मोबाईल वॉलेटचा जमाना...
By Admin | Updated: July 25, 2016 13:21 IST2016-07-25T13:16:11+5:302016-07-25T13:21:47+5:30
मुला-मुलींना देण्यात येणाºया ‘पॉकेटमनी’ची जागाही या इंटरनेटने बळकावली. सध्या ‘सीओडी’ नंतरचा बेस्ट आॅप्शन म्हणून यंगस्टर्स या मोबाईल वॉलेट्सकडे वळतात.

मोबाईल वॉलेटचा जमाना...
>- स्नेहा मोरे
मुला-मुलींना देण्यात येणाºया ‘पॉकेटमनी’ची जागाही या इंटरनेटने बळकावली. सध्या ‘सीओडी’ नंतरचा बेस्ट आॅप्शन म्हणून यंगस्टर्स या मोबाईल वॉलेट्सकडे वळतात. म्हणजे अगदी खिशात खरंखुरं ‘वॉलेट’ नसलं तरी एखादी गोष्ट या मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून खरेदी करणं सहज शक्य झालेलं आहे.
डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमामुळे सध्या ग्रामीण आणि तालुका भागात मोबाईल वॉलेट सुविधेला चांगलीच मागणी आहे. भारतीय मोबाईल वॉलेट मार्केट फोरकास्ट अँड आॅर्पोच्युनिटीज २०२० नुसार, २०२० सालापर्यंत भारतात मोबाईल वॉलेट मार्केट ६.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर सहा व्हेंचर्सच्या अंदाजानुसार, भारतातला बाजार ११.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचेल. सध्या भारतात १३५ दक्षलक्ष लोक मोबाईल वॉलेटचा वापर करतात. पे यु मन, पे टी एम, मोबिकविक, आॅक्सिजन आणि माय मोबाईल पेमेंट्स या कंपन्या सध्या मार्केटमध्ये या सेवा देताहेत. आपला देश सध्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे, ई-कॉमर्स क्षेत्रातला ४० टक्के व्यवहार मोबाईल फोनद्वारे होत आहे. यामुळे रोजच्या काही आवश्यक खर्चांकरता आवश्यक रक्कम बाळगणे किंवा कार्ड्सचा वापर भविष्यात टाळता येईल, हे निश्चित.
मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून बारकोड आणि क्यूआरकोड टेक्नोलॉजीद्वारे बिलांची रक्कम चुकती केली जाते. या अनोख्या पद्धतीमुळे कंझ्युमरची सोय तर होतेच, शिवाय व्यवहारात सुरक्षितता आणि आश्वासकता मिळतेय. आॅफलाइन आणि आॅनलाइन अशा दोन्ही पद्धतीने याचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, याचा वापर करताना कुठल्याच कार्डाची अथवा बँक खात्याची माहिती द्यावी लागत नाही. प्रत्येक कंझ्युमर आणि उद्योजक यांना वैयक्तिक क्यूआर कोड दिला जातो. हा कोडचं त्यांची ओळख आहे, याद्वारेच व्यवहार सेक्युअर होतो. हे क्यूआर कोड ओळखण्यासाठी अॅप्समध्ये स्कॅनर बसविलेला असतो.
त्यामुळे आता घराघरांत ‘पॉकेटमनी’साठी होणारा पंगा, रागरुसवा कमी होत असून यंगस्टर्स आपापल्या ‘मोबाईल वॉलेट्स’साठी पॉइंट्स जमा करताहेत. शिवाय, यापुढे जाऊन काही उत्पादकांनी आपल्या उत्पादनांवर या मोबाइल वॉलेट्सचे प्रमोशन केल्याने सध्या हा ट्रेंड सेट होतोय.
(मुंबई आवृत्तीत उपसंपादक व वार्ताहर या पदावर आहेत)