शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

मॉलमध्ये काम करणार्‍या तरुण नोकरदार मुलींच्या जगात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:25 IST

रीटेलचं नवीन जग, एसीतला चकचकाट वस्तू-उत्पादनांनी भरलेले चकचकीत मॉल्स. आणि तिथं काम करणार्‍या, जेमतेम शिकलेल्या मात्र स्मार्ट तरुण मुली. नव्या जगानं त्यांना रोजगार संधी दिली, त्या संधीचं सोनं करत आपल्या पायावर उभं राहणं त्यांनी साधलं.

ठळक मुद्देचटपटीतपणा, हसतमुख चेहरा, नम्र  वागणं आणि थोडंफार इंग्रजी आणि हिंदी यावर या क्षेत्रात नोकरी मिळते. आणि आताशा त्यातून नुसती रोजीरोटीचीच नाही तर करिअरची एक नवीन वाट या मुलींना सापडते आहे.

- शुभा प्रभू-साटम

मोठी सुपर मार्केट्स आता नवलाईची राहिलेली नाहीयेत. शहरं सोडा, तुलनेनं मध्यम अशा शहरातपण एका छताखाली सगळे जिन्नस विकणारी मोठी दुकानं, मॉल्स उभे राहिलेत. अगदी वीसेक वर्षापूर्वी मध्यमवर्गीय आणि काही उच्च मध्यमवर्गीय लोकांची धाव कोपर्‍यावरच्या परंपरागत किराणा दुकानाकडे असायची. घरातल्या रिकाम्या लहान पोराला चिठ्ठी देऊन पाठवले जायचं. वस्तू तरी काय तर धान्य, कडधान्य, तेल, डाळी आणि अन्य वस्तू, शैक्षणिक साहित्य बस्स. रव्याचे सतरा प्रकार आणि तुपाचे वीस ब्रॅण्ड असला मामला नव्हता. वाण्याकडे त्याच्या गावाकडचे दोन-तीन शिकावू उमेदवार असायचे जे वजन करणं, सामान बांधणं, पुडय़ा बांधणं हे काम करायचे आणि हिशेब गल्ल्यावरचा मालक करायचा.  इथपासून आजच्या लयभारी अशा पॉश सुपरमार्केटर्पयत आपली प्रगती झालीय. खच्चून भरलेले आयल्स, वेगवेगळी उत्पादनं, भल्या मोठय़ा ट्रॉल्या आणि खरेदी झाली की चेक आउट करण्याचे खंडीभर काउण्टर्स. तिथं भेटतात युनिफॉर्ममधल्या चटपटीत हसतमुख अशा तरुण मुली. काही मुलंही. कुठलंही सुपरमार्केट असो किराण्याचे किंवा अन्य उत्पादनांचे; कस्टमरला मदत करणार्‍या, नेमकी वस्तू शोधून देणार्‍या, पर्याय सुचवणार्‍या आणि शेवटी हिशेब करून पॅकिंग करणार्‍यांत बहुसंख्य मुलीच दिसतात. साधारण वय वर्षे 19 पासून 30 र्पयतच्या तरुण मुली सुपरमार्केट मॉल्समध्ये काम करताना आताशा दिसतात. पुरुष किंवा मुलगे आहेत; पण तुलनेने तसे कमी.याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की, याप्रकारच्या कामासाठी फार मोठी शैक्षणिक गुणवत्ता लागत नाही. हिशेबासाठी ऑटोमॅटिक टिल्स असतात. चटपटीतपणा, हसतमुख चेहरा, नम्र  वागणं आणि थोडंफार इंग्रजी आणि हिंदी यावर या क्षेत्रात नोकरी मिळते. आणि आताशा त्यातून नुसती रोजीरोटीचीच नाही तर करिअरची एक नवीन वाट या मुलींना सापडते आहे.वाशी येथल्या हायपर स्टोअर्समधील स्टोअर्स मॅनेजर नवीन चौहान सांगतात, या सर्वजणी जेव्हा रुजू होतात तेव्हा त्यांना एक लहान ट्रेनिंग अथवा इंडक्शन प्रोग्रॅममधून जावं लागते. ज्यात तुम्ही नीटनेटकं कसं राहावं इथपासून ते भडकलेल्या, संतापलेल्या कस्टमरशी कसं वागावं हे शिकवलं जातं. बोलायचं कसं, उत्तर कसं द्यायचं इतकंच काय; पण उभं कसं राहायचं या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. उत्पादनं कशी आहेत, कुणासाठीची आहेत याची माहिती दिली जाते. उदाहरण द्यायचं तर रवा वेगळा आणि कूसकूस वेगळं हे कसं ते समजावलं जातं.’हल्ली अनेक उच्च आणि मध्यमवर्गीय शहरी मॉल्स, बडे बाजार, मल्टिपर्पज स्टोअर्स दिसतात. सेल्स असिस्टंट, कॅशिअर म्हणून मुलीच तिथं काम करतात. भूषण कोयंडे डी-मार्टमध्ये काही वर्ष स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत होता. त्यानं अनेक नवख्या मुलींना व्यवस्थित ट्रेनिंग दिलेले आहे. तो म्हणतो, या सर्व मुली पंधरा-एकक दिवसांनंतर अगदी सफाईने रूळून काम करतात.प्रज्ञा महाले ही जवळपास पाच वर्षे या क्षेत्रात आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे हिशोबाचा प्रॉब्लेम नसतो, बारकोड चेक करणं महत्त्वाचं. दिवाळी, गणपती, लगAसराई अशावेळी तर पाणी प्यायला फुरसत मिळत नाही. हायपरमधील साधना कांबळे आणि मीनाक्षी महिंद्रकर इथे बरेच वर्ष आहेत. त्या कपडय़ांचा विभाग सांभाळतात. कुणाला काय हवंय आणि काय चांगलं दिसेल हे नजरेने जोखण्यात त्या आता तरबेज झाल्यात. या कामासोबत या सर्वजणींना एक काम अगदी नजरेत तेल घालून करावं लागतं ते म्हणजे चोर्‍यांवर लक्ष ठेवणं.वस्तू इथे उघडय़ा असल्याने अनेकदा चोरल्या जातात. कधीतरी हेतूपूर्वक नासधूस होते. कधी लहान मुलं सांडलवड करतात. या सगळ्यांना व्यवस्थित हाताळणं हे या सर्व मुलींचं मुख्य काम. एकदा दीक्षा वाघमारेच्या अंगावर एक आई संतापाने धावून आली होती आणि वंदना जेव्हा हिशेब करत होती तेव्हा जवळपास दहा-एक हजाराचा माल घेतलेल्या त्या व्यक्तीने पैसे द्यायला नकार दिला आणि तो सरळ चालता झाला.

