व्हिरीओलॉजिस्ट - व्हायरल इन्फेक्शनवर संशोधन करतं कोण?
By Admin | Updated: May 30, 2014 10:58 IST2014-05-30T10:58:59+5:302014-05-30T10:58:59+5:30
व्हिरीऑलॉजिस्ट. हा शब्द गेलाय कधी कानावरून? ऐकलंय कधी की या स्वरूपाचं काही काम असतं जगाच्या पाठीवर?

व्हिरीओलॉजिस्ट - व्हायरल इन्फेक्शनवर संशोधन करतं कोण?
>मूलभूत संशोधनाची एक खास वाट.
व्हिरीऑलॉजिस्ट.
हा शब्द गेलाय कधी कानावरून?
ऐकलंय कधी की या स्वरूपाचं काही काम असतं जगाच्या पाठीवर?
नसेल ऐकलं, पण या कामाविषयी मात्र आपण सतत बोलत असतो.?
‘व्हायरस’ हा शब्द तर आपण सगळ्यांनीच ऐकलेला आहे. ‘व्हायरल इन्फेक्शन’ झालंय, त्यावर काही औषधच नाही हे तर आपलं नेहमीचंच रडगाणं.
त्या ‘व्हायरस’चा म्हणजेच विषाणूचा आणि विषाणूसारख्या घटकांचा अभ्यास, त्यांची वर्गवारी, त्यांच्यातला रचनाबदल, त्यांचं पुनरुत्पादन, त्यांच्यामुळे होणारं इन्फेक्शन, मानवी पेशींवर होणारे हल्ले, त्यातून होणारे आजार, विषाणूंच्या वाढीची प्रक्रिया त्यातून होणारा अपाय आणि उपचार या सगळ्याचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो, त्या शाखेला ‘व्हिरिओलॉजी’ असं म्हणतात.
व्हिरिओलॉजी या शाखेचा समावेश मायक्रोबायॉलॉजी आणि पॅथॉलॉजीत केला जातो. मात्र व्हिरीओलॉजीचं मुख्य काम हे विषाणूंचं वर्गीकरण अर्थात क्लासिफिकेशन हे असतं.
प्रशिक्षण कुठे ?
१) नॅशनल स्कूल ऑफ व्हिरीओलॉजी, पुणे
(एमएस्सी-पीएचडी कोर्सेस)
http://www.niv.co.in/
२) वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट, न्यू दिल्ली
http://www.vpci.org.in/
स्कोप काय?
मूलभूत संशोधनात काम करणार्यांची संख्या आपल्याकडे तशीही कमीच आहे. त्यात नव्या काळात ‘व्हायरल इन्फेक्शन’ या विषयाला गती देण्याचं काम तमाम विकसित राष्ट्र करतील, त्यामुळे केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या कामाला स्कोप मिळू शकतो.