‘तसलं काही’ पाहताना छळणा-या 5 गोष्टी
By Admin | Updated: October 1, 2015 18:20 IST2015-10-01T18:20:52+5:302015-10-01T18:20:52+5:30
ऑक्सिजनच्या वाचक चर्चेत तरुण मुलामुलींनी मांडलेलं पोर्न अॅडिक्शनचं एक वेगळं आणि भयावह वास्तव.जगण्याला ‘बघे’पणाचा एक भयाण विळखाच!

‘तसलं काही’ पाहताना छळणा-या 5 गोष्टी
>- ऑक्सिजन टीम
ऑक्सिजनच्या वाचक चर्चेत तरुण मुलामुलींनी मांडलेलं पोर्न अॅडिक्शनचं एक वेगळं आणि भयावह वास्तव.जगण्याला ‘बघे’पणाचा एक भयाण विळखाच!
पोर्नबंदीची चर्चा सुरू होती.
व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनं आणि विरोधात जोरदार युक्तिवाद सुरू होता.
मात्र हे सारं ज्या तरुण मुलांच्या भल्याबु:यासाठी चाललं होतं, त्यांना काय वाटत होतं?
त्यांच्या आयुष्यात ‘तसलं काही’ पाहण्याचं वेड
आणि व्यसन खरंच हाताबाहेर जातंय का?
की निव्वळ थ्रिल आणि क्रेझ एवढय़ाच टप्प्यार्पयत आहे प्रकरण?
हे सारं तपासून पहायचं म्हणून
‘ऑक्सिजन’नेच वाचक चर्चा घेत आपल्या तरुण मित्रमैत्रिणींसमोर ठेवले काही प्रश्न.
त्यांनाच थेट विचारलं की,
‘तसलं काही’ तुम्ही पहाता का?
पहात असाल तर का?
त्यात थ्रिल वाटतं का?
अपराधी वाटतं का? आणि
अतिपाहण्यातून तुमच्या जगण्याचे घोळ वाढलेत का सुटलेत?
- उत्तर म्हणून आलेला पत्रंचा ढीग.
मात्र या प्रश्नांची उत्तरं तर देत होताच; पण त्यापलीकडचं एक भयाण वास्तव सांगत होता.
वेगळे जास्त जटिल प्रश्नही अधोरेखित करत होता.
ते प्रश्न मांडणारा आणि त्यांची उत्तरं शोधायला मदत करणारा हा एक विशेष अंक..
मात्र त्या पत्रत या पाच गोष्टी मात्र अधिक ठळक दिसतात.
आणि नवे प्रश्न मांडतात.
बंदी-सक्ती-संस्कार आणि संस्कृती या टोकांपलीकडे जाऊन त्या गोष्टींवर उत्तरं शोधली तर कदाचित
या तारुण्याच्या तगमगीवर काही उपाय सापडू शकतील?
अर्थात उपाय नंतर, आधी आहे ते वास्तव मान्य करण्याची धमक तरी आपल्यात आहे का?
- विचारायला हवं एकदा समाज म्हणून स्वत:ला!
1) तरुण मुलामुलींमध्ये तुफान चालतं सेक्स्टिंग.
‘तसले’ जोक्स, क्लिप्स, व्हिडीओ, फिल्म्स यांची देवाणघेवाण तर होतेच. मात्र त्यापलीकडे जाऊन सेक्स टेक्स्टिंगही चालतं. आणि ते इतकं आहे की, त्यातून अनेकांच्या मानसिक आरोग्याचेही प्रश्न निर्माण होत आहेत.
2) शहरातल्या मुलांच्या हाती मोबाइल आहेत, तेच फक्त ‘तसलं’ काही पाहतात हा समज चुकीचा. ग्रामीण भागात, खेडय़ापाडय़ातही स्मार्ट फोन हातात असलेले तरुण मुलं आणि मुलीही सर्रास पोर्न बघतात आणि त्यापायी सतत अपराध भाव मनात घेऊन वावरतात.
3) मुली ‘तसलं काही’ पाहत नाहीत, हा समज खोटा. मुलीही परस्परांकडून ‘तसलं’ साहित्य घेतात, पाहतात. चर्चा करतात. मात्र ते सारं तरुण जितकं उघड बोलतात, तितकं मुली बोलत नाहीत.
4) सहावी-सातवी-आठवीत असल्यापासून आपण ‘तसलं काही’ पाहतोय याची कबुली अनेक मुलं देतात. आणि वयाची विशी अर्थात ग्रॅज्युएट होईर्पयत आपण त्यापायी सिगारेट, दारू यासारख्या व्यसनांकडेही वळलो, फ्रस्ट्रेट झालो असंही सांगतात. पोर्न पाहण्याचं वय घसरतंय, कमी होतंय हे पत्रंचा ढीग स्पष्ट सांगतो.
5) पोर्न अॅडिक्शन वाढलंय हे तर वास्तव आहेच, पण त्यापायी अनेकांच्या लाईफस्टाईलचा चुराडा होतोय. झोप, जेवण, आरोग्य आणि मानसिक स्थिती या सा:याचेच नवे प्रश्न निर्माण होत आहेत.