शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नियमानुसार तक्रार करायला आणि दाद मागायला भ्यायचं कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:35 IST

आपल्या हक्कांसाठी जागरूक असताना नियमानुसार तक्रार करायला आणि दाद मागायला भ्यायचं कशाला?

ठळक मुद्दे. आपला हक्क आपलं मत ठामपणे सांगावं,  हक्क सोडू नये; पण त्यासाठी समोरच्याचा अपमान करण्याची गरज नसते.

- मिलिंद थत्ते

लोकशाही विकसित होत असताना नागरिकांच्या तक्र ार निवारणासाठी अनेक व्यवस्था निर्माण होत असतात. जसजसा आपण नागरिक या व्यवस्थांचा वापर करू, तशा त्या व्यवस्था स्थिर आणि प्रभावी होत जातील. यातल्या बहुतेक व्यवस्था या प्राधिकरण स्वरूपाच्या असतात. प्राधिकरण म्हणजे ज्यांना स्वतंत्र निर्णयाचे अधिकार आहेत ते. जसे की मोबाइल किंवा फोनबाबतच्या तक्र ारींसाठी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय आहे. तसेच इतर अनेक विषयात अशी प्राधिकरणं आहेत. यातलं एक महत्त्वाचं प्राधिकरण आहे - राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण. एक निवृत्त न्यायमूर्ती, एक निवृत्त प्रशासनिक अधिकारी, एक निवृत्त पोलीस अधिकारी व एक सामाजिक कार्यकर्ता - अशी या प्राधिकरणाची रचना आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रकाश सिंग वि. केंद्र सरकार या खटल्यात असं दिसून आलं की कोर्टात येणार्‍या तक्र ारींपैकी बरीच मोठी संख्या पोलिसांबाबत असलेल्या तक्रारींची आहे. या तक्र ारी दरवेळी न्यायालयात येण्यापेक्षा यासाठी वेगळी व्यवस्था असावी, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यातून प्रत्येक राज्यात ‘राज्य पोलीस तक्र ार प्राधिकरण’ तयार झाले. महाराष्ट्रातही असे प्राधिकरण मुंबईत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा पोलीस तक्र ार प्राधिकरण’असणंही बंधनकारक आहे. हे प्राधिकरण न्यायालयाप्रमाणेच काम करतं. पण तिथे वकिलाची गरज नसते आणि एकच विषय ते हाताळत असल्यामुळे न्यायालयापेक्षा वेगात प्रक्रि या होऊ शकते. उपआयुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांबाबत तक्र ार असेल तर राज्य प्राधिकरणाकडे थेट तक्र ार करता येते. त्याखालच्या दर्जाच्या अधिकार्‍यांबाबत तक्र ार असेल तर जिल्हा प्राधिकरणाकडे दाद मागता येते. प्राधिकरणाने दिलेले आदेश पोलिसांना व राज्य सरकारला बंधनकारक असतात. पोलिसांनी विनावॉरंट अटक केली, कोठडीत ठेवले, गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली किंवा कोणत्याही प्रकारचा गंभीर अत्याचार केला तर तक्र ार प्राधिकरणाकडे नागरिक तक्र ार करू शकतात. साध्या कागदावर लिहिलेल्या अर्जाद्वारे ही तक्र ार करता येते. 

मागील एका लेखात म्हटले होते तसे - पोलिसांचा धाक गुन्हेगारांना असला पाहिजे. आपण गुन्हा केला नसेल तर भिण्याचं काय कारण? पोलीस अधिकारी वा कर्मचारी ही माणसंच आहेत. त्यांच्यावर दडपणं, ताण असतात. त्यांनाही मान-अपमानाची भावना असणारच. म्हणून आपण सुजाण नागरिकांनी पोलिसांशी संवाद करताना किंवा कोणत्याही सरकारी व्यक्तींशी बोलताना त्यांचा अपमान करू नये. आपला हक्क आपलं मत ठामपणे सांगावं,  हक्क सोडू नये; पण त्यासाठी समोरच्याचा अपमान करण्याची गरज नसते. यालाच ‘सविनय कायदेपालन’ म्हणतात.

****************

राज्य पोलीस तक्र ार प्राधिकरणाचा पत्ता असा - महाराष्ट्र राज्य पोलीस तक्र ार निवारण प्राधिकरणचौथा मजला, कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज, महर्षी कर्वे रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, 400021 ई-मेल mahaspca@gmail.com फोन 02222820045 / 46/47