शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

T20 Cricekt WC 2021: हरलेल्या वॉर्नरची विनिंग गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:32 IST

डेव्हिड वॉर्नर, हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक फोटो, खांद्यात तोंड खूपसून डोळ्यातलं पाणी लपवणारा. ती एक इमेज आणि वर्ल्ड कप जिंकून देणारा जबरदस्त बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार स्वीकारणारा वाॅर्नर ही एक इमेज.

-चिन्मय लेले

हायर ॲण्ड फायरच्या पैशाच्या खेळानं अपमान करून संपवलंच होतं त्याला, पण तो हरला नाही. कारण..

डेव्हिड वॉर्नर, हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक फोटो, खांद्यात तोंड खूपसून डोळ्यातलं पाणी लपवणारा. ती एक इमेज आणि वर्ल्ड कप जिंकून देणारा जबरदस्त बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार स्वीकारणारा वाॅर्नर ही एक इमेज. माणूस तोच. काळ बदलतो. कामगिरी बदलते आणि लोकांचे चेहरे, नजरा बदलतात. वॉर्नरसारखं आपण निवडायचं एवढंच असतं की आपल्यासाठी काय महत्त्वाचं, टीका करणारी तोंड की आपण स्वत:वर विश्वास ठेवून पुन्हा पहिल्यापासून स्वत:वर केलेलं काम..

वर्ल्डकप जिंकल्यावर वॉर्नर म्हणालाही, मी पुन्हा माझ्या बेसिक्सवर काम केलं, पुन्हा गिरवले धडे. पुन्हा सिंथेटिक खेळपट्टीवर कसून सराव केला. मला खेळताना आनंद वाटत होताच, मी बेसिक्स पुन्हा गिरवले..’ हे पुन्हा पुन्हा आपले बेसिक्स गिरवणं, आपला पाया पक्का करणं, आपल्यावरच काम करणं आणि लोक टीका करतात म्हणून नव्हे, तर आपली कामगिरी सुधारावी, आपलं अस्सल आपल्या हाती लागावं म्हणून हे किती भारी आहे.

नव्या कार्पोरेट काळात, चकचकीत प्रेझेन्टेशनच्या जमान्यात आणि बोलघेवड्या पोपटपंचीत आपल्या बेसिक्सवर पुन्हा काम करणं, पुन्हा पुन्हा सराव करणं, प्लेइंग फॉर द गॅलरी असं न करता, आपण आपल्या क्राफ्टवरच मेहनत करणं हेच ‘वर्ल्डक्लास’ आहे. आणि काळ बदलला म्हणून ते बदलत नाही हे वॉर्नरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

लोकांनी त्याला मोडीत काढलं, कप्तान होता तर थेट मैदानाबाहेर काढलं, बारावा गडी म्हणून पाणी आणायला लावलं. होता होईतो सगळे अपमान केले.त्यानंही ते पचवलं. त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी होत नव्हतीच.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा हा कर्णधार. २०१६ मध्ये त्यानंच कप्तान म्हणून संघाला विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, २०२१ उजाडता उजाडता चित्र बदललं. कर्णधारपद तर गेलंच, संघातूनही डच्चू मिळाला. वॉर्नरचा अपमान योग्य नाही असं जगभरातले क्रिकेट चाहते म्हणाले, पण जिथं फक्त पैशाची हायर ॲण्ड फायर भाषा कळते, त्या जगाला वॉर्नरच्या टॅलन्टचं अप्रूप उरलेलं नव्हतं. त्याचं करिअर संपेल की काय इतपत टीका, अपमान त्यानं सहन केलं. म्हातारा, आऊट ऑफ फॉर्म म्हणून त्याची किती हेटाळणी झाली. एखादा असता तर संपलाच असता या साऱ्यांत.. पण वॉर्नर पुन्हा उभा राहिला.. त्याचा मंत्र एकच, जो त्यानं सांगितलाच..

मी पुन्हा बेसिक्सवर काम केलं, पुन्हा कसून सराव केला, पुन्हा शॉट गिरवले.. हे सगळं केलं आणि क्रिकेटने त्याला पुन्हा स्वीकारलं.. परिणाम तो जगज्जेत्या संघाचा कणा बनला..आपला कणा ताठ ठेवून जर स्वत:वर काम करत राहिलं पुन्हा पुन्हा.. तर जिंकता येतं.. जग सलाम करायला उभंच असतं मग..

टॅग्स :David Warnerडेव्हिड वॉर्नरT20 Cricketटी-20 क्रिकेटAustraliaआॅस्ट्रेलियाT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१