शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सावध : ब्लू व्हेल गेम टाकतोय तरुणांवर मरणाचं जाळं !

By अोंकार करंबेळकर | Published: August 01, 2017 1:18 PM

एक खेळ मुलांना आव्हान देतो, 50 साहसी गोष्टी करण्याचं, स्वतर्ला सिद्ध करुन दाखवण्याचं आणि मग म्हणतो, आता मरुन दाखवा. साहस करण्याच्या नादात 100 हून अधिक मुलं मग मरुनही दाखवतात. कालच भारतातही एक तरुण याला बळी पडला.

ठळक मुद्देजगभरातल्या अनेक देशांत थैमान घालणारं एक गेमिंग अ‍ॅप; त्यानं भारतातही एक बळी घेतलाच.ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर् 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात.या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते. शेवटी खेळणार्याल आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही!

सगळ्य़ा रशियाचा आणि त्याच्या शेजारील काही देशांचा ब्लू व्हेल नावाच्या एका इंटरनेट गेमने काळजीने थरकाप उडवला आहे. ब्लू व्हेल हा अशा प्रकारचा एकमेव खेळ नसून द सायलेंट हाऊस, द सी ऑफ व्हेल, वेक मी अप अ‍ॅट टू फोर्टी असेही विचित्र खेळ इंटरनेटवर खेळले जातात. सध्या मात्र या ब्लू व्हेलने अनेक पालकांची झोप उडवली आहे. आणि वाईट असं की, भारतातही या गेमनं काल एका 14 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला.

तसं पाहायला गेलं तर रोज नवा गेम इंटरनेटवर येत असतो.  मुलं सहज ते खेळायला लागतात. हे खेळ तसेही कुणी कुणाला शिकवत नाही. थेट खेळायला सुरु करुनच गेमचे नियम आत्मसात करत असतात.पण ब्लू व्हेलने मात्र सार्‍यावर कडी केली.  रशियात खळबळ माजवली.वरवर इतर गेम्ससारखे नाव असेलेल्या या खेळामुळे आतार्पयत 130 मुलांचे प्राण गेले आहेत. काही ब्लू व्हेल स्वतर्‍चा अंतकाळ जवळ आला की आधीच किनार्‍याकडे जातात आणि जीवन संपवतात. या त्यांच्या पद्धतीवरुन आत्महत्या घडवणार्‍या या खेळाचं नाव ब्लू व्हेल पडलं.

हा गेम खेळता खेळता मुलांनी आत्महत्याच केली तेव्हा पालक धास्तावले. मीडीयात बातम्या फुटल्या. जगभर त्यासंदर्भातला मजकूर व्हायरल झाला. मात्र जेव्हा आत्महत्या करणार्‍या मुला-मुलींचं सोशल मीडियावरील प्रोफाईल तपासलं गेलं तेव्हा कळलं की नुस्तं त्या एका गेमला दोष देवून नाही चालणार. स्वतर्‍ला संपवणार्‍या या मुलांपैकी बहुतांश मुलं ही आधीपासूनच एकटी, एकलकोंडी आणि कसल्याशा तणावात होती. या मुलामुलींनी आपापल्या प्रोफाईलवर निराश, उदास, डिप्रेस्ट मजकूर अनेकदा पोस्ट केले होते. कित्येकांनी तसे सूचक फोटोही बर्‍याचवेळेस टाकले होते. म्हणजे जे मुळात डिप्रेस्ट होते त्यांना या खेळानं एक आव्हान दिलं. करुन दाखवण्याचं आणि मरुन दाखवण्याचंही. आज हा खेळ रशियासह आजूबाजूच्या देशांमध्येही वेगाने पसरू लागला. इंग्लंडने हा धोका ओळखून पालकांनी, मुलांनी काय खबरदारी घ्यावी याची नियमावली प्रसिद्ध केली. मात्र तरीही जगभरातल्या सर्व देशांत या गेमचं दहशत सावट आहेच.

   अर्थात हे आजचं घडतं आहे असं नव्हे.

