टेक उडान...मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 07:00 IST2017-09-28T07:00:00+5:302017-09-28T07:00:00+5:30

एक नवीन तंत्रसंस्कृती जगभरच उदयास येत आहे. ती तंत्रसंस्कृती वापरकर्त्या हातांमध्ये भेद करत नाही. भाषेचे, देशांचे, वंशांचे, कातडीच्या रंगांचे किंवा स्त्री-पुरुषांचे भेद ती जाणत नाही. त्या तंत्रासमोर सारे एकसमान. मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

Take the help of a tech flyer ... | टेक उडान...मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

टेक उडान...मळलेली चाकोरी सोडायला त्या तंत्राची मदत घेतली तर...

दसरा.
परवा आपण आनंदाचं सोनं लुटू. कर्तृत्वानं सीमोल्लंघन करू. पण ते झालं प्रतीकात्मक. त्याच्यापलीकडे नेता येईल आपलं आयुष्य.
कोमट, चाकोरीतल्या जगण्यात धडाडीनं भरता येईल उमेदीचं इंधन आणि घेता येईल स्वत:च्याच क्षमतांपलीकडे एक मोठ्ठी झेप?
मनात आणलं तर अशक्य काय आहे? अवघड काय आहे?
फक्त आपण आपल्या मनावरची काजळी, रोजच्या जगण्यानं चढवलेले मेणचट तवंग, आपणच धरून ठेवलेले चिकट गैरसमज हे सारं खरवडून काढावं लागेल.
पण हे सारं कुणी करायचं, ते आपणच आपल्यासाठी करायला हवं. झडझडून उठायला हवं नव्या जिद्दीनं.
ते केलं तर कोण आपल्याला थांबवू शकेल ! आणि आता तर मदतीला आपल्या तंत्रज्ञान आहे. एक नवीन तंत्रसंस्कृती जगभरच उदयास येते आहे. ती तंत्रसंस्कृती वापरकर्त्या हातांमध्ये भेद करत नाही. भाषेचे, देशांचे, वंशांचे, कातडीच्या रंगांचे किंवा स्त्री-पुरुषांचे भेद ती जाणत नाही. त्या तंत्रासमोर सारे एकसमान.
डिजिटल रिव्होल्युशन अर्थात तंत्रक्रांतीच्या एका वेगळ्याच टप्प्यावर आपण उभे आहोत आणि हा टप्पा जाऊन अधिक तंत्रसुलभ, तंत्रजलद टप्पाही लवकरच येतो आहे..
मनात आणलं तर आपल्या हातातला मोबाइल आणि त्यातला इंटरनेट वापरून, सोशल मीडियाच्या मदतीनं आपण एक नवीन उडान भरू शकतो.
 

Web Title: Take the help of a tech flyer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.