सोनमचं संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 09:02 IST2018-05-17T09:02:09+5:302018-05-17T09:02:09+5:30

शिल्पा शेट्टी, जॅकलीन, करिश्मा कपूरचा आयव्हरी लूक पाहिलात?

 Sonam kapoor sangeet ceremony | सोनमचं संगीत

सोनमचं संगीत


- श्रुती साठे

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचं लग्न नुकतंच पार पडलं. मीडीयात गाजलं. मेहेंदी, संगीत, लग्न, रिसेप्शन यासाठी सोनमनं घातलेले कपडे, ज्वेलरी,हेअरस्टाइल यांची चर्चा झाली.
लग्नाच्या आदल्यादिवशी असलेल्या संगीत सोहळ्यासाठी सगळ्या पाहुण्यांना ड्रेसकोड देण्यात आला होता. पाहुण्यांच्या यादीत असलेल्या रु पेरी पडद्यावरच्या तारे तारकांनी आयव्हरी अर्थातच आॅफ व्हाईट रंगाचे कपडे घातले होते.
शिल्पा शेट्टी आॅफ व्हाईट स्ट्रॅप टॉप आणि एम्ब्रॉयडरी असलेल्या पलाझो मध्ये सुंदर दिसली. प्रिंसेस कट असलेल्या टॉपवर तिनं घातलेलं मिल्टकलर बटणचं कॉन्ट्रास्ट छान दिसलं. नाजूक आणि रेखीव गोंडे लावलेला दुपट्टा आणि पलॅझोला असलेली एम्ब्रॉयडरी सुरेख दिसली. केशरी पोटली आणि कानात चांदबाली घालून शिल्पा सुरेख दिसली.
जॅकलीन फर्नाण्डिसचा अतिशय साधा लुक मोहून टाकणारा होता. डिझाईनर अनामिका खन्ना ने डिझाईन केलेल्या आॅल ओव्हर प्रिंटेड लेहेंगा चोलीत जॅकलिन सुरेख दिसली. तिची साधी टिकली, केसाचा बन आणि त्यावर माळलेला फुलांचा गजरा हे सारंच सूंदर दिसलं. खुबसूरती सादगी मे होती हैं हे तिने पटवून दिलं!
करिष्मा कपूरने पारंपारिक लेहेंगा चोली ला पसंती दिली. भरजरी लेहेंगा, लांब बाह्यांचं ब्लाऊज आणि ट्रॅँनपॅरण्ट टिशुचा दुप्पटा करिष्मा वर खुलून दिसला. त्यावर वापरलेले कानातले डूल, वेल आणि केसांची वेणी अतिशय सोज्वळ दिसली. सोनेरी पोटली आणि कंगन हे सोबत होतंच.
म्हटलं तर हे लूक साधे होते, पण सेलिब्रेशन मूडला साजेसे. आधुनिकही, पारंपरिकही. ट्राय करुन पहा.

Web Title:  Sonam kapoor sangeet ceremony