संधी आहे, पण हुशार-प्रोफेशनल तारुण्यालाच!

By Admin | Updated: May 21, 2015 19:51 IST2015-05-21T19:51:35+5:302015-05-21T19:51:35+5:30

या सर्व शैक्षणिक संस्थाच्या वेबसाइट्स जाऊन पाहिल्या तर हे सहज लक्षात येतं की, ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रत संधी आहे,

There is a chance, but talented-professional youth! | संधी आहे, पण हुशार-प्रोफेशनल तारुण्यालाच!

संधी आहे, पण हुशार-प्रोफेशनल तारुण्यालाच!

>या सर्व शैक्षणिक संस्थाच्या वेबसाइट्स जाऊन पाहिल्या तर हे सहज लक्षात येतं की, ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रत संधी आहे, पण जे गुणवान आहेत, हुशार आहेत आणि उच्चशिक्षित आहेत त्यांनाच!
उद्योजक होण्याचं स्वप्न पहायचं तर शिक्षणाची गरज नाही, हा विचार मनातून काढून टाका!
कारण नव्या जगात टिकायचं तर उत्पादन ते मार्केटिंग ही पूर्ण प्रोसेस नीट जमली पाहिजे.
उद्योग हा प्रोफेशनली करत असतानाच सामाजिक हितही जपलं गेलं पाहिजे.
त्यामुळेच आपलं शिक्षण अर्धवट सोडून काहीतरी करू अशा उत्साहाला इथं थारा नाही.
प्रशिक्षण-कार्यक्षमता-कौशल्य यांचा संगम ज्यांना जमेल त्यांनाच या क्षेत्रत संधी आहे.!
 
नाइसबड
(http://niesbud.nic.in/)
भारत सरकारशी संलग्न असलेला हा उपक्रम. लघु आणि मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी असलेला या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते. ही मदत ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेण्ट या टप्प्यात केली जाते.
सध्या छोटे उद्योग करत असलेल्यानाही या संस्थेच्या वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकेल.
 
सीतारा
(http://www.ctara.iitb.ac.in/)
The Centre for Technology Alternatives for Rural Areas (CTARA)
 
हे आयआयटीतील एक अत्यंत प्रतिष्ठित सेंटर. देशभरातली बी. टेक झालेली मुलं या सेण्टरमध्ये एम.टेक आणि पीएच.डी. करायला येतात.
तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातलं दैनंदिन आयुष्य सोपं करून त्याचा गुणात्मक दर्जा वाढावा म्हणून नवनवीन उपकरणं विकसित करतात. ग्रामीण भागात जाऊन राहतात. प्रोजेक्ट करतात. 1985 पासून सुरू झालेलं हे सेण्टर
आता देशभरातून आलेले तरुण आयआयटीतून थेट खेडय़ापाडय़ात जातात आपल्या उपकरणांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावतात.
आयआयटी पासआउट होऊनही बडय़ा पगाराच्या शोधात अमेरिका न गाठता खेडय़ापाडय़ात जाऊन काम करणारी अनेक तरुण मुलं या सेण्टरमध्ये भेटतात.

Web Title: There is a chance, but talented-professional youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.