अ‍ॅथलिजर लूक म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:39 IST2018-05-10T14:39:27+5:302018-05-10T14:39:27+5:30

जिमला जाताना घालण्याचे कपडे घालून कुणी पार्टीला जातं का? - तर जातं!

What is athletic look? | अ‍ॅथलिजर लूक म्हणजे काय?

अ‍ॅथलिजर लूक म्हणजे काय?

- श्रुती साठे 
बॉडी फिट कपडे, मोठ्ठे हिल्स हे कितीही फॅशनेबल दिसले तरी त्यांच्या स्वत:च्या काही मर्यादा आहेत. थोड्यावेळासाठी आणि कधीतरी म्हणून वापरायला हे छान वाटतात; पण रोज?
कम्फर्ट पहायला हवा. सुदैवाने आता फॅशन टेÑण्ड ठरवताना कम्फर्टला प्राधान्य दिला जाऊ लागलंय. त्यातलाच एक अ‍ॅथलेजर लूक. म्हणजेच अ‍ॅथलिट आणि लिजर लूक याचं कॉम्बिनेशन. ते सध्या हिट आहे. अतिशय भन्नाट असा हा फॅशन ट्रेण्ड. ज्यामुळे तुम्ही ट्रेण्डी तर दिसताच; पण कम्फर्टेबलसुद्धा राहता.
कपड्यांची निवड आणि त्याचा वापर यामध्ये असलेला संकुचित विचार मागे ठेवा आणि थिंक आउटसाइड द बॉक्स ! ट्रॅक सूट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मैदान, जिम किंवा जॉगिंग ट्रॅक इतकंच ! पण आता हा साचेबद्ध विचार मागे ठेवत सेलिब्रिटीज ट्रॅक सूट पार्टीसाठी, प्रवासासाठीसुद्धा वापरताना दिसतात.
ड्रेस, स्कर्ट अशा टिपिकल पार्टी लूकला बगल देत करिना कपूर एका पार्टीमध्ये चक्क एका ट्रॅकसूटमध्ये दिसली. लाल आणि पांढऱ्या कॉम्बिनेशनचा ट्रॅक सूटनं तिला एक स्पोर्टी लूक दिला.
आलिया भटही फेमिनाइन टच असलेल्या ट्रॅक सूटला पसंती देताना दिसते. तिचा टर्टल नेक आणि बॉर्डरवर फ्रील असलेला टॉप ट्रॅकसूटला एक नवीन आणि फ्रेश लूक देतो.
पुरुषांचा भर हा सहसा कम्फोर्ट क्लोदिंग वर असतो, त्यामुळे हा अ‍ॅथलिजर लूक हा त्यांच्या पथ्यावरच पडला म्हणायला हरकत नाही. अगदी क्लासिक स्टाइलच्या लाल ट्रॅकसूटला रणवीर सिंगने पसंती दिली तर वेलवेट ट्रॅकसूट निवडून रणबीर कपूरने अ‍ॅथलिजर लूक एका वेगळ्या पातळीवर नेला.
ट्रॅकसूट, मोठ्या डायलचे घड्याळ, स्पोर्ट शूज, गॉगल किंवा मोठ्या फ्रेमचा चष्मा, कॅप या गोष्टी वापरून तुम्हीसुद्धा ट्रेण्डी अ‍ॅथलिजर लूक मिळवू शकता !

sa.shruti@gmail.com
 

Web Title: What is athletic look?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.