आज ना मूड नाहीये बरा..
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30
खरं तर गोष्ट अगदी साधी. छोटी. पण तुमच्याविषयी ऑफिसमधले लोक त्यावरून एक मत तयार करतात. तुम्ही सकाळी ऑफिसला येताच म्हणता, मला आज काही बरं नाही. काही बरंच वाटत नाही. मूडच चांगला नाही. झोप येतेय फार

आज ना मूड नाहीये बरा..
शिष्ट-अशिष्ट
खरं तर गोष्ट अगदी साधी. छोटी.
पण तुमच्याविषयी ऑफिसमधले लोक त्यावरून एक मत तयार करतात.
तुम्ही सकाळी ऑफिसला येताच म्हणता, मला आज काही बरं नाही. काही बरंच वाटत नाही. मूडच चांगला नाही. झोप येतेय फार.
एखाद्या दिवशी ते खरंही असेल. असतंही!
पण रोज जर असं कुणी म्हणू लागलं तर त्या डल वाक्यांनी आणि बोगस मूडने बाकीच्यांच्याही उत्साहावर पाणी पडतं. नको होते ती रिपरिप. कटकट. सारखाच तो उदास टोन आणि सतत मूड नसल्याची तक्रार.
अनेकांच्या लक्षातही येत नाही पण कार्पोरेटमधे अनेक तरुण असं हमखास करतात.
विशेषत: तरुणी. लाडंलाडं करण्याच्या नादात सतत असलं काहीतरी बोलतात.
पण लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही उत्साही नाही. कामसू नाही.
सतत रडतराऊपणा करता, असा इतरांचा समज होतो आणि परिणाम म्हणून तुमची इमेज खराब तर होतेच; पण कुठलीही मोठी जबाबदारी करताना किंवा तुम्हाला नाकारताना तुम्हाला सतत बरं नसतं असं अनेकांना तोंडावर सांगितलंही जातं.
त्यामुळे आपण स्वत:विषयी काय बोलतोय, याकडे जरा लक्ष ठेवा.
- मृण्मयी सावंत