शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

आगंतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:19 IST

वरुणला भेटायला रोज एक मुलगी येते. पण तो घरी नसताना. ती कोण? कुणालाच माहिती नाही. का येते, ते ही माहिती नाही. मग का येते ती? रोज?

- माधुरी पेठकरशिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्तानं एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणं, परदेशात जाणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. पण त्यातून एकटेपणासारखी गंभीर समस्याही निर्माण झाली आहे. छोट्या-मोठ्या शहरात अनेक घरात हा एकटेपणा पाहायला मिळतो. मुलं-मुली शिकण्यासाठी, नोकरीसाठी बाहेर पडली की घरात आई बाबा एकटेच राहतात. अनेक घरात तर फक्त आई किंवा फक्त बाबा असंही चित्रं पाहावयास मिळतं. एमटी नेस्टर्स असं त्याविषयी म्हटलं जातं.परिस्थितीच्या अपरिहार्यतेतून आलेला एकटेपणा स्वीकारला जातो. पण या एकटेपणासोबत डील करताना मात्र आणखी नवीनच समस्या निर्माण होऊ शकतात. ‘ड्युएल पर्सनालिटी’सारख्या स्वत:साठी आणि इतरांसाठी त्रासदायक ठरू शकणाºया समस्याही निर्माण होऊ शकतात. ‘आगंतुक’ या वीस मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये एकटेपणा भेटतो तो असा. रहस्य आणि नाट्याच्या वळणातून शहरी भागात अनेक घरात असलेला एकटेपणा ‘आगंतुक’ या शॉर्टफिल्ममध्ये भेटतो आणि अस्वस्थ करून जातो.ही गोष्ट पुण्यातली. (खरंतर ती कोणत्याही छोट्या-मोठ्या शहरातली असू शकते.) वरुण नावाचा तरुण मुलगा. पुण्यात नोकरीनिमित्तानं येतो. परदेशात असलेल्या आपल्या मावशीच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये काही दिवसांसाठी राहायला येतो. ज्या फ्लॅटमध्ये वरुण राहायला आलेला असतो त्याच मजल्यावर शेजारच्या फ्लॅटमध्ये मावशीची एक मैत्रीण राहत असते. तिची मुख्य ओळख म्हणजे एकट्या राहणाºया काकू. मुलगी अमेरिकेत असल्यानं त्या काकू एकट्याच राहत असतात. घरात एकट्या. त्या इमारतीच्या मजल्यावरही एकट्या. कोणाशीतरी बोलण्यासाठी आसुसलेल्या. वरुणच्या निमित्तानं काकूंना तशी संधी मिळते. पण वरुण मात्र कामाशी काम ठेवणारा बिझी बॉय. काकूंचं बदाबदा बोलणं, नको इतकी काळजी करणं, न मागता मदत देणं या गोष्टी वरुणला अगदीच त्रासदायक वाटतात. त्यामुळे वरुण कायम काकूंना टाळण्याच्याच बेतात असतो.पण एकट्या असलेल्या काकू. येता जाता आपल्या दाराच्या आय होलमधून बघतात. मजल्यावर येणाºया-जाणाºयांचा अंदाज घेतात. या सवयीमुळे काकूंच्या एक गोष्ट लक्षात येते. वरुण घरी नसताना कोणीतरी एक तरुण मुलगी येते. वरुणच्या फ्लॅटला कुलूप बघून निघून जाते. वरुण संध्याकाळी घरी आल्यावर काकू वरुणला तो निरोप देतात. पहिल्यांदा वरुणला वाटत असेल कोणीतरी. तो काकूंचा निरोप फारसा मनावर घेत नाही. पण दुसºया, तिसºया , चौथ्या, पाचव्या दिवशी तसंच. वरुण पेचात पडतो. शेवटी आपल्या फ्लॅटच्या बाहेरच्या भिंतीवर आपल्यामागे येणाºया त्या आगंतुक मुलीसाठी आपला मोबाइल नंबर लिहिलेली चिठ्ठी सोडून जातो. पण त्यादिवशीही काकूंच्या सांगण्याप्रमाणे ती मुलगी येते. कुलूप पाहून निघून जाते. कोण, कुठली, कशासाठी येते काही निरोप नाही. वरुणनं लिहिलेल्या नंबरवर साधा फोनही नाही. वरुण वैतागतो. सट्टी घेऊन घरी थांबतो. सगळ्या जवळच्या मैत्रिणींना फोन करतो. मैत्रिणींपैकीच कोणी आलं का यासाठी चौकशा करतो. आई लग्नासाठी मुली पाहते आहे. कदाचित आईनंच एखादी मुलगी पाठवलेली नसेल ना या शंकेपोटी आईलाही फोन होतो. पण सगळीकडून नकारच. बरं त्यादिवशी संपूर्ण दिवस घरी राहूनही त्या मुलीची काही खबरच नाही. वरुणचं मुलीविषयीचं कोडं सुटता सुटत नाही.दुसºया दिवशी वरुण आॅफिसला गेल्यावर मात्र ती तरुण मुलगी हजर. शेवटी काकू वैतागतात. वरुण असताना येण्याचा आग्रह करतात. तिच्या अशा वागण्यानं आपण वरुणसमोर खोटं ठरू अशी मनातली भीतीही व्यक्त करतात.वरुणसोबत प्रेक्षकांनाही कोडं पडतं. कोण ही मुलगी. काकूंनाच का दिसते. प्रेक्षकांसमोरही ती पाठमोरीच का? ती एका शब्दानंही का बोलत नाही? हे असं का?पण एक दिवस हे कोड सुटतं. पण फक्त प्रेक्षकांपुरतं. हे कोडं सोडवते ती वरुणच्या घरी काम करणारी मावशी. तिच्या नजरेतून ‘कोण ती मुलगी?’चा पेच सुटतो. पण हे रहस्य मावशी स्वत:जवळच ठेवतात. वरुणला काही सांगतच नाही. प्रेक्षकांपुरती सुटलेलं कोडं वरुणसमोर आणखीनच गहिरं होतं. ‘कोण ती मुलगी?’ हा प्रश्न वरुणला झपाटून टाकतो.एमआयटी कॉलेज, पुणे येथे डिझायनिंगचं शिक्षण घेणाºया स्वरूपा सानपनं ही फिल्म बनवली. लहानपणापासूनचं एक निरिक्षण तिच्या मनात घर करून बसलेलं. घरी काम करायला येणाºया मावशी. खरंतर किती घरात जातात. कळत नकळत त्यांना अनेक घरातल्या अनेक गोष्टी, अनेक नाट्य, अनेक रहस्यं माहिती असतात. पण त्या सांगत मात्र नाही. आईच्या पाठीमागे स्वरूपा आणि तिच्या भावामध्ये होणाºया अनेक छोट्या मोठ्या भांडणाच्या त्यांच्याकडे काम करणाºया मावशी साक्षीदार असतात. कधी कधी मध्यस्थही. पण मावशींनी कधी आईपर्यंत ती भांडणं पोहोचवलेली नसतात. मावशीच्या या स्वभावाचं स्वरूपाला मोठं कुतुहल.डिझायनिंगचं शिक्षण घेताना सूचलं ते लिहून काढण्याची एक चांगली सवय स्वरूपाला लागली. एकदा स्वरूपाच्या डोक्यात एक कन्सेप्ट आली. एक कामवाल्या मावशी, कामाला जातात. दाराला कुलूप, मावशींना काहीतरी कळत. ही ती कन्सेप्ट. तिनं डायरीत लिहून काढली. स्वरूपानं मग त्याभोवती एक गोष्ट रचली. आणि आपल्या माहितीतल्या माणसांचा आधार घेत तिनं ती शॉर्टफिल्म स्वरूपात मांडली. रहस्य आणि नाट्य यांचा मेळ घालून स्वरूपानं ही एकटेपणाची गोष्ट रंगवून मांडली. आणि म्हणूनच ‘आगंतुक’ पाहाताना वरुणसोबत काहीवेळ प्रेक्षकही अस्वस्थ होतात, वैतागतात. फिल्ममधल्या मावशींप्रमाणे प्रेक्षकांनाही धक्का बसतोच. पण शेवटी प्रेक्षकही फिल्ममधल्या आणि स्वरूपाच्या आठवणींमधल्या मावशींप्रमाणे ‘सायलेन्ट स्पेक्टॅटर’ (मूक प्रेक्षक) बनतात. वरुणचं कोडं सोडवायला त्याच्या मदतीला कोणीच येत नाही.ते रहस्य नेमकं काय हे पहायचं तर ही घ्या लिंक..https://youtu.be/Vnguvdz09WQ

( madhuripethkar29@gmail.com )