शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

असा मी ‘आसामी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 6:00 AM

कुठं धुळे जिल्ह्यातलं शिंदखेडा. कुठं परभणी. आणि आता कुठं आसाम राज्यात नागाव जिल्ह्यातल्या काशियाढोली गावात नोकरीसाठी पोहचलोय. अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजीचा हात धरत थेट आसमिया, बंगाली बोलतोय.. किती समृद्ध केलं या प्रवासानं काय सांगू...

विवेक सुनील महाजन शिंदखेडा (जि. धुळे)

जगात जर्मनी आणि भारतात परभणी!याच परभणीत मी कृषी अभियांत्रिकीच्या पदवीच्या तृतीय वर्षाला शिकत होतो. त्यावेळी ग्रंथालयातून हट्टाने घेऊन वाचलेलं पु.लं.चं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘असा मी असामी’ अजून आठवतो. पण काळ मलाच शब्दाश: कधीतरी ‘आसामी’ बनवेल हे त्यावेळी कुणी सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं.पण आज माझ्यात आसामीपणा आज एवढा रुजलाय की कोणी ‘कि खोबोर असे? असं विचारताच ‘भाल असु आरू’ असं आपसूकच तोंडी येतं.आसमिया ही भाषा गोड. तिनं मला आपलंसं केलं आणि मी तिला. या भाषेचं रोपटं मनात रुजवलं ते माझ्या शाखेचे आर्म गार्ड परमान्द सैकीया यांनी. ते एक सेवानिवृत्त आर्मी मॅन. आपलं गाव सोडून शहरात परराज्यातच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावून ते आज माझ्यात शाखेत बॅँकेच्या सेवेत आहेत.माझं गाव शिंदखेडा. धुळे जिल्ह्यातील तालुक्याचं गाव. शिंदखेड्यात स्थायिक झालोत ते १९९९ ला त्याआधी अंकलेश्वरला होतो. (गुजरात) वडील तिकडे एका कंपनीत कामाला होते. अंगणवाडी/बालवाडीत गुजराती भाषेचे धडे गिरवलेलं मला स्पष्ट आठवतंय. त्यानंतर श्ािंदखेड्यात वडिलांचा पानदुकानाचा व्यवसाय सुरू केला.पहिली ते चौथी जि.प. शाळेतूृन नंतर पाचवीसाठी एमएचएसएस हायस्कूलमध्ये माझं संपूर्ण शिक्षण झालं. एकाच गावात शिक्षण होऊ शकलं असतं. पण इयत्ता पाचवीत दिलेली ‘नवोदय’ची परीक्षा पास झालो आणि जगण्याला मिळाला एक टर्निंग पॉइंट’. सहावी ते बारावी सलग सात वर्षे होस्टेल लाइफ, जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार या आदिवासी बहूल भागात. प्रज्ञान ब्रह्मं हे नवोदयचं ब्रीदवाक्य. पहाटे पाच ते रात्री दहा सारं शेड्यूल फिक्स. त्यात क्लास, खेळ, व्यायाम, जेवण सगळंच. आपला वेळ आपल्याच व्यक्तिमत्त्व विकासासाठी किती योग्य पद्धतीने वापरता येतो हे सर्वप्रथम इथं शिकलो. नवीन वातावरणानं स्वत:चं काम स्वत: करण्याची सवय लावली. नेतृत्व करण्यास शिकवलं वेगवेगळ्या उपक्रमात.पुढे पदवीचं शिक्षण कृषी विषयात घ्यावं असं आजोबांचं, आईवडिलांचं मत होतं. मीसुद्धा तयार झालो. पदवी अभ्यासक्रमासाठी पैसे पुरवण्यासाठी वडिलांची आर्थिक परिस्थिती तेवढी भक्कम नव्हती. म्हणून शिंदखेड्याच्या सेंट्रल बँकेच्या शाखेतून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी मामांनी साहाय्य केलं आणि दाखल झालो ते परभणीत. पुन्हा होस्टेल. यावेळी ‘सह्याद्री’.पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना इन प्लाण्ट ट्रेनिंगसाठी वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेसोबत जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे काम करण्याची संधी मिळाली. मनरेगा या योजनेच्या उत्तम आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी ही संस्था तांत्रिक साहाय्य करते. मनरेगाचा प्रस्ताव बनवणं व झालेल्या कामाचं मोजमाप करण्यासाठी मी त्याकाळात अनेक गावात जात होतो. शेतकºयांच्या बांधावर, कधी डोंगरावर झालेल्या कामाचे मोजमाप करत होतो. गाव आलं की बारा भानगडी आल्या. बांधाबांधावरून भांडणं व्हायची. पण तेव्हा पदवीही पूर्ण न झालेले आम्ही एनजीओचे ‘साहेब’ म्हणून मी व माझा मित्र रघुनाथ जगताप मध्यस्थी करायचो. मोजमाप झाल्यावर गावकºयांची (मजुरांची) मीटिंग घेऊन त्यांना कामाचा मोबदला मिळाला की नाही हे दाखवायचो. कामाचे आणि मृद व जलसंधारणाचे फायदे सांगायचो. आपल्या या शिक्षणासाठी कर्जाद्वारे गुंतवणूक केल्याचा अभिमान वाटावा असे काही क्षण याकाळात वाट्याला आले.पदवी झाली. बदललं शहर. आता औरंगाबाद. बँकिंगच्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली. बँकिंग परीक्षा उत्तीर्ण झालो. ज्या बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतलं होतं, त्याच बँकेत कृषी वित्त अधिकारी म्हणून सेवेत दाखल झालो.पण यावेळी शहरच नाही तर राज्यदेखील बदललं.आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यात काशियाढोली या एका खेड्यात सेंट्रल बँकेच्या शाखेत मी आता कार्यरत आहे.बँकेत फिल्ड जॉब असल्यामुळे नेहमी गावोगाव आणि खेड्यात फिरतो. लोकांशी संवाद करताना त्यांची भाषा म्हणजेच आसमिया, बंगालीही शिकतो आहे. त्यांची भाषा माझ्या हिंदीशी मेळ खात नव्हती. इकडे खेड्यात आजही इतर राज्यांप्रमाणे हिंदीचा तेवढा स्पर्श नाही. म्हणून एक चांगला संवाद होण्यासाठी आसमिया भाषा शिकतोय आजही आसमिया भाषेत दिलेला ग्राहकांचा अर्ज/किंवा तक्रार काहीसा वेळ घेऊन वाचू शकतो. माणसं आणि भाषा दोन्ही आपले वाटू लागले आहेत.या प्रवासात शहरं बदलत गेली. कधी होस्टेल, रूम तर आता पेइंग गेस्ट. भाषा बदलली. अहिराणी, गुजराती, मराठवाडी आणि आसामी शिकलो. बदलणाºया शहरांनी आपलेसं केलं. बदलणाºया परिस्थितीसोबत बदलत गेलो. या शहरांनी स्वावलंबी बनायचं शिकवलं. आत्मविश्वासही दिला. या संपूर्ण बदलात कुठेही हिंमत खचू नये हे शिकलो आईकडून. जेव्हा जेव्हा अपयश आलं किंवा नकारात्मक वाटलं तेव्हा तेव्हा मला माझ्या मामांनी प्रा. दीपक माळी व अरविंद माळी यांनी मार्गदर्शन केलं. आता माझी भावंडंही बदलाच्या या प्रवासात आहेत.. त्यांचीही साथसोबत आहेच.घरट्यात राहून पोट भरत नाही म्हणतात, मला तर पोटानं किती वेगळं जग पहायला मिळतंय..

(सध्या आसाममधील नागाव जिल्ह्यातल्या काशियाढोली गावात वास्तव्य.)