शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

निर्माण उत्तरं शोधणारा प्रवास

By admin | Published: January 18, 2017 6:06 PM

उत्तम पैसे मिळवून देईल, असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब...

निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल, असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
आयआयटी, आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकलेली/शिकत असलेली मुलं एकत्र जमतात ती समाजाबद्दल आणि आपल्या स्वत:बद्दलची आपली समज वाढावी म्हणून! वाचन, चर्चा, खेडोपाडी प्रत्यक्ष कामाचा अनुभव यातून पुढे सरकत सरकत ही मुलं एका वेगळ्या अनुभवाने संपन्न होतात.
 
गेल्या पाच वर्षात ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ५००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे.
या ‘निर्माणीं’शी आपल्या सगळ्यांची ‘ओळख’ व्हावी म्हणून हा एक प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू करतोय. आयडिया एकदम सोपी आहे. सर्वसंगपरित्याग किंवा सोप्या भाषेत सर्व सुखांचा त्याग वैगेरे न करता, आपलं शिक्षण - आपला जॉब याला सोडचिठ्ठी न देताही ‘अर्थपूर्ण’ आयुष्य जगण्याच्या प्रयोगात हे ‘निर्माणी’ जे शिकतात, अनुभवतात ते त्यांनी आपल्याला सांगायचं. हा संवाद सोपा - आणि थेट - व्हावा म्हणून आपण त्यांना काही प्रश्न विचारायचे.
त्यातला पहिला प्रश्न : आयुष्यात सेटल होणं म्हणजे काय?
 
आयुष्यात सेटल होणं
म्हणजे काय?
 
