शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
3
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
4
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
5
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
6
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
7
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
8
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
9
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
10
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
11
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
13
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
14
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
15
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
16
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
17
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
18
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
19
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
20
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'तो' धोनीला पर्याय ठरेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:48 IST

महेंद्रसिंह धोनी येण्यापूर्वीपासून भारतीय क्रि केटपुढे मोठा प्रश्न असायचा तो विकेटकिपर बॅट्समनचा, धोनी निवृत्त झाल्यावर पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे

ठळक मुद्देकेरळचा हा खेळाडू, संजू सॅमसन. बोलतो फक्त बॅटने.

- अभिजित पानसे

केरळमधून राष्ट्रीय भारतीय क्रि केट संघात आलेले यापूर्वीचे दोन क्रि केटर म्हणजे टिनू योहानन आणि केरळी तडतडा मसाला श्रीशांत. अजून एक तिसराही आहे. भारतीय संघात अद्याप न स्थिरावलेला किंबहुना योग्य संधीच न मिळालेला हा खेळाडू. गेल्या सात वर्षापासून तो भारतीय संघाचे दरवाजे सतत ठोठावतोय. आयपीएलमध्ये दरवर्षी चित्तवेधक कामगिरीही करतो. यावर्षीही यूएईमध्ये होत असलेल्या आयपीएलमध्ये अबुधाबीच्या उसळत्या, दुबईच्या संथ आणि  शारजाच्या सपाट खेळपट्टीवर त्याची कामगिरी उत्तम आहे. हा खेळाडू म्हणजे संजू सॅमसन.

काही खेळाडू तोंडानं अतिवटवट करतात, कॅमेरा स्वत:कडे सतत असावा म्हणून लाऊड बॉडी लँग्वेज वापरत स्वत:ची फेस व्हॅल्यू वाढवत असतात. त्यातूनच त्यांना ब्रँड, जाहिराती मिळतात; पण काही खेळाडू फक्त आपल्या खेळाद्वारे आपली उंची आणि मूल्यवर्धन करतात. त्यांच्या फेस व्हॅल्यूपेक्षा ते त्यांच्या विकेटला व्हॅल्यू देतात. संजू सॅमसन या दुस:या वर्गातला खेळाडू आहे.  काही दिवसांपूर्वी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरु द्ध पंजाब सुपरकिंग्ज सामन्यात पंजाब सुपरकिंग्जच्या पुरनने हवेत सीमारेषेपलीकडे जाऊन जबरदस्त फिल्डिंग केली. सचिन तेंडुलकरनंही ट्विट करत म्हटलं की त्याने आजवरील बघितलेला हा सर्वोत्तम  ‘सेव्ह’ आहे. पण याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरु द्ध झालेल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यात संजू सॅमसनने रॉस टेलरचा तुफान कॅच सीमारेषेपलीकडे जाऊन हवेत जमिनीशी आडवा समांतर होऊन पकडल होता; पण तो सिक्स होणार यामुळे संजूने हवेतच बॉल बाहेर मैदानात टाकला व सिक्स वाचवला. ती फिल्डिंग आणि  प्रसंगावधान बघून सर्वच चकित झाले. संजू सॅमसन अफाट फिल्डर आहे. याशिवाय तो विकेट किपिंगही करतो. फारु ख इंजिनिअर जे भारताचे एक श्रेष्ठ खेळाडू, त्यांनी मागच्या वर्षी म्हटलं होतं की,  ‘ संजू सॅमसन हा पुढचा धोनी आहे.’ शेन वॉर्न, शेन वॉट्सन, राहुल द्रविड, हर्ष भोगले सगळ्यांनी संजूचं कौतुक केलं आहे. 2क्13 मध्ये आयपीएलमधून पदार्पण करणा:या सॅमसननं आपल्या पहिल्या मॅचपासून क्रि केट तज्ज्ञांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमधील दुस:याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरु द्ध मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनला तिस:या क्र मांकावर बढती देण्यात आली होती. त्या मॅचमध्ये त्याने अफलातून बॅटिंग करत सामना जिंकून दिला होता आणि मॅन ऑफ द मॅच झाला होता.2क्15 र्पयत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने शंभर टक्के योगदान दिलं.  2क्17 मध्ये संजू सॅमसनने त्याने आयपीएलमध्ये पहिलेवहिले पुणो सुपर  जायंटविरुद्ध शतक ठोकलं. 2क्18 मध्येही त्याचा खेळ उत्तम झाला. मागच्या वर्षी हैदराबाद सनरायजर्सविरु द्ध अफाट बॅटिंग करत केवळ पंचावन्न बॉल्समध्ये शतक केलं होतं. संजूकडे क्रि केटमधील सर्व शॉट्स आहेत हे पुन्हा या इनिंगनंतर दिसलं. कित्येकदा तो ऑरेंज कॅप होल्डरच्या स्पर्धेत असतो.

प्रत्येकवेळी आपले सर्वोत्तम देणा:या सॅमसनला अजूनही राष्ट्रीय संघात स्थिरावण्यास हवी तशी संधी दिली गेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ट्वेन्टी-ट्वेन्टी मॅचमध्ये आपल्या घरच्या मैदानावर, तिरूवनंतपुरममध्ये योगायोगानं संधी मिळाली होती. वेळेवर शिखर धवन जखमी झाल्याने संजूला संधी मिळाली. आपल्या पहिल्याच बॉलवर त्याने उत्तुंग षट्कार मारला, पण दुस:याच बॉलवर तो आऊट झाला. त्यानंतर यावर्षी झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध तो सलामीला आला होता; पण तो आपल्या बॅटनं चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला, पण आपल्या क्षेत्ररक्षणानं मात्र सगळ्यांना अवाक् केलं.महेंद्रसिंह धोनी निवृत्त झाला आहे. ¬षभ पंत विकेटकिपर व बॅट्समन म्हणून अपरिपक्व आहे हे त्याला सतत संधी देऊनही स्पष्ट झालं आहे.शिखर धवन गेल्या आठ वर्षापासून एकसुरी बॅटिंग करत आहे. मनीष पांडे फिल्डर चांगला पण बॅट्समन म्हणून सातत्यहीन. पृथ्वी शॉ ऑफ साइडला सशक्त पण लेग साइडला कमकुवत. अशावेळी संजू सॅमसन हा एक उत्तम पर्याय आहे. महेंद्रसिंह धोनी येण्यापूर्वीपासून भारतीय क्रि केटपुढे मोठा प्रश्न असायचा तो विकेटकिपर बॅट्समनचा, धोनी निवृत्त झाल्यावर पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. या सगळ्यांवर संजू सॅमसन हा सर्वोत्तम उत्तर असू शकतो. नम्र, संघासाठी शंभर टक्के देणारा, अफाट क्षेत्ररक्षक, भात्यात सर्व शॉट्स असलेला जबरदस्त परिपूर्ण बॅट्समन तो आहे.  संजू सॅमसनचा वसीम जाफर किंवा अजिंक्य राहणो होऊ नये म्हणून पूर्ण भरात असतानाच त्याला भारतीय संधी मिळायला हवी.अर्थात, ती मिळेल तेव्हा मिळेल आता तरी आयपीएलमध्ये तो धमाका करतो आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)