या सगळ्याजणी हेच म्हणाल्या की, अशावेळी डोकं शांत ठेवून काम करणं इथं महत्त्वाचं असतं. प्रत्युत्तर कधीही द्यायचं नाही, हे एक सूत्र.या सगळ्याजणी अगदी साधारण घरातून येतात. पण सफाईनं वागतात. स्मार्ट होतात. यांच्या कामाचे तास आठ आणि एक तास जेवणाची सुट्टी. पण गर्दी असली की तीपण घेता येत नाही. कामावर आल्यापासून पार जाईर्पयत उभं राहावं लागतं. नम्र वागावं लागतं. प्रसंगी रडायला आलं तरी मन घट्ट करावं लागतं. अपमान सहन करावा लागतो.मग, या सर्वाचा त्रास होत नाही का? या सर्वजणींच्या मते त्रास नक्कीच होतो. पण त्रास, मनस्ताप कुठल्या नोकरीत नसतो? साधना सरळ म्हणाली की, मॅडम पगार चांगला आहे, सुट्टय़ा असतात. बाथरूमची सोय व्यवस्थित आहे. हे पाहायचं की थोडं काही झालं म्हणून रडत  बसायचं.नेमका हाच पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड किंवा सकारात्मक विचार इथल्या अनेक जणींच्यात दिसतो. या सर्वजणी फार शिकलेल्या नसतात. आर्थिक परिस्थिती जेमतेम. पण तरीही आजच्या घडीला स्वाभिमानाने रोजगार कमावताहेत.  अत्यंत तत्पर, चटपटीत, हसतमुख अशा या सर्व मुली दिवसाच्या शेवटी स्मार्ट गणवेश उतरवून, साधा ड्रेस चढवून आपापल्या खुराडय़ावजा घरात जातात. मॉल्सच्या चकचकीत एसी गारव्यातून चाळीच्या खोल्यांत. आठ तास उभं राहून कंबर मोडलेली असली तरी घरी पदर खोचून काम करतात आणि दुसर्‍या दिवशी तशाच टापटीप, हसतमुख चेहर्‍यानं कामावर रुजू होतात. कोणतंही  व्यावसायिक प्रशिक्षण नसतानाही पूर्ण जबाबदारीनं आणि सक्षमपणे नव्या रिटेलच्या जगात काम करतात. आपल्या मर्यादा, कुवत ओळखून जी संधी मिळालीय त्याचं त्या सोनं करताहेत हे नक्की..