2015 साली चार्ली चार्ली चॅलेंज नावानेही एक गेम प्रसिद्ध झाला होता. यामध्ये आत्म्यांशी किंवा दुष्ट अद्भूत शक्तींची भेट घालून देण्याचे आश्वासन या खेळाच्या अ‍ॅडमिननं दिलं होतं. मध्यपुर्वेतील अनेक तरुणांना या खेळानं वेडं केलं. पोलिसांना शेवटी प्रत्येक कॉलेजमध्ये समुपदेशनाचे वर्ग आयोजित करुन जागृती करावी लागली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता ब्लू व्हेलच्या निमित्तानं होताना दिसत आहे.

बहुतांश मुलांनावाटतं की आपण गेमिंग एक्सपर्ट आहोत. आपल्याला गेम्स, कम्प्युटर,टेकAॉलॉजी यातलं सारं कळतं. आपलं काही चुकूच शकत नाही.मात्र ब्लू व्हेलसारखे खेळ मानसिकदृष्टय़ा खचलेल्या लोकांना हेरुन त्यांना जाळ्य़ात पकडतात. त्यांना आव्हान देतात. फशी पाडतात. आणि असे एक ना दोन शंभराहून अधिक मुलांचे प्राण त्यात जातात. तेव्हा आपला  स्मार्ट फोन हातात घेताना त्यावर किंवा टॅब, कम्प्युटरवर कुठलाही गेम खेळताना जरा सावध, कुणी तुम्हाला आत्महत्या करायलाही सांगू शकतं.

ब्लू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?

 

या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर्‍ 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते.  शेवटी खेळणार्‍याल आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही!

या गेममध्ये होतं काय की  सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतर्‍ला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.

सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उडय़ा मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

मुलांचा गेम होतो, पालकांना कळतही नाही!

ब्लू व्हेल खेळाचा प्रसार रशियामध्ये मोठय़ा प्रमाणात झाला. भारतामध्ये अजून त्याबाबत कोणताही शिरकाव झाल्याचे वृत्त नाही. असे खेळ अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आणि आकर्षक असतात त्यामुळे त्यांचा धोकाही तितकाच जास्त असतो. आपली मुलं  इंटरनेटवर काय करतात याकडे पालकांचं लक्ष असलंच पाहिजे. खेळाबाबत जे रिव्ह्यू असतात ते वाचून समजून त्यातील धोक्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.  नाहीतर मुलं काय खेळतात, पालकांना माहितीच नसतं, आणि चुकतं ते इथंच!

सुमित राठोड, गेम अ‍ॅडव्हायजर, रिस्पॉन्सिबल नेटिझम.

प्रायव्हसीच्या नावाखाली दारं बंद करु नका!

ब्लू व्हेलसारखे खेळ म्हणजे थेट जिवाशीच खेळ म्हटलं पाहिजे. मुलांना आपल्या आय़ुष्यामध्ये थ्रिल हवं असतं. या थ्रिलच्यापोटी ते इकडेतिकडे सतत काहीतरी शोधत असतात, या प्रवासात ब्लू व्हेलसारखा खेळ हाती लागला तर फारच वाईट म्हणावं लागेल. प्रत्येक गोष्ट सहजसोपी आहे असं मुलांना वाटत असतं मग याच भावनेतून ते पुढेपुढे जात राहतात. आणि तितकेच अडकत जातात. पीअर प्रेशर किंवा मित्रांकडून येणारा दबाव जसा नकारात्मक असतो तसा सकारात्मकही असतो. त्याचा येथे वापर करता येईल. आपल्यापैकी एखादा मुलगा खिन्न आहे, त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत, तो सोशल मीडियावर नेहमी दुर्‍ख प्रकट करतो, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये नेहमी नकारात्मक विचार येत असतील तर मित्रांनी ते वेळीच ओळखायला हवं. त्याच्या नकारात्मक विचारांचं कारण विचारायला हवं, त्याला योग्य ती मदत करणार्‍या व्यक्तीकडे पोहोचवायला हवं. ब्लू व्हेलसारखा खेळ कोणी खेळत असेल तर त्याला वेळी थांबवून चांगल्या मार्गावर आणण्याचं कामही मित्र करु शकतात. मित्रांप्रमाणे दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पालक. पालकांनी आपली मुले इंटरनेटवर काय करतात याचा अभ्यास करायला हवा. प्रायव्हसीच्या नावाखाली दार बंद करुन इंटरनेटवर याप्रकारे खेळ खेळले जाणार असतील तर ही वेळ गांभीर्याने विचार करण्याची आहे. पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे, संवाद वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.

-डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