शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विराट कोहली?- कुठून आलं त्याच्यात हे फायटिंग स्पिरीट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 13:52 IST

आयपीएलमध्ये लागलेला बॅड बॉयचा शिक्का पुसून जगात क्रिकेटच्या सर्वप्रकारात सर्वोत्तम ठरण्यापर्यंतचा प्रवास कसा साधला असेल या दिल्लीच्या मुलाला?

ठळक मुद्देविराट म्हणतो,‘कुढण्या-रडण्याला, आक्र ोश करण्याला खेळात कुणी विचारत नाही. झडझडून उठायचं कामाला लागायचं, ढोर मेहनत करायची, जे मिळवायचं ते मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं, हाच एकमेव मार्ग. दुसरं कुणीही तुमच्या मदतीला येत नाही!’ 

- राजदीप सरदेसाई 

.त्या दिवशी घरातून निघताना मी मम्मीशीही बोललो नाही. तिलाही काहीच सांगितलं नाही. बर्‍याच वेळानं माझ्या मोठय़ा भावानं तिला विराट मॅचला गेल्याचं सांगितलं. घरात माणसांची गर्दी होती, सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला होता, कोण कुठंय, काय करतंय याचीही कुणाला शुद्ध नव्हती. आम्ही सारेच हादरलो होतो. आमच्यावर आकाश कोसळलं होतं. वडील गेले, डोळ्यांसमोर त्यांचं पार्थिव पडलेलं आहे, त्यांचा तो गतप्राण देह घरात तसाच ठेवून मुलगा मॅच खेळायला जातो हेच भयंकर भीषण वाटतं आता. आज मला त्या सार्‍याची कल्पनाही करणं अवघड आहे. त्या दिवशी मात्न मला जे योग्य वाटलं ते मी केलं.’- दुर्‍खाचं आभाळ कोसळलं तेव्हाची अवस्था विराट सांगतो. त्याचा संघसहकारी ईशान शर्मा. त्यालाही तो दिवस अजून जसाच्या तसा आठवतो. तो सांगतो, ‘विराट माझा जीवाभावाचा मित्न, मीच त्याला घ्यायला जायचो. त्या दिवशीही गेलो. तो माझ्यासोबत निघाला. कारमध्ये बसल्यावर मला सांगतो की, पापा नही रहे. मलाच कळेना, आता काय करावं. मीच सुन्न झालो. तो मात्न ठाम होता, मॅचला जायचं, खेळायचं.  डिसेंबरच्या दिल्लीतल्या गोठवून टाकणार्‍या थंडीत त्या काळरात्नीनं घाला घातला, त्या क्षणापासून हा प्रवास सुरू झाला. विराट ती भयाण रात्न अजूनही विसरू शकत नाही. वडील गेले पण आपल्या मुलानं भारतासाठी खेळावं हे स्वप्न विराटच्या स्वाधीन करून गेले! एप्रिल 2008 साली विराट अंडर 19  भारतीय संघाचा कर्णधार होता. तो विश्वचषक या तरु ण मुलांनी जिंकला. हा विश्वचषक जिंकत नाही तोच काही दिवसांनी भारतात आयपीएलचं बिगूल वाजलं. आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी कुशल आयपीएलच्या मार्केटिंगची ही नवी संधी सोडणार्‍यातले नव्हतेच. उलट भारतीय क्रि केटमधल्या गुणवान तरु ण खेळाडूंना संधीचं नवीन दालन उघडून देतोय असं म्हणत त्यांनी या ज्युनिअर खेळाडूंसाठी एक वेगळा लिलावपट मांडला. अंडर 19 च्या या कर्णधाराला रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर (आरसीबी) या संघानं विकत घेतलं. तेव्हापासूनच विराटचे आणि आरसीबीचे सूर जुळले. मात्र आयपीएलच्या त्या पहिल्याच मौसमात विराट सपशेल अपयशी ठरला. एवढय़ा मोठय़ा स्तरावर खेळताना त्याच्या बॅटच्या धावा आटल्या. त्या संघात क्रि केटचे दिग्गज महान खेळाडू खेळत होते. राहुल द्रवीड, अनील कुंबळे, दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जॅक कॅलीस, डेल स्टेन यांसारखे मातब्बर त्या संघात, ड्रेसिंग रूममध्ये, आवतीभोवती वावरत होते. दिल्लीच्या या कोवळ्या मुलाला त्या दिग्गजांसोबत वावरणं, नव्यानं लाभलेलं स्टारडम सावरणं जड जात होतं. आरसीबीचा एक ज्येष्ठ पदाधिकारी तर सांगतो, ‘विराटला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचा उद्धटपणा एकदम अंगावरच आला. अत्यंत उद्दाम आणि उद्धट मुलगा. आपण आंतररष्ट्रीय क्रि केट खेळतोय, आकाशाला हात टेकलेत अशा रु बाबात वावरायचा!’