाही. जर ते आपण स्वतर्‍हून शोधलं नाही तर मग भाडय़ाची उत्तरं मिळवली जातात. जसं की ज्या  प्लेसमेंटला, पॅकेजला, करिअर ट्रॅकला सध्या समाजात वाव आहे, तेच मी करायचं अशी एक आंधळी मनोवृत्ती बळावताना दिसते. हे माझ्या मते धोकादायक आहे. म्हणूनच मला असं वाटतं की पर्पज किंवा हेतू मिळणं हे तरुण म्हणून आपल्या जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जेव्हा तरुण मुलंमुली आपला हेतू शोधतात तेव्हा त्याच्यामुळे नेमकेपणा येतो. हे सगळं शेवटी कशासाठी, याचं उत्तर मिळायला मदत होते, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या जीवनाचं सुकाणू हे असं भरकटत नाही. सगळ्या कामाला, तयारीला एक विशिष्ट धार येते, स्पष्टता येते.माझं संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यानंतर सिमॅन्टेक नावाच्या कंपनीमध्ये काही काळ काम केलं. मजेशीर जॉब होता, भरपूर पगार होता. थोडक्यात एका अतिशय मोठय़ा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे काही अतिशय लाडावणारं वातावरण असतं, तशा प्रकारचं सगळं होतं. पण मनात प्रश्न उपस्थित झाले हे सगळं मी का करतोय? याचा उपयोग नेमका कोणाला आहे? मी समाजाला काही देणं लागतो का?समाजासाठी काहीतरी करणं ही सामाजिक संस्थांची, सामाजिक कार्यकत्र्याची जबाबदारी आहे असं सहसा आपण मानतो.  पण तसं केलं तर मी स्वतर्‍ काय करायला पाहिजे हे आपल्याला स्पष्ट होणार नाही.त्यामुळे करिअरला सुरुवात करणार्‍या, काहीतरी वेगळं करू म्हणणार्‍या तरुण मुलांशी आपल्या कामाचा पर्पज शोधताना सोबत असावे, समाजासाठी आपण काही करावं, असं वाटत असताना हे काही मुद्दे समोर असावेत.

 1. सेवा.ज्या ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही आणि ज्या ठिकाणी खासगी क्षेत्र पोहोचू इच्छीत नाही, अशा ठिकाणी जीवनावश्यक सेवा पुरवणं. उदाहरणार्थ, अतिशय दुर्गम आदिवासी भाग असेल किंवा एखादी शहरातली झोपडपट्टी असेल. खासगी क्षेत्र सहसा अशा ठिकाणी स्वतर्‍हून बरेचदा जात नाहीत कारण या काही नफा कमावण्याची संधी असलेल्या जागा नसतात. म्हणून खासगी क्षेत्राला तिथे जाण्यामध्ये नैसर्गिक रस नसतो. शासनाची ती जबाबदारी असते; पण बरेचदा शासन पोहोचूच शकत नाही कारण त्यांच्याकडे तसं मनुष्यबळ हे सापडत नाही किंवा ज्याला लास्ट मॅन डिलिव्हरी प्रॉब्लेम म्हणतात, सगळ्यात शेवटच्या क्षणाला जाऊन आणि त्या टप्प्याला जाऊन डिलिव्हरी करणं हे होत नाही. अशा ठिकाणी सेवा देणं हे सामाजिक क्षेत्राचं महत्त्वाचं काम आहे. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर बर्‍याचदा अशा लोकांच्याविषयी आपल्याला खूप छान वाटतं की ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गरजू लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे. सेवा पुरवणे ही खासगी क्षेत्राची मानसिकता आहे. सेवा करणे ही सामाजिक क्षेत्राची मानसिकता आहे. मी निव्वळ सेवा पुरवली आता तुझं काय झालं मला घेणं देणं नाही असं म्हणून सामाजिक क्षेत्राला चालणार नाही. त्या सेवेद्वारे त्या माणसाचं दुर्‍ख दूर होतंय का, हे बघणं सामाजिक क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचं असेल.2. व्यक्तींना सक्षम करणं‘एंपावर’ हा शब्दच बघा, ‘पावर’पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पावर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाहीची, संसाधन वाटपाची पावर आहे. सहसा असं दिसेल की हे दोन्ही क्षेत्रं त्या शक्तीला पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार किंवा निव्वळ ग्राहक बनून राहावं, बाकीचं आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची मानसिकता सहसा दिसते. अर्थात दुर्मीळ अपवाद आहेतच.हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणं, जेणेकरून ते स्वतर्‍ त्यांचे प्रश्न सोडवू शकतील किंवा स्वतर्‍ त्यांच्या जीवनाचा सुकाणू हातात घेऊ शकतील. अशा प्रकारचे माणसांचे सक्षमीकरण करणं. म्हणून मी परत म्हणेन की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, हे बघायला पाहिजे की माझ्या कामाच्या द्वारे मी निव्वळ परावलंबित्व पैदा करतोय की ज्या कोणासोबत काम करतोय त्यांच्यामध्ये काही आंतरिक बदल, क्षमता विकास घडवून आणतो आहे.3. नावीन्यपूर्ण प्रयोगम्हणजे आपल्या अवतीभवती जे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व तांत्रिक प्रश्न आहेत यांच्यावर नावीन्यपूर्ण उपाय काढणे, नवनवीन पायलट करणे. एक वेगळा, सर्जनात्मक आणि सृजनात्मक विचार करून आपल्या अवतीभवतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन मॉडेल किंवा पद्धत तयार करणे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये मात्र एक काळजी घ्यायला पाहिजे. जिथे आपलं भारतीय मानस मला वाटतं बर्‍याचदा आळशीपणा करतं. ते म्हणजे फार चटकन यशाचा दावा करणं. आपण थोडं काहीतरी करतो आणि लगेच त्याला हे यशस्वी मॉडेल आहे, असं म्हणून प्रस्तृत करायला जातो. ही मला असं वाटतं की एकतर पळवाट आहे आणि दुसरं म्हणजे हा बौद्धिक प्रामाणिकपणा नाही. 

4.  व्हिसल ब्लोअर समाजामध्ये जेव्हा जिथे अन्याय घडत असेल, मग तो पर्यावरणावर असेल, व्यक्तींवर असेल, प्राण्यांवर असेल, अशा अन्यायाला वाचा फोडणे आणि जागल्या म्हणून काम करणे, ही सामाजिक क्षेत्राची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आपण निदान आपल्या टप्प्यात तरी जागल्या व्हायला हवं.

5. पण मी काय करू?आपल्या समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की, मी इतरांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ही खरं तर अतिशय आशादायक गोष्ट आहे. पण ते इतर कोण? त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार? पैसे, वेळ, जेवण, कपडे देणार की अख्ख जीवन देणार? हे फरक असू शकतात. पण इतरांसाठी आपण काही करतोय असं मनात न आणता, आपल्या समाधानासाठी आणि गरजूंना मदत म्हणून त्यांच्या गरजेचं ते करायला हवं. गरज आणि गरजू यांच्यातला पूल बना.

6. मूल्य.शेवटचा मुद्दा हा मूल्यात्मक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कितीही कृती केल्या तरी त्या कृतीचा आवाका हा काही प्रमाणात का होईना मर्यादित राहणार आहे. छोटी माणसं आहोत. मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या कामातून आपण कुठली वृत्ती प्रसारित करतो हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली मूल्य कोणती, ती आपल्या कृतीतून दिसतात का, हे स्वतर्‍ला विचारणं फार महत्त्वाचं आहे.

निर्माण या  उपक्रमाचे  संचालक 

https://nirman.mkcl.org/