शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
4
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
5
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
6
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
7
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
8
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
9
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
10
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
11
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
12
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
13
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
14
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
15
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
16
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
17
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
18
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
19
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
20
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाहा जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...

By admin | Updated: March 23, 2017 09:19 IST

ॠजुता दिवेकरला आता कोण ओळखत नाही? करिना कपूरच्या झिरो फिगरमुळे ती लोकांच्या लक्षात राहिली.

 इट लोकल

ॠजुता दिवेकरला आता कोण ओळखत नाही? करिना कपूरच्या झिरो फिगरमुळे ती लोकांच्या लक्षात राहिली. तिच्या सांगण्यामधलं मर्म एकच, ते म्हणजे आपल्या परंपरेनुसार चालत आलेल्या आहारातलं ज्ञानाला आठवा आणि त्याप्रमाणे वागा. ते खा.उगाच अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी काहीतरी अमुक शेक, तमुक सलाड खायला सांगितलं, किंवा किनोआ खाल्लं तर आपलं वजन कमी होईल म्हणून ते करा असं करू नका. त्यापेक्षा तुमच्या आहाराबरोबरच सवयींकडे डोळसपणे पाहायला हवं. आपल्या आईने आणि तिच्या आईने सांगितलेलं पिढीजात शहाणपण विसरू नका. आपल्याकडच्या सवयींमध्ये उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं तिच्या पुस्तकांमध्ये ती म्हणते. तिची अनेक पुस्तकं मराठीमध्येदेखील अनुवादित झाली आहेत.पण आता लिखित माध्यम सोडून ॠजुता तिच्या वाचक वर्गाला भेटायला यू ट्यूबच्या माध्यमातून देखील येते. ॠजुता आॅफिशियल नावाच्या तिच्या आॅफिशियल यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. तिनं आजपर्यंत विविध प्रसार माध्यमांना दिलेल्या सर्व मुलाखती तिथं पाहायला मिळतात. इंडियन फूड विझडम नावाच्या फिल्मचे काही भागही बघायला मिळतात. या भागांमध्ये ती भारतीय खाद्यपरंपरेविषयी आपल्याला सांगते. या चॅनेलमध्ये व्यायामप्रकार कसे करावेत याबद्दलही ॠजुता सांगते.तेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा नसेल अगर तुम्हाला फिट रहायचं असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला खायला आवडत असेल किंवा आहारशास्त्रामध्ये रस असेल तर ॠजुताचं चॅनल पाहता येईल!

 
 
 

४५० किलो वजनाचा माणूस

मार्च महिना उजाडला, नवीन वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटत आले. वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ‘यावर्षी मी सॉलिड फिट राहणार, अमुक-तमुक एवढं वजन कमी करणार’, असा निश्चय केला त्यांचा निश्चय कुठपर्यंत आला? हा प्रश्न विचारल्याबद्दल अनेक लोक मला शिव्या देतील किंवा काहीही कारणं देत उत्तरं टाळतील. आणि हो, या उत्तरं टाळणाऱ्या लोकांमध्ये मीसुद्धा आहे बरं का!! पण पॉलमेसन नामक गृहस्थाने अशी टाळाटाळ नाही केली कधी. अहो, अशी टाळाटाळ करणं त्याच्या जिवावरचं बेतलं असतं. पण तीन वर्षांपूर्वी पॉलने ठरवलं की त्याला मरायचं नाहीये. पॉल हा इंग्लंडमध्ये एका छोट्याशा खेड्यात राहत असे. झोपण्यासाठी दोन प्रचंड पडदे शिवून तयार केलेली एक चादर. अंगावर अनेक जखमा. या सगळ्यामध्ये पॉल केवळ त्याच्या १० फूट बाय १० फुटाच्या पलंगावर पडून राहायचं काम करायचा. तो अजून करणार तरी काय? कारण तो जगातल्या सर्वात लठ्ठ माणूस म्हणून कुप्रसिद्ध होता. पॉलचं वजन जवळजवळ ४५० किलो होतं. आणि या एवढ्या प्रचंड देहाला पोसण्यासाठी तो रोज २०,००० उष्मांकांचं खाद्य खात असे. (साधारणपणे माणूस १८०० ते २२०० उष्मांक खातो.) म्हणजे तो माणसाच्या दहापट अन्न खात असे. त्याला आपापलं उठता येत नव्हतं, आपापलं काहीही करता येत नव्हतं. सगळं करण्यासाठी माणूस आणि मुख्य म्हणजे जगभरात नामुष्की. काही वर्षांपूर्वी त्याच्या त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याने स्वत:ला संपवायचं ठरवलं आणि दोन माणसं मारू शकेल एवढा विषाचा डोस घेतला. पण हे विषही त्याला मारू शकलं नाही. पण वजन कमी करण्यापेक्षा त्याने स्वत:ला संपवणं योग्य समजलं. हे कितीतरी दु:खदायी आहे! पण हळूहळू त्याचं मत बदलायला लागलं. सर्जरी करून वजन कमी करावं असं त्यानं ठरवलं. पण या एवढ्या वजनात त्याला सर्जरी करून घेणंही अवघड होतं. मग त्यानं त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि सर्जरी करण्यापुरतं का होईना वजन कमी करायचे प्रयत्न केले. त्यानंतर त्याने काय कष्ट घेतले, कोणाकोणाची मदत घेतली, आपल्या शरीराबरोबरच मनाला कशी शिस्त लावली हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा http://www.gq.com/story/how-the-worlds-heaviest-man-lost-it-all

प्रज्ञा शिदोरे, (pradnya.shidore@gmail.com)

कॉपी पेस्ट रे...

सोशल मिडियात ना अनेकजण फक्त अनुकरण करतात. म्हणजे विषय कुठलाही असो, माहिती असो नसो, मत असो नसो दिसला विषय की ठोक लाइक, ठोक कमेण्ट! गेल्या आठवड्यात एक असाच ट्रेण्ड आला.. इलेक्शन निकालाचा काळ. त्यानंतरच्या घडामोडी. आता यूपी ते गोवा सगळ्या राज्यांची बित्तंबातमी कुठची साऱ्यांना कळायला? गल्लीत काय होतं अनेकांना माहिती नसतं, पण आपण कसे तज्ज्ञ म्हणून मग मत मांडायलाच हवेत. त्यावर इलाज काय तर कॉपी पेस्ट! वर्तमानपत्रांच्या साइट्स, पोर्टल, ब्लॉग, कुणाकुणाच्या व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट धपाधप कॉपी होत फिरू लागल्या. त्यात व्हॉट्सअ‍ॅपवरही चक्करा मारू लागल्या. आणि एकूणच कॉपी-पेस्टचा नुस्ता महापूर आला.. जगभरात सध्या कण्टेट कॉपी-पेस्ट ही एक मोठी समस्या म्हणून पाहिली जाते. गेल्या आठवड्यात हा ढापूपणा आपल्याकडे लक्षात यावा इतका ठळक होता. - निशांत महाजन मागच्या अंकातली लिहा..मनमोकळं मनापासून! ही चौकट आणि फेसबूक पेज लाईक करा ही चौकट कृपया रिपीट करावी. - निशांत महाजन