काहीतरी हवंय...
पण ते काय?
सेटल होणं म्हणजे स्थिरावणं (अफकोर्स!). जेव्हा आपण सेटल झालेले नसतो, तेव्हा आपण अस्थिर असतो. (मन सैरभैर धावत असतं.. माझा अनुभव.) सारखं वाटत असतं, ‘काहीतरी पाहिजे !’ ‘काय, ते माहीत नाही; पण असं काहीतरी पाहिजे, ज्यानं आपण कायमचे खूश होऊन जाऊ! त्यापुढे आपले सगळे प्रश्न कायमचे सुटलेले असतील!’
अशी प्रसन्नता आयुष्यभरासाठी मिळाली तर काही विचारायलाच नको! काय मजा येईल असं आयुष्य जगायला! ते काहीतरी मिळणं म्हणजे माझ्यासाठी आयुष्यात सेटल होणं! कबिरांच्या शब्दांत ‘उठत, बैठत कबहूं न छटै, ऐसी तारी लागी’. हे म्हणजे माझ्यासाठी आयुष्यात सेटल होणं!
टीव्हीच्या जाहिरातींमध्ये अशी प्रसन्नता खुपदा दिसते. मग ती जाहिरात कपड्याच्या साबणाची असेल, तर जाहिरातीतील स्त्री तो साबण वापरून हसतखेळत सहजतेनं कपडे धुते, आणि ते कपडे स्वच्छ धुतले जातात! ते पाहून ती बाई आणि आपणही प्रसन्न होतो! भांडी घासायच्या साबणाची अ‍ॅड असेल तर हसतखेळत भांडी घासली जातात, चकाचक होतात! अंघोळीच्या साबणाची अ‍ॅड असेल तर त्यात अंघोळ करताना काय आनंद होत असतो त्या मॉडेलला! मला लहानपणी हॉटव्हील्सच्या कार्सची अ‍ॅड पाहून त्या गाड्या आपल्याला खेळायला मिळाल्या तर आपल्यालाही तेवढाच आनंद होईल असं वाटायचं. पण प्रत्यक्षात त्या कार्स खेळायला मिळाल्या तेव्हा मात्र तेवढी मजा यायचीच नाही, आणि मग वाटायचं, ‘काय झालंय हे, आपल्याला मजा का नाही येत तेवढी’? 
टीव्हीवर दिसणाऱ्या वस्तू वापरून मला तेवढा आनंद होतच नाही, जेवढा त्या अ‍ॅडमधल्या लोकांना होत असतो! तसा झाला असता तर मी केव्हाच सेटल झाले असते! 
पण यातून मला एक हिण्ट मिळाली, की सेटल होणं म्हणजे आपली रोजची कामंही उत्साहात प्रसन्नतेनं करू शकणं. रोजचं काम रटाळ न वाटणं. असं काम करायला मिळणं जे करायला आपण उत्सुक असू, तत्पर असू, आपल्याला ते काम रोज करायला आवडेल. मजा येईल. 
मग एकदम आर्केमिडीजचा ‘युरेका युरेका’वाला आनंद आठवला. लक्षात आलं की, आपल्याला पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्यात असा आनंद सापडेल कदाचित. आणि तो तसाही सापडतच गेला. 
त्यामुळे माझ्यासाठी आयुष्यात सेटल होण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वत:ला पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं. त्यांची उत्तरं शोधणं. त्यामुळे खूप सारे ‘अहा! मोमेण्ट्स’ आता माझ्या वाट्याला येत आहेत.
कधीकधी तर काहीही न करताच एखादं सुंदर फुल, प्राणी, पक्षी (कधीकधी माणूसही!) पाहून किंवा कसंही उगाचच आपल्याला ‘अहा!’ वाटतं. ते क्षण सोडायचे नाहीत. छान अनुभवायचे! त्यावेळी आपण तात्पुरते तरी सेटल झालेले असतो.
सोबतच माझ्या लक्षात आलं की, आपल्या आयुष्यात आपण निरोगी असू, आपलं शरीर-मन एकमेकांना उत्तम साथ देत असेल, हार्मनीमध्ये असेल; आपण ज्या परिसरात राहतोय, त्या परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला छान शांत वाटत असेल तर अशा ठिकाणी, अशा परिस्थितीत, अशा वास्तवात आपल्या आयुष्याचे क्षण अनुभवताना आपण नक्कीच स्थिरावू! सुखावू! रममाण होऊ! माझ्यासाठी हेच काय ते आयुष्यात सेटल होणं!
- पल्लवी मालशे  निर्माण-५ची सदस्य असलेली
पल्लवी इंजिनिअर आहे. ती सध्या ‘दिशा फॉर व्हिक्टीम’ या संस्थेत रिसर्च, डॉक्युमेण्टेशन आणि को-आॅर्डिनेशनचं काम करते. ही संस्था अमरावतीत असून, गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठी काम करते.
... गो डिजिटल
सेटल नाही सेट होऊया!
आपले आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळेच आपल्या सेटल होण्याची वाट पाहत असतात. मला हा प्रश्न नेहमीच पडतो. मी सेटल झालो असं कधी समजू? मी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागलो तर, की मी माझ्या गरजा भागवण्याइतपत कमवायला लागलो म्हणजे मी सेटल झालो? की माझ्या आवडीचे काम करायला लागलो म्हणजे सेटल झालो? या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 
मला आयुष्यात सेटल होणे म्हणण्याऐवजी आयुष्यात सेट होणे म्हणणे अधिक योग्य वाटते. एखादा बॅट्समन जसा सुरुवातीला नवीन पीचवर सेट होतो आणि मग त्याची इनिंग बिल्ट करतो तशीच आपल्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे ही सेट होण्याची असतात. आपले शिक्षण पूर्ण झाले, आपण स्वतंत्रपणे विचार करायला शिकलो, आपल्याला पुढे काय काम करायचे आहे हे कळले (ठरवता आले) आणि त्यासाठी स्वत:ला तयार केले की आपण आयुष्यात सेट झालो. बाकी घर, गाडी इ. गरजा न संपणाऱ्या आहेत. या भौतिक निकषांवर सेटल होणं ठरवणं हे मला चुकीचं वाटतं.
- आकाश भोर निर्माण ५
 
 
का जगायचं? कसं जगायचं?
 
मला ज्या विषयात काम करायला आवडेल तो प्रश्न सापडून त्यासाठी काम करायची हिंमत/बळ अंगी यावं, ते काम करताना येणाऱ्या समस्यांना शांतपणे (थंडपणे नाही) तोंड देता यावं व त्यासाठी शक्य असेल ते करता यावं हे माझ्या दृष्टीने सेटल होणं आहे. आयुष्य जगण्याचा हेतू सापडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा आयुष्याचा हेतू म्हणजेच ‘आयुष्य का जगायचं’ याचं उत्तर सापडलं की ‘आयुष्य कसं जगायचं’ याची फार चिंता उरत नाही. आयुष्याचा हेतू सापडल्यावर त्यासाठी काम करताना स्वत:च्या गरजांची काळजी घेता यायला हवी. आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवता यावं. हे सगळं करताना त्यातून आनंददेखील मिळायला हवा, तो सर्वात महत्त्वाचा आहे. माझा या दिशेने प्रवास सुरू आहे. लवकरात लवकर मला असा आयुष्याचा हेतू मिळावा आणि सेटल होता यावं असा प्रयत्न आहे.
- शैलेश निर्माण ६
 
सेटल झालो की नाही,
हे कोण ठरवणार?
 
