undone मेसी लूक
By Admin | Updated: September 19, 2014 15:06 IST2014-09-18T19:54:12+5:302014-09-19T15:06:40+5:30
एक सिम्पल लॉजिक लावा, नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ प्रकारच्या हेअरस्टाईल्स करायच्या. नऊ दिवस वेगळा लूक.
_ns.jpg)
undone मेसी लूक
>‘हटके’ हेअरस्टाईल्स कशा कराल?
एक सिम्पल लॉजिक लावा, नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ प्रकारच्या हेअरस्टाईल्स करायच्या. नऊ दिवस वेगळा लूक.
पण तो करताना तुम्हाला सध्याचा हॉट ट्रेण्ड फॉलो करायचा असेल तर मुलींनी तरी रामलीलातली दीपिका पदुकोण जशी दिसते, तसा लूक कॉपी करायला अजिबात हरकत नाही. तोच सध्याचा ट्रेण्ड आहे.
जरासे विस्कटलेले, अनडन, मेसी, वेव्ही केस. तसे तुमचेही असतील,तुम्ही दीपिकासारख्याच बारीकच असाल तर या नवरात्रीत स्वत:ला दीपिका समजायला हरकत नाही !
त्यासाठी काय करायचं?
- पारंपरिक एथनिक लूक आपला असावा असं प्लॅन करा.
- मस्त मानेवर अंबाडा बांधा. लांब केस असतील तर मोठा अंबाडा, छोटे असतील तर बुचडा बांधा. तुम्हाला एकदम ट्रॅडिशनल लूक हवा असेल तर डोक्यावरून मस्त ओढणी घेता येईल. तुमची उंची कमी असेल तर तुम्ही बिंधास्त हा लूक करा. बुचडा, त्यावरून ओढणी, मस्त दिसेल.
- तुमचे केस लांब असतील, खालच्या बाजूला वेव्ही असतील तर ते जास्त फेमिनीन आणि सुंदर दिसतील.
- गरबा खेळताना जाताना मधला भाग पाडून हेअरस्टाईल केलेली चांगली. तुमचा गोल चेहरा असेल तर मधला भांग जास्त चांगला येतो. त्यात मधल्या भागात मांग टिक्का पण लावता येतो. तो छान ट्रॅडिशनल लूक देतो.
- तुमचे लांबसडक केस असतील तर एक पोनीटेल बांधा किंवा बाजूने बटवेण्या घालून मोकळे सोडा. मात्र केस चेहर्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी प्लेटेड हेअरबॅण्ड वापरा.
- अनेकजणी जड झुमके घालतात, ते दिसतात छान पण नाचताना पडतात, हरवतात. त्यामुळे हेअरस्टाईल करतानाच कानाच्यावर घट्ट केस असावेत, म्हणजे वेल लावून कानातल्या जोडता येतात. घट्ट बसतात. कानातले पडत नाहीत, एथनिक लूक येतो तो वेगळाच.
- शीमर जेलही हेअरस्टाईलवर वापरता येईल. त्यानं केस जास्त ग्लॅमरस दिसतील.
- केस मोकळे सोडणार असाल, दीपिकावाला अनडन लूक हवा असेल तर केस स्वच्छ धुवून, ब्लो डाय करायलाच हवे. तरच ते ग्लॅमरस दिसेल.
- सागरचोटी, बटवेणी, तीपेडी, चौपेडी वेणी घालून, एका बाजूला न्यायची आणि केस मोकळे सोडायचे ही हेअरस्टाईलही दीपिकावाला लूक देईन.
-मेसी लूकसाठी केस एका बाजूला घेऊन, वेणी घालून, फीश टेल सारखं सोडणंही चांगलं दिसतं.