सारा खानच्या कुर्त्याची ही कोणती नवीन स्टाइल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:34 IST2018-07-12T15:33:48+5:302018-07-12T15:34:59+5:30
स्कर्ट आणि जीन्सवर घालायचे हे टॉप्स. फॅशनच्या दुनियेत त्याला ब्लाऊज म्हणतात. कॉलेज तरुणींनी हा प्रकार नक्की ट्राय करून पहावा.

सारा खानच्या कुर्त्याची ही कोणती नवीन स्टाइल?
- श्रुती साठे
ब्लाऊज म्हणलं की आपल्या डोळ्यांपुढे येतं साडीवरचं टिपिकल मोठय़ा बाह्यांचं, अंगाला टाईट बसणारं, प्लेन, प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाऊज. पण आता परिभाषा बदलू लागल्या आहेत. ब्लाऊज या प्रकारात अनेक स्टाइल्स येतात. फॅशनच्या दुनियेत आणि पाश्चिमात्य देशात जीन्स किंवा स्कर्टवर वापरायच्या टॉप्सला देखील ब्लाऊज म्हणतात. थोडं फेमिनाइन, लेस, एम्ब्रॉयडरी, वेगळ्या बाह्या असलेला हटके टॉप हा ब्लाऊज म्हणून ओळखला जातो. सारा अली खानची ही स्टाइल पाहा. यलो ब्लाऊजमधला कूल लूक.
कॉलेज तरुणींसाठी एकदम मस्त. डिझायनर अबू जानी- संदीप खोसला यांनी डिझाइन केलेलं फ्रेश पिवळ्या रंगाचं ब्लाऊज खुलून दिसलं. मोठी पीटर पॅन कॉलर आणि लांब, फुललेली बलून स्लीव्ह हे या ब्लाऊजचं वेगळेपण होतं. नेहमीच्या डेनिम आणि टॉपमध्ये ट्रेंडी दिसायचं असेल तर ब्राइट रंग, क्रॉप लेन्थ, स्लीव्हलेस, कोल्ड शोल्डर बाह्या, कॉलर, लेस वर्क हे पावसाळ्यासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे! नक्की ट्राय करून पाहा.