सेटल होणे म्हणजे फक्त आर्थिक किंवा प्रोफेशनल स्थैर्य मिळवणं नाही आणि (अगदीच लिटरली) आपल्या अंगभूत क्षमतेपेक्षा थोडं कमीजास्त मिळवून समाधानी राहणे किंवा रडत कुंथत दिवस काढणे हे पण नाही. माझ्या मते जेव्हा आपल्याला जगाबद्दल आणि स्वत:बद्दल थोडी जाण येते, त्यातून कळलेलं कर्तव्य आपण बजावणे सुरू करतो, त्यात आनंदी राहतो तेव्हा आपण सेटल असतो. मला एकदम मरेपर्यंत काय करणार, कुठे असेन हे कळलेलं नसेल तरी, आत्ता मी जे काही करत असेन ते जर माझ्या इहितकामाच्या जवळपास असेल, समाजोपयोगी असेल आणि मला समाधान देत असेल तर मी सेटल असेल. सुख हे मानण्यात आहे म्हटल्यासारखं ‘सेटल होणे’ हे जास्त मानसिक आहे. 
जागतिकीकरणानंतर जन्मलेल्या आमच्या पिढीच्या अन्न-वस्त्र-निवारा या चिंता बहुतांशी सुटलेल्या आहेत. त्यामुळे आपण विनाकारण सेटल व्हायच्या (रूढ अर्थाने, म्हणजे लग्न होऊन पुण्यात फ्लॅट, एक एसयूव्ही कार आणि बँक बॅलन्स जमवणं) मागे लागू नये असं वाटतं. कारण फक्त तेच टार्गेट करून सगळे निर्णय घेतले तर नंतर ते भेटूनही समाधान मिळेलच असं नाही. सध्या सर्वसामान्य मध्यमवर्गाला जे सेटल होणं आहे ते फक्त भौतिक आणि काहीसं फसवं आहे. हे असं सेटल व्हायची घाई करू नये आणि ते झाल्यावर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा झाल्यास त्यातून बाहेर न पडण्याची भीती बाळगू नये असे मला वाटते. शेवटी, मी सेटल आहे का हे आपणच ठरवतो. माझ्यापुरतं तरी मी सेटल आहे.
- उमेश जाधव निर्माण ५
 
खुमखुमी कसली? 
मला असं वाटतं, आयुष्याला त्या क्षणाला एक उद्दिष्ट सापडलं की त्या काळापुरतं सेटल होणं. कायमचं कोणीही सेटल होत नाही. मी कशासाठी जगावं आणि कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे सेटल होणं. (मग ते भलेही बदलेल, नोकरी बदलतो तशी.) मग त्या कशासाठी आणि कसं या प्रवासातली अस्वस्थता म्हणजे जगण्यासाठी लागणारं इंधन. (जसा उपजीविकेसाठी पैसा लागतो.) ही अस्वस्थता खर्च करून त्या उद्दिष्टांसाठी काम करत राहणे, हा माझ्या सेटल आयुष्याचा दिनक्र म/रीत असेल.
भौतिक पातळीवर माझ्या शीघ्र आणि भविष्यातील गरजा भागतील एवढा माझ्याकडे इनकम फ्लो आणि बचत असावी. आईवडिलांनी बांधलेलं घर आहे, त्यामुळे तूर्तास घराची गरज वाटत नाही. ‘माझ्या हिमतीवर बांधलेलं घर असावं’ अशी खुमखुमी अजिबात नाहीये. सुखदु:खात साथ देणारा परिवार (मित्र + नातेवाईक) असावा. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं.. या प्रवासात माझा हात धरेल, सांभाळेल, प्रेम करेल आणि आहे त्यापेक्षा जीवनातली गोडी आणि सौंदर्य वाढवेल असा जोडीदार असावा.
- अमोल शैला सुरेश निर्माण ६
 
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण
फार कठीण नाहीये. 
‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातला
पूल असेल आकाश भोर.
आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता
आणि सध्या 
तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा
त्यासाठी ई-मेल :nirman.oxygen@gmail.com
 
यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल
आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल
 
www.lokmat.com/oxygen
 
इथे!!!