शूट इट! फोकस्ड असणं हे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यात उपयोगी ठरतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:04 IST2017-11-08T18:45:25+5:302017-11-09T11:04:02+5:30
भारतीय नेमबाजी संघाच्या एअर पिस्टल प्रकाराच्या आंतराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गो-हे यांची खास भेट. मोनाली गो-हे. भारतीय एअर पिस्टल संघाची कोच.

शूट इट! फोकस्ड असणं हे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यात उपयोगी ठरतं...
- मेघना ढोके
भारतीय नेमबाजी संघाच्या एअर पिस्टल प्रकाराच्या आंतराष्ट्रीय प्रशिक्षक
मोनाली गो-हे यांची खास भेट.
मोनाली गो-हे.
भारतीय एअर पिस्टल संघाची कोच.
या संघाने नुकत्याच
आॅस्ट्रेलियात झालेल्या
राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत
दहा पदकांची कमाई केली.
क्लीन स्वीप करत
सुवर्ण-रौप्य-कांस्य पदक
जिंकण्याची कमालही करून दाखवली.
लक्ष्यभेद इतका अचूक की
या भारतीय शूटर्सच्या स्पर्धेत
कुणी टिकलं नाही.
आणि याच संघाच्या
तीन प्रशिक्षकांपैकी एक मोनाली.
ती सांगतेय,
फोकस्ड असणं हे
जगण्याच्या प्रत्येक टप्प्यात
कसं उपयोगी ठरतं...
लक्ष्य गाठावं तर इतकं अचूक..
- असं वाटावं इतके ‘सोन्याचे’ दिवस भारतीय नेमबाजीला आल्याचं आॅस्ट्रेलियात अलीकडेच सिद्ध झालं..
कमाल केली भारतीय शूटर्सनी.
आॅस्ट्रेलियात ब्रिस्बेन येथे झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी थोडीथोडकी नाही तर २० पदकांची कमाई केली. राष्ट्रकुलदेशांत शूटिंग चॅम्पिअन म्हणून आपलं वर्चस्व निर्विवाद सिद्ध केलं..
एकेका प्रकारांत क्लीन स्वीप देण्याची कमालही या शूटर्सनी केली. म्हणजे काय तर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदकं भारतीय शूटर्सनेच कमावली. बाकी कुणी त्यांच्या स्पर्धेतही टिकलं नाही..
कसं जमलं हे?
आंतराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत प्रचंड प्रेशर सहन करत आपली गुणवत्ता अशी अचूक वापरत लक्ष्यभेद करणं कसं साधलं?
असे प्रश्न घेऊन ‘आॅक्सिजन’ने खास भेट घेतली मोनाली गो-हेची !
मोनाली. भारतीय एअर पिस्टल संघाची कोच. अत्यंत तरुण वयात मोनालीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोच म्हणून जबाबदारी उत्तम निभावली आहेच; पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग जजही आहे. नेमबाज ते कोच म्हणजेच खेळाडू ते प्रशिक्षक हा प्रवास मोनालीनं अत्यंत कमी वयात तर केलाच; पण आंतरराष्ट्रीय दस्तरावर खेळणाºया खेळाडूंची प्रशिक्षक म्हणून काम करताना, सर्व प्रशासकीय जबाबदाºया उत्तम पार पाडताना आणि खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना मोनालीच्याही खिलाडूवृत्तीचा कस लागतोच..
मोनाली म्हणते तसं, ‘एक क्षण, त्यात पूर्ण लक्ष्य हे शूटिंगचं तत्त्व जगण्याची कुठलीही परिस्थिती हाताळताना महत्त्वाचं ठरतंच !’
ते कसं ठरतं?
आंतरराष्टÑीय स्तरावर नेमबाज जेव्हा खेळतात तेव्हा त्यांना कुठल्या प्रकारचा मानसिक सराव दिलेला असतो. ते कसं पाहतात प्रत्येक शॉटकडे, प्रत्येक टार्गेटकडे आणि लक्ष्यभेद करण्याच्या आपल्या तंत्राकडे?
आणि मुख्य म्हणजे हे असं ‘फोकस्ड’ असणं ते शिकतात कसं?
याच साºयासंदर्भात ‘आॅक्सिजन’ने मोनालीशी विशेष गप्पा मारल्या..
आणि लक्षात आलं की,
ती जे सांगतेय ते फक्त नेमबाजांसाठीच नाही तर आपल्याशी, आपल्या करिअरसाठी आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीसाठीही फार गरजेचं आहे..
ते समजून घेतलं आणि कृतीत उतरवलं तर कदाचित आपल्यालाही आपलं ‘लक्ष्य’ अचूक गाठता येऊ शकेल..
आणि काही नाहीच तर कळेल तरी की,
तंत्र आणि कौशल्य यात अत्यंत सरस असणारे खेळाडूही भूतकाळातलं यश आणि अपयश बाजूला ठेवून
किती ‘फोकस्ड’ राहतात..
आणि म्हणून जिंकतातही..
ते कसं, तेच तर मोनाली गो-हे सांगतेय..