- अंकुर गाडगीळ
कोविडचा पहिला रुग्ण पोलंडमध्ये 4 मार्चला आढळला आणि 15 मार्चपासून इथे लॉकडाऊन सुरू झालं. हळूहळू संचारबंदीचे नियम वाढत गेले आणि हालचाली, आर्थिक व्यवहार करणं कठीण झालं. काही व्यवसाय बंद करण्यात आले (उदा. सलून, ब्यूटिपार्लर, पब, उपाहारगृह). दुकानातील लोकांच्या संख्येवर नियंत्नण आणले. आमचे शैक्षणिक वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले, जे अजूनही तसेच सुरू आहेत आणि अंदाजे सप्टेंबर्पयत हे असेच सुरू राहतील, असे संकेत आहेत. आमचे छोटेसे गाव आहे आणि आता इथे लोकांना आर्थिक चणचण भासत आहे. या काळात दोनपेक्षा अधिक जणांना जमायला बंदी होती आणि त्यातच इस्टर सण असल्याने गावातील काही धार्मिक लोकांनी त्याविरोधात त्यांचा रोष व्यक्त केला. पण या तुरळक घटना सोडल्यास ब:याच लोकांनी नियम काटेकोरपणो पाळले. आता लॉकडाऊन संपले असून, नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात खूप मानसिक तणाव जाणवला; पण आता हळूहळू परत सगळे सुरळीत होत आहे. नव्या परिस्थितीशी जुळवून घेऊन जगणो आम्ही आता शिकलो आहोत, अजूनही शिकतोच आहोत.मात्र हे सारं स्थानिकांसाठीही सोपं नव्हतं. बार्बरा मार्शावेक. ही अधिकृत अनुवादक आणि दुभाषी म्हणून स्वत:चा व्यवसाय करते. ती सांगते, ‘स्वत:चा व्यवसाय असल्याकारणाने कोविड काळात मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. बाकीचे व्यवसाय, कामं, कार्यालयं, समारंभ (उदाहरणार्थ- शाळा, लग्न, जागेचे खरेदी-विक्री व्यवहार, न्यायालयीन व्यवहार) मंदावल्याने अर्थातच कामाचा ओघ तसा खूपच कमी झाला होता. पण योगायोगाचा भाग म्हणजे अगदी लॉकडाऊन सुरू व्हायच्या अगोदर न्यायालयाकडून आम्हाला महिनाभर पुरेल एवढा कामासंदर्भातील कागदपत्नांचा गठ्ठा पोहोचला होता. माझी सहकारी, मॅग्दा माङयाकडे फेब्रुवारीत नुकतीच रुजू झाल्याकारणाने आमच्यात एक नवीन उत्साह होता. यामुळेच लॉकडाऊनचा काळ तिला प्रशिक्षण देण्यात सत्कारणी लावला. एप्रिल महिन्यात इस्टर असल्याने उत्साहाचं वातावरण होतं. लॉकडाऊनच्या आधी सामान आणून ठेवलं होतं, नंतर क्वचितच आम्ही बाहेर पडत होतो. पण तरी या सगळ्यात नंतर नंतर सामान खरेदीची अडचण वाढतच होती. तांदूळ, पास्ता, साबण, शाम्पू, टॉयलेट पेपर या गोष्टी खरेदी करणो कठीण झाले होते. म्हणून बरेचसे खाण्याचे जिन्नस आम्ही गोठवून ठेवत होतो. आमच्याकडेसुद्धा लोणची, जाम घरी करून ठेवण्याची पद्धत आहे. ज्या पदार्थाची चव या काळात काही औरच होती. एप्रिलमध्ये एका स्वयंसेवी संस्थेबद्दल समजले जे कापडी मास्क शिवत होते. मी एका मैत्रिणीकडून शिवणयंत्न आणून त्या संस्थेत सहभागी झाले. घरच्या घरी कापडी मास्क शिवून त्यांना पाठवू लागले. कधीकाळी आत्मसात केलेल्या या कौशल्याचा समाजाला उपयोग झालेला पाहून आनंदच झाला. माझा नवरा बांधकाम क्षेत्नात आहे आणि त्यांचा व्यवसाय जरा थांबला आहे. मित्न, मैत्रिणींना भेटता येत नसल्याने लॉकडाऊनचा काळ कठीण होता. सुदैवाने आम्ही सगळे तंदुरुस्त आहोत आणि या काळातून सुखरूप बाहेर पडलो.
(अंकुर पोलंडच्या पोझनान शहरात पीएच.डी. करतो आहे.)