शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

बॅण्डवालाचा सायेब लेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 7:30 AM

वडील बॅण्डपथकात कलाटीवाद्यं वाजवतात. त्यांची इच्छा होती, पोरांनी शिकावं. आणि मुलानंही त्या इच्छेला लक्ष्य बनवत थेट यूपीएससीच क्रॅक करून दाखवली .जीवन दगडे या तरुणाच्या आणि त्याच्या पालकांच्या जिद्दीची गोष्ट.

-महेश गलांडे

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 8-10 हजार लोकसंख्या असलेल्या गावातला जीवन मोहन दगडे. त्यानं यूपीएससी परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली; मात्र ही परीक्षा त्याच्या एकट्याची नव्हती, त्याच्या घरच्यांच्या कष्टांचीही होती. आपला मुलगा एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला ही बातमी दुपारी 1 वाजेच्या सुमारात जीवनच्या वडिलांना समजली, त्यावेळी वडील मोहन दगडे हे वैराग येथील बँडपथकात कामावर होते. लग्नात वाजवल्या जाणा-या बॅण्डपथकात ते कलाटी नावाचं वाद्य वाजवतात. आपला पोरगा आणखी मोठा सायेब झाल्याचं समजताच त्यांनी तातडीनं सुर्डी गाव गाठलं. गावात पाऊल ठेवण्यापूर्वीच गावक-यानी मोहन दगडेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. पोरानं मिळवलेलं हे यश पाहून मोहन दगडे भारावून गेले.

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केलं. वैरागच्या अमर बँडपथकात कलाट हे वाद्य वाजविणा-याच्या मुलानं मिळवलेल्या या यशाचं कौतुक सा-या गावाला तर झालंच. पण आमचा मुलगा आणखी मोठा सायेब झालाय, असं अभिमानानं सांगताना जीवनच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. गेल्या 25 वर्षांपासून वाजवत असलेल्या बँडचं आज सार्थक झालं, आमच्या पोरानं आमच्या कष्टाचं चीज केलं. पांग फिटलं, असं ते सांगत होते, तेव्हा त्या शब्दांमध्ये विलक्षण आनंदाची जादू होती. 

खरंतर गावातल्या पोरांना त्या इंटरनेट  व्हॉट्सअँपवरनं जीवन पास झाल्याचं समजलं. त्यांनी त्याच्या वडिलांना फोन केला. दुपारी गावात पोहोचल्यानंतर गावातील सगळी मंडळी आम्हाला भेटायला येत होती. सा-या गावात त्यांनी पेढे वाटले, त्यानंतर कुळदैवत असलेल्या गावातील भैरोबाला नारळ फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला. ते सांगतात, ‘पोराला कधीही गरिबीची जाणीव न होऊ देता आम्ही शिकवलं, पोरानंही आमच्या कष्टाचं चीज केलं!’ 

त्यांना सहज विचारलं, पोरगा एवढा मोठा साहेब झाला आता, यापुढे बँड वाजवणं बंद करणार का? 

तसे ते पटकन म्हणाले, ‘आवं अजून दोन पोरं शिकत्याती, एक औरंगाबादला आणि एक पुण्याला असतोय. त्या दोघांनाबी साहेब बनविल्याशिवाय बँड सोडायचा नाही!’त्यांचा एक मुलगा अभिजित हा औरंगाबादमध्ये तर महेश पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करतोय. 

मोहन दगडे गेल्या 25 वर्षांपासून वैराग येथील बँडवाल्या पठाण यांच्या अमर बँडमध्ये काम करतात. या बँडपथकात ते कलाटी हे वाद्य वाजवतात. जीवनची आई बचतगटाचं काम बघते. अत्यंत हलाखीच्या, गरिबीच्या परिस्थितीतून या मायबापानं आपल्या तिन्ही पोरांना उत्तम शिक्षण दिलं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही कच खाल्ली नाही.  त्याचंच यश आता त्यांना मिळतं आहे.जीवनच्या यशाची गोष्ट अभिमानाचीच नाही तर उमेदीचीही आहे.

----------------------------------------------------------------------------

मी फ क्त अभ्यास केला. मला परीक्षेच्या तयारीसाठी जे हवं ते सगळं आई-वडिलांनीच पुरवलं. त्यामुळे माझ्या यशाचं सारं श्रेय त्यांचंच. संघर्ष त्यांचा होता, मेहनत त्यांची होती, कष्ट त्यांनी उपसले. गेली वर्षे माझे वडील बँडपथकात काम करत आहेत. आई आजही बचतगटाचं काम करते.त्यांच्या कष्टांचं हे मोल आहे, माझं यश म्हणूनच त्यांचं आहे.  मला एकच वाटतं की, आपण गावात राहिलो, ग्रामीण भागातले आहोत म्हणून इतरांच्या तुलनेत स्वत:ला कमी लेखू नका. गावाकडचा, गरीब, खेडूत असा समज स्वत:बद्दल नकोच. हा गैरसमज आत्मविश्वास कमी करतो. न्यूनगंड असता कामा नये.आता स्पर्धा परीक्षांची स्पर्धा प्रचंड वाढलीय; मात्र सगळे करतात म्हणून आपण करायचं असं करू नये. आपल्याला जे करावंसं वाटतं ते मनापासून करा, यश नक्की मिळेल; मात्न हे करत असताना डेडलाइनही ठेवायला हवी. स्पर्धा परीक्षा देताना तर फारच काळजी घ्यायला हवी. स्पर्धेत वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन तयारी करावी आणि आपला प्लॅन बी पण तयार असावा हेही महत्त्वाचं आहे. मला आठवतं, पुण्यात  बीएस्सी अँग्रीचे शिक्षण घेत असतानाच एमपीएससीची तयारी सुरू केली; मात्र जिथं रहायचो त्या रूमवर यूपीएससी करणारे मित्न भेटले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मीही तयारी सुरू केली. 2014 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एमपीएससी देतच होतो. त्यात आरएफओची वर्ग 2 ची परीक्षा पास झालो; पण यूपीएससीचीच परीक्षा हे लक्ष्य होतं. होतं. मात्र घरची परिस्थिती पाहता ते जमेल असं दिसत नव्हतं. म्हणून मी आरएफओ म्हणून 2016 साली उत्तराखंड जॉइन केलं. मात्न, जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. तयारी करतच होतो. नोकरी सोडून अभ्यास करायचं ठरवलं तर बाकीच्यांनी वेड्यात काढलं, पण आई पाठीशी होती. सुदैवानं ती वेळ आली नाही. धनंजय पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तेलंगणातील अधिकारी महेश भागवत सरांचंही मार्गदर्शन होतं. मी पुण्यातच बेसिक क्लास केला होता. मात्र, कुठलाही पूर्ण वेळ कोचिंग क्लास लावला नाही. पुण्यातील बीएआरटीआयमधून दिल्लीतील अभ्यासवर्गासाठी निवड झाली होती, तो एक मार्गदर्शनातील महत्त्वाचा टप्पा ठरला.आता मी आयएफएस जॉइन करणार आहे, त्याआधी घरी जाऊन आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवण्याची इच्छा आहे. - जीवन दगडे

mjmaheshgalande@gmail.com