शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राहिलं उपाशीपोटी, त्यानं असा काय फरक पडतो?

By admin | Updated: April 8, 2017 18:37 IST

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. कॉँटिनेंटल फूड, बेकरीचे पदार्थ , हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या आहेत. टोन्ड फूड, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे अगदी रोज आपल्या वापरात येऊ लागलं आहे. प्रिझरवेटिव्हज, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला आहे. एकीकडे अन्नधान्य , भाजीपाला , फळे पिकवताना कीटकनाशक फवारे , खते यांचाही वापर खूपच जास्त झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो आहे . आम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्र ारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात . त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते, पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं फॅशन म्हणून डबा नेत नाहीत , त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात , एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !! दोन्हीही तेवढेच घातक आहेत.जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात . कमी वयात अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी , मलबद्धता अशा तक्र ारी निर्माण होतात . नोकरी करणारे लोक जर उपाशीपोटी कामावर गेले तर असे त्रास होतातच, शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं . यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही, पण तो तसा निश्चितपणे असतो .त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे .अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून , आवरून तशीच शाळेत निघून जातात. काहीही न खाता पिता !!दूध पचत नाही दुधाने मळमळ होते , पोट फुगते अशा अनेक तक्र ारी आईबाबा सांगतात . दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात . याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत ब्रेकफास्टची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात . सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरु पाची इन्फेक्शन्स, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते . त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात . सर्दी , ताप , खोकला असं सतत सुरु असतं, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी शाळेत जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी .खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला आहे, सुट्टीत खाण्यासाठी व्यविस्थत डबा घेतलेला आहे, हे आवर्जून बघायलाच हवं . शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य घरातल्या स्त्रीच्याच हातात असते, पण हे सगळं करताना आपण स्वत:देखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे .