आम्ही नावडतेच!

By admin | Published: October 9, 2014 06:45 PM2014-10-09T18:45:44+5:302014-10-09T18:45:44+5:30

गावाकडे चला, असं दुसर्‍याला सांगणं सोप्पंय हो, पण त्या गावात जगण्याला वाढ नाही, हे कसं दिसत नाही कुणाला.?

We dislike! | आम्ही नावडतेच!

आम्ही नावडतेच!

Next
>पुरुषोत्तम करतोय यार’. नावाचा लेख वाचला आणि हेवाच वाटला या तरुण मुलांच्या नशिबाचा.
हो, नशिबाचाच. ते पुण्यात राहतात, तिथं असं काहीतरी घडतंय. आम्ही राहतो तिथं काय घडतं कॉलेजात.
काहीच नाही.
आमच्या कॉलेजात ना नाटकं होतात ना एकांकिका, ना लायब्ररी आहेत ना असे काही एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटी. (शिक्षणाच्या दर्जाबद्दल मी बोलतच नाही.)
आम्ही फक्त कॉलेजात जातो, घरी येतो. शिकायचं म्हणून शिकतो. डिग्य्रा घेतो. त्याचा काय उपयोग नव्या जगात, आम्हाला माहितीच नाही.
म्हणून मी नशीब म्हणतो, माझ्यासारख्या मुलांच्या नशिबात असं हॅपनिंग कॉलेज का नाही?
का नाही अशी मज्जा? का नाही ही मेहनत, हे नवेपण, ही क्रिएटिव्हिटी, ही स्पर्धा.
आम्ही एका कोपर्‍यात फेकून दिल्यासारखेच का आहोत.
आम्ही नावडतीची मुलं आहोत का?
तो लेख वाचून मला वाटलं की, मी आईबाबांना छळून पुण्या-मुंबईला शिकायला गेलो असतो तर.?
तर कदाचित मी जास्त काहीतरी चांगलं शिकलो असतो.
पण या जरतरला काही अर्थ नाही, आम्ही जगण्याच्या प्रवासात मागेच राहून गेलेलो आहोत हे नक्की.
गावाकडे चला, असं दुसर्‍याला सांगणं सोपंय हो, पण त्या गावात जगण्याला वाढ नाही, हे कसं दिसत नाही कुणाला.?
- आनंद, वडगाव

Web Title: We dislike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.