‘सिनिअर खेळाडूंसारखं’ मलाही बिझिनेस क्लासनेच प्रवास करू द्या म्हणून एकदा विराट विमानातही हटूनही बसला. हॉटेलमध्ये मोठी खोली मिळावी ही मागणीही त्यानं लावून धरली. आयपीएल म्हणजे नुसतं क्रि केट नव्हतं. क्रि केट आणि मनोरंजन यांचा तो मसाला होता, क्रि केटन्मेंट नावाचा चटकदार मसाला. त्यात चिअरलीडर होत्या, मध्यरात्न उलटून जाईर्पयत जाहिरातदारांच्या रंगीतसंगीत पाटर्य़ा रंगायच्या. पश्चिम दिल्लीतलं मध्यमवर्गीय जगणं ते आयपीएल नावाच्या झगमगत्या, चकचकीत सर्कशीतलं भयंकर उन्मादी चक्र  या भोवर्‍यात हा तरु ण अडकला. त्याच्याविषयी वावडय़ा उठायला लागल्या. त्याच्या दारू पिण्याचे किस्से आम झाले, सामन्यापूर्वी तो कसाबसा उठून येतो, त्याची झोपही पुरती होत नाही अशा बर्‍याच चर्चा राजरोस सुरू झाल्या. विराटही आता मान्य करतो की, ‘आयपीएलच्या त्या मौसमात मी अनेक गोष्टी गृहीत धरल्या, माझा फोकसच हलला होता!’या सार्‍या काळाचं वर्णन विराट ‘ड्रिपेसिंग पिरीअड’ अशा शब्दांत करतो. 2008-09 च्या या मौसमात विराट अत्यंत निराश होता. संघाचं दार उघडत नव्हतं. संधी हाताशी लागत नव्हती. अशावेळी जे करायचं असतं तेच त्यानं केलं. देशांतर्गत क्रि केटमध्ये खोर्‍यानं धावा ओढल्या, निवड समिती त्याला टाळून पुढं जाऊच शकत नाही अशा टप्प्यावर स्वतर्‍ला आणून उभं केलं. विराट म्हणतो,‘कुढण्या-रडण्याला, आक्र ोश करण्याला खेळात कुणी विचारत नाही. झडझडून उठायचं कामाला लागायचं, ढोर मेहनत करायची, जे मिळवायचं ते मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं, हाच एकमेव मार्ग. दुसरं कुणीही तुमच्या मदतीला येत नाही!’ 2012 साल अर्ध सरलं होतं त्यावेळी विराटच्या आयुष्यानं हे नवीन वळण घेतलं, बदल स्वीकारला. ऑस्ट्रेलियाचा दौरा तो बर्‍यापैकी गाजवून आला होता. पहिलंवहिलं कसोटी शतकही झळकावून झालं होतं. मात्न परत आल्यावर आयपीएलमधली कामगिरी फार कोमट झाली. विराट सांगतो, ‘मी जरा विचार केला, स्वतर्‍कडेच बारकाईनं पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तेव्हा जाणवलं की या खेळात सातत्यानं दर्जेदार कामगिरी करायची तर मला स्वतर्‍ची जीवनशैलीच बदलावी लागेल. स्वतर्‍ला शिस्त लावावी लागेल, शिस्तीत वागावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘फिट’ राहावं लागेल, शक्य तितका उत्तम अ‍ॅथलिट होण्याचा प्रय} करावाच लागेल!’ असं नुसतं वाटून किंवा ठरवून तो थांबला नाही तर आरसीबीचे स्ट्रेंथ आणि कन्डिशनिंग ट्रेनर शंकर बसू, त्यांना जाऊन भेटला. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. 2012 साली केवळ सहा महिन्यांत विराटनं आपलं वजन घटवलं. 84 किलो होतं तिथून तो 73 किलोवर पोहोचला. त्यानं ‘पिणं’ आणि सिगारेट ओढणं पूर्ण बंद केलं. लवकर झोपायला सुरुवात केली. आहाराच्या नियमांचं काटेकोर पालन सुरू केलं. बसू सांगतात, आज विराटचा फिटनेस एखाद्या ऑलिम्पियन अ‍ॅथलिट इतका किंवा ग्रॅण्ड स्लॅम विनरच्या तोडीस तोड आहे.’  

( मेहता पब्लिशिंगने प्रसिद्ध केलेल्या  राजदीप सरदेसाई  यांच्या ( अनुवाद-मेघना ढोके) "डेमोक्रसीज इलेव्हन" या  पुस्तकातल्या प्रकरणातला हा संपादित अंश संबंधितांच्या सौजन्याने!)