तरुण मुलं का म्हणतात ‘नसलं’ तरी काय बिघडतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 07:30 IST2019-09-26T07:30:00+5:302019-09-26T07:30:04+5:30
अलीकडेच गोल्डमन सॅश या ख्यातनाम संस्थेने अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणातून अमेरिकेतील मिलेनिअल्स पिढीचे प्राधान्यक्रम समोर आले आहेत. बारकाईने वाचाल तर लक्षात येईल, की भारतातल्या निदान एक विशिष्ट आर्थिक वर्गातल्या मिलेनिअल्सचं चित्र याहून फार वेगळं नाही..

तरुण मुलं का म्हणतात ‘नसलं’ तरी काय बिघडतं?
ऑक्सिजन टीम
मिलेनिअल्सच्या आई-बाबांच्या पिढीत इच्छा आणि गरजांची मोठी यादी होती. घर-गाडी-टीव्ही-फ्रीज-सोफा-वॉशिंग मशीन-गरम पाण्याचं गिझर हे सारं त्यांच्या ‘हवंच’ यादीत होतं. ते कमावलं म्हणजे आपण काहीतरी कमावलं असा त्यांचा आग्रह होता.
आता मिलेनिअल्सचं म्हणणं आहे की, हे हवंच असं काही नाही, नसलं तरी चालेल. जमलं तर घेऊ, नसलं तरी काही बिघडत नाही.
गाडी हवी; पण ‘मालकीची’ कशाला?
आपल्या दारात आपल्या मालकीची चारचाकी गाडी हवी, असं स्वपA आधीच्या पिढय़ांनी पाहिलं. मिलेनिअल्सना सुलभ प्रवासाची सोय म्हणून गाडी हवी आहे; पण ती ‘आपल्याच मालकीची’ असली पाहिजे, असा या पिढीचा हट्ट नाही.
30 टक्के मिलेनिअल्स म्हणतात, भविष्यात आम्ही कधीच गाडी घेणार नाही, त्याची गरज नाही. 25 टक्के म्हणतात, फारच गरज निर्माण झाली तर घेऊ, नाही तर नाही. 25 टक्के मिलेनिअल्ससाठी मालकीची गाडी ही प्रायॉरिटी नाही.
घर हवं; पण ‘मालकीचं’ कशाला?
49 टक्के मिलेनिअल्स म्हणतात, घर हवंच ! 30 टक्के म्हणतात, घर हवंच; पण ते मालकीचंच हवं, याची काही गरज नाही. 15 टक्के म्हणतात, कर्ज काढून भविष्यात मालकीचं घर घेण्याचा अजिबात विचार नाही.
विकत कशाला?- भाडय़ानं घ्या !
मिलेनिअल्सच्या आयुष्याचा हा जणू मूलमंत्रच आहे र् विकत कशाला, भाडय़ाने घ्या ! एखादी वस्तू, सेवा वापरायला त्यांची ना नाही; पण ती विकतच घ्यायला हवी, त्यात इमोशनल गुंतवणूक करायला हवी हे त्यांना गरजेचं वाटत नाही.
सोय हवी, मालकी नको!
चारचाकी कार, मोठं घर, लक्झरी वस्तूंचा वापर हे कुणाला नकोय? पण ते मालकीचं असावं असं (अमेरिकन) मिलेनिअल्सं म्हणत नाहीत. सव्र्हिसेस म्हणून हे सारं भाडय़ानं, तात्पुरत्या वापरासाठी घेणं, परत करणं, नवीन घेणं हे चक्र त्यांना सोयीचं वाटतं. मालकी, त्यासाठी मोठी रक्कम देणं, हे त्यांना ओझं वाटतं. लगA, मूल, स्वतर्चं घर, गाडी हे सारं त्यांच्या आयुष्यात लांबणीवर पडताना दिसतं.
‘अनुभव’ हवेत, ‘वस्तू’ नकोत!
पैसे मिळविण्यासाठी अतोनात कष्ट करून, ते साठवून मालकीच्या ‘वस्तू’ - म्हणजे घर, गाडी, दागिने जमवणं ही आधीच्या पिढय़ांच्या सुखाची व्याख्या होती. मिलेनिअल्स हे सूत्रच बदलायला निघाले आहेत. त्यांना ‘अनुभव’ घेण्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत, त्यामानाने ‘वस्तूं’चा सोस त्यांना नाही.