अंतराळात आता मानवी रोबोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:10 IST2019-08-29T07:10:00+5:302019-08-29T07:10:03+5:30

जी कामं करताना अंतराळवीरांना धोका संभवतो, ती कामं करायला थेट रोबोटच अवकाशात जातोय.

Russian-humanoid-robot-in-international-space-station | अंतराळात आता मानवी रोबोट!

अंतराळात आता मानवी रोबोट!

ठळक मुद्देहा स्कायबॉट साधारण दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहे

- प्रसाद ताम्हनकर

अंतराळात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस) दोन दशकांपूर्वी यशस्वीपणे कार्यरत झाले. या दोन दशकात विविध देशांच्या अनेक अंतराळवीरांनी इथे राहून आपापली शोधकार्ये उत्तम केली. यावेळी या अवकाश स्थानकाला एक अनोखा पाहुणा भेट देतो आहे. 
हा पाहुणा म्हणजे कोणी मानवी अंतराळवीर नसून, चक्क एक मानवी रोबोट आहे. 
नुकतेच कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रॉम इथून रशियाच्या अवकाश संस्थेने (रॉस्कोसमॉसने) या ह्युमनॉइड रोबोटचं यशस्वी लाँचिंग केलं. स्कायबॉट एफ-850 असं नाव या रोबोटला देण्यात आलं आहे. यानिमित्ताने रॉस्कोसमॉसने आपल्या अपडेटेट सूयोझ 2.1 या अद्ययावत रॉकेटचीदेखील चाचणी पार पाडली. रॉस्कोसमॉसने केलेल्या ट्विटनुसार ही संस्था पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस)शी डॉकिंग करण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी केलेला त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला होता. मात्र आता या स्कायबॉटकडेच या यानाचे सारथ्य देण्यात आले होतं जे त्यानं यशस्वीपणे पार पाडलं. क्रू-मेंबर म्हणून त्याला पाठविण्यात आलं आहे. मानवी अंतराळवीरांसाठी धोकेदायक असलेली अवकाश स्थानकाशी संबंधित काही कामं या रोबोटच्या मदतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठीच हा रोबोट रवाना झाला आहे. एका वृत्तानुसार या स्कायबॉटचे वजन 165 किलो असून, उंची 5 फूट 11 इंच आहे. या रोबोटला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीदेखील जोड देण्यात आलेली आहे. यापूर्वी हा रोबोट काही जाहिरातींमध्ये तसेच ऑनलाइन व्हिडीओमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी शस्त्नास्त्रांचे प्रशिक्षण घेताना दिसला होता. FEDOR (Final Experimental Demonstration Object Research)   अशी व्याख्या करण्यात आलेल्या या रोबोटला काही योग्य ते बदल करून उड्डाणाच्या वेळी पायलट सीटला चक्क बांधण्यात आले होते. अर्थात, त्याचं काम त्यानं चोख बजावलंच. हा स्कायबॉट साधारण दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहे. या काळात त्याला विविध अवजारे, जसे की स्पॅनर, अगिAशमनयंत्न यांचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी नासाने Robonaut 2 (R2), Robonaut 1 (R1)  असे रोबोट्स आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठवलेले होते.
आता हे रोबोट तिथं कसं काम करतात हे लवकरच दिसेल!

 

Web Title: Russian-humanoid-robot-in-international-space-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.