सिने में जलन, आंखो में तुफान सा..... क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:18 PM2020-07-02T16:18:01+5:302020-07-02T16:24:48+5:30

.त्याला निळ्याभोर आभाळात विमान उडवायचे होते, समुद्रात खोलवर सूर मारायचे होते, गुप्तहेरांची भाषा शिकायची होती. एक दिवस मात्र त्यानं स्वत:लाच संपवलं.

sushant singh rajput suicide- a tale of many tales. | सिने में जलन, आंखो में तुफान सा..... क्यों है?

सिने में जलन, आंखो में तुफान सा..... क्यों है?

Next
ठळक मुद्देतरुण वयातल्या या आत्महत्या चटका लावतात; पण हे सारं थांबायला नको का?

- लीना पांढरे

....त्याला निळ्याभोर आभाळात विमान उडवायचे होते, समुद्रात खोलवर सूर मारायचे होते, ग्रहता:यांची रचना समजावून घ्यायची होती, गुप्तहेरांची भाषा शिकायची होती.
असा हा कुशाग्र बुद्धीचा तडफदार अभिनेता व्यावसायिक अथवा व्यक्तिगत तणावाखाली येऊन या जगातून अचानक एक्ङिाट घेऊन जातो हे धक्कादायक आहे.
त्याच्या आत्महत्येनंतर दीपिका पडुकोणची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. ती म्हणते की, तिने डिप्रेशनचा अनुभव घेतला आहे. अशा वेळेला संवाद साधणं, मदत मागणं आणि स्वत:ला एकटं न समजणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रवासात आपण एकमेकांच्या बरोबर असायला हवं आणि उमेद बाळगायला हवी. 
नेमकं सुशांतच्या बाबतीत हे घडलं की नाही माहीत नाही. त्याच्याआधी त्याची माजी मॅनेजर सलियननेही आत्महत्या केली होती. 
हे सारं वाचून प्रश्न पडतात की, त्याच्या भोवती फ्रेण्ड्स नव्हते, होते ते फक्त फॉलोवर्स? त्याच्या ट्विटर होमपेजवर विन्सेट वॅन गॉगचे पेंटिंग होते. ज्याने 37व्या वर्षी आत्महत्या केली होती. यातून त्याचा आत्मनाशाकडे असणारा कल स्पष्टपणो ध्यानात येत होता. चंदेरी दुनियेतील अनेक अभिनेते व अभिनेत्नींनी यापूर्वीही स्वत:हून मृत्यूला कवटाळले आहे. 
सा:या दुनियेला आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी हॉलिवूडची मदनमंजिरी मेरलीन मन्रोने; पण झोपेच्या गोळ्या घेऊन जीवनाचा अंत केला होता. 
उत्तुंग यशोशिखरावर पोहोचलेली माणसंही स्वत:ला संपवताना दिसून येतात. जीवनावर अदम्य प्रेम करणा:या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्नेस्ट हेमिंग्वेने पिस्तुलाचा चाप माथ्यावर टेकवून जीवनाचा शेवट केला तेव्हा तो असह्य आजारपण आणि वृद्धत्वाने गांजलेला होता.
सिल्व्हिया प्लॅथ या कवयित्रीने आपला प्रियकर व पती टेड ह्यूज आपल्याशी प्रतारणा करतो आहे हे दु:ख सहन न झाल्याने आपल्या दोन पिल्लांना पोरकं करून मृत्यूला कवटाळलं होतं. कॅफे कॉफी डे या शॉप चेनचा मालक सिद्धार्थ यांनी केलेल्या आत्महत्येचे गूढ अजूनही उलगडलेलं नाही.
‘सॉल्ट न् पेपर’ नावाची तेजस्विनी कोल्हापुरेची यू-टय़ूबवर छोटी फिल्म आहे. 
प्रेमप्रकरणातील अपयशामुळे आत्महत्या करायला निघालेल्या नायिकेला एक गरीब शेतकरी जगण्याचा सकारात्मक मूलमंत्न देऊन जातो, असं याचं कथानक आहे. आवर्जून पहावी अशी फिल्म आहे. 
मात्र हेही खरं की, समाजातील सर्व आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरांमधील आणि विविध वयोगटांतील माणसं आत्महत्या करतात. पण त्यामध्ये पुरुषांचं आत्महत्येचं प्रमाण हे स्रियांपेक्षा अधिक आहे.
या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात बाराशे शेतक:यांनी आत्महत्या केल्याचं बातम्या सांगतात. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं चक्र सुरूच आहे; पण अनेकांच्या आत्महत्येनंतर पाठीमागे राहिलेल्या त्यांच्या विधवांनी खंबीरपणो कुटुंबाचा भार संभाळलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आमचं काही झालं तर आमच्या मुलाबाळांकडे कोण बघेल? 
संख्याशास्रीय पाहणीत आढळले आहे की पुरु षांच्या आत्महत्येचे प्रमाण स्रियांपेक्षा  कित्येक पटीने जास्त आहे. 15 ते 39 या वयामध्ये सर्वाधिक आत्महत्या होतात. दरवर्षी जगात 8 लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात. त्यातील 1,35,क्क्क् म्हणजे 17 टक्के लोक हे भारतातील असतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.
प्रत्येक वर्षी दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर नापास झाल्याने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या विद्याथ्र्याबद्दल वर्तमानपत्नात बातम्या येतात. 
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा फॅन असणा:या दहावीतल्या एका विद्याथ्र्याने आत्महत्या केली. मोबाइल घेऊन दिला नाही, टॅब घेऊन दिला नाही अशा (इतरांना वाटणा:या) क्षुल्लक कारणावरूनसुद्धा आत्महत्या करणारी  मुलं आहेत. 
चंगळवाद, अतिमहत्त्वाकांक्षा, एकाकीपणा, नैराश्य, असाध्य रोग, आर्थिक प्रश्न, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अभ्यासातील अपयश, व्यावसायिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, मानसिक असुरक्षितता ही आत्महत्यामागील काही कारणं आहेत.
व्यक्तिवाद, स्वातंत्र्य, मी माझा या जीवनपद्धतीचे निश्चित फायदे आहेत; पण त्याप्रमाणो तोटेही आहेत. शहरांमध्ये  जगण्याचा वेग इतका वाढला आहे की, कुणालाच कुणाचं दु:ख वाटून घ्यायला वेळ उरलेला नाही.
 सीने मे जलन ऑँखो मे तुफान सा क्यू है
इस शहर मे हर शक्स परेशान सा क्यू है 
. अशी प्रत्येकाची स्थिती झालेली आहे.
 हे काही बरं नाही.

जरा अवतीभोवती लक्ष ठेवा.

तुमच्या मित्रमैत्रिणींच्या संदर्भात कधी असं काही घडत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही मदत करू शकाल तर निदान मदत मिळवून देण्याचे प्रयत्न तरी करता येतील.
* मला जगायचं नाही मरायचं आहे असं कुणी सतत पुन्हा पुन्हा बोलून दाखवत असेल तर तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे हा खोटा त्नागा आहे असं समजून आसपासच्या लोकांनी दुर्लक्ष करता कामा नये.
* प्रेमभंग झालेले किंवा मृत्युमुळे आपलं जवळचं माणूस हरवून बसलेले लोक सहज आत्महत्येला प्रवृत्त होतात. वियोग, प्रतारणा आणि विश्वासघाताच्या जखमा विषाप्रमाणो पूर्ण रक्तात भिनत जातात. तेव्हा त्याकाळात कुणी असेल, तर दुर्लक्ष न करणं योग्य.
* ज्यांच्या कुटुंबात आधी कोणी आत्महत्या केली असेल अशा घरात आत्महत्येकडे वळणा:याचे प्रमाण इतर कुटुंबाच्या तुलनेत अधिक असते.
* आत्महत्येकडे वळणा:या लोकांच्या जेवणा-खाण्याच्या व झोपेच्या सवयी पूर्ण बदलतात. एक तर हे लोक अत्यंत कमी खातात किंवा हताशा व निराशेवर मात करण्यासाठी अतिखातात. तसेच काही जणांना निद्रानाश होतो तर काही जण प्रचंड झोपू लागतात.
* आत्महत्येकडे झुकणा:या व्यक्तींमध्ये व्यसनाधीनता वाढीस लागते. धूम्रपानाचे प्रमाण वाढते किंवा हे लोक पूर्णपणो दारूच्या अथवा अमली पदार्थाच्या नशेच्या आहारी जातात.
*  काही माणसं कुठलाच आघात किंवा तणाव सोसू शकत नाहीत. अशी अत्यंत संवेदनाशील व हळवी माणसं कोलमडून पडतात. झालेला आघात पचवून पुढे जाण्याऐवजी ते स्वत:लाच संपवण्याचा प्रयत्न करतात. रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करणारी मुलं याच प्रकारात मोडतात. 
* काही जण स्वत:ला अत्यंत अपराधी, गिल्टी मानतात. आपल्यामुळे इतरांना त्नास होतो आहे या अपराधी भावनेने ते खचत जातात आणि निराश होऊन आत्महत्येला प्रवृत्त होतात.
* काहीवेळा पालक आपल्या अपत्यांना लहानपणापासून अत्यंत फुलासारखं जपतात. त्यांची अतिकाळजी घेतात. बंद काचपात्नातील रंगीत माशांप्रमाणो अतिसंरक्षणात वाढणारी मुले मग पुढे मानसिकदृष्टय़ा इतकी परावलंबी दुर्बल आणि विकलांग होतात की ती स्वत:च्या पायावर उभीच राहू शकत नाहीत. मग छोटीशी समस्याही त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करू शकते.


( लेखिका प्राध्यापक आहेत.)
 

Web Title: sushant singh rajput suicide- a tale of many tales.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.