शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रोबोटिक गर्ल्स  गॅँग - अफगाणिस्तानात स्वस्त व्हेंटीलेटर्स  बनवणाऱ्या तरुण मुलींची जिगरबाज गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:39 IST

अफगाण ड्रीमर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  या मुली. वय वर्षे 14 ते 17. कोरोनासंदर्भात राष्ट्रप्रमुख बैठक बोलावतात, तर त्यावेळी त्यांनाही आमंत्रण देतात. आणि त्या म्हणतात, आम्ही स्वस्त व्हेण्टिलेटर्स बनवून देतो.

ठळक मुद्देप्रतिकूल आव्हानांवर मात करत रोबोटिक टीमनं केलेलं हे कार्य विधायकच नाही तर  अफगाण पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे.

कलीम अजीम

कोरोना संकटाच्या काळात जगभरात व्हेंटिलेटरची समस्या भेडसावत आहे. ही महागडी व्हेंटिलेटर्स गरीब देश क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करू शकत नाही.  युद्धाने आणि दहशतीने पिचलेल्या या देशातही कोरोना पोहोचलाच. या संकटाशी दोन हात करण्यासाठी अफगाणी तरुणींनी एक अनोखी शक्कल लढवली. कारचे स्पेअर पार्ट जुळवून या अफगाण मुलींनी व्हेंटिलेटर तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहे.पाच सदस्यीय मुलींच्या या टीमला ‘रोबोटिक्स  गर्ल्स गॅँग’ म्हटलं जात आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि स्थानिक हेल्थ एक्सपर्ट सोबत हे सदस्य या प्रोजेक्टवर काम करत आहेत.एका प्रतिष्ठित टेक कंपनीनं या टीमला साधन-सामग्री पुरवत मदत केली आहे. हे बहुप्रतिक्षित प्रॉडक्ट्स मैसेचुसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीनं दिलेल्या डिझाइनच्या आधारावर तयार  करण्यात येत आहेत.मार्च महिन्यात अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. व्हायरसनं हेरात प्रांतात सर्वाधिक लोकांना बाधित केलं आहे. या आजारामुळे आतार्पयत 7,65क् हून अधिक बाधित, तर 178 जणांचा मृत्यू झाला.बीबीसीच्या मते 3.5 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात फक्त 4क्क् व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाचा धोका लक्षात येताच हेरातचे राज्यपाल अब्दुल कय्युम रहिमी यांनी एक्सपर्टची एक बैठक बोलावली. त्यात डॉक्टर, पीएचडी स्कॉलर, ग्रॅज्युएट्स, स्थानिक उद्योजक आणि संशोधक सहभागी झाले होते. त्यांच्यासह रोबोटिक्स गल्र्सनादेखील बोलावण्यात आलं होतं.या टीमनं 2क्17 मध्ये अमेरिकेत एका यांत्रिक शोध प्रकल्पात पुरस्कार पटकावला होता.उपलब्ध असलेल्या बॅग-वाल्व-मास्क या कृत्रिम श्वसनयंत्नाच्या मर्यादेबद्दल या मीटिंगमध्ये चर्चा झाली. नाकाला लावलेली ही एक छोटीशी श्वसन पिशवी असते. त्यातून प्रेशरच्या साहाय्याने नाक व फुफ्फुसार्पयत श्वास पोहचवला जातो. हे डिवाइस बरंच स्वस्त आणि  सामान्य आहे.रुग्णांना श्वास घेण्यास मदतीसाठी अॅम्ब्युलन्स आणि इमर्जन्सी काळात ते वापरलं जातं. त्या बैठकीत चर्चेअंती असं ठरलं की देशात व्हेंटिलेटर्स तयार केले जावेत.अर्थातच रोबोटिक्स गल्र्स गॅँगच्या चमूनं यासाठी पुढाकार घेतला. बाइक आणि कारच्या स्पेअर पार्ट्समधून हे उपकरण तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली. आणि टीमनं कामाला सुरुवात केली.विशेष म्हणजे या रोबोटिक टीममध्ये असणा:या मुली या 14 ते 17 वयोगटातील आहेत. टीमची 17 वर्षीय सदस्य डिझाइनर रोया महेबूब म्हणते, ‘राज्यपालांच्या मंजुरीनंतर ओपन सोर्सच्या माध्यमातून ऑनलाइन डिझाइन शोधण्याचं काम सुरू झालं. त्यातून काही डिझाइन हाती लागली.’टीमची कॅप्टन सुमय्या फारूकी म्हणते, ‘आम्ही मुद्दाम असं डिझाइन निवडलं, जिथं कमी तंत्नज्ञान आणि त्याचे पार्ट्स सहजरीत्या कुठेही मिळू शकतील. जेणोकरून कमी वेळात ते तयार करता येईल.’ या डिवाइससाठी मायक्रो प्रोसेसर इन्स्टॉल करण्याची गरज होती. ती निकड किशोरवयीन मुलांसाठी तयार केलेल्या रोबोटिक्स किटमधून भागू शकली.

नेमकं कुठली कार्यपद्धती ही टीम वापरत आहे, याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही. पण टोयोटा ब्रँडची कोरोला कारची मोटर आणि होंडा बाइकच्या चेन ड्राइव्हच्या वापरातून हे एक डिवाइस तयार करण्यात आल्याचं कळतं.

न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत टीम प्रमुख सुमय्या सांगते, या डिवाइसचा महत्त्वाचा पार्ट अंबू बॅग तयार करणं हे  एक आव्हान होतं. पेशंटचं वय व त्याची श्वासाची गरज पाहता आरोग्य सेवक त्याचं प्रेशर निश्चित करत. पण यावर तोडगा म्हणून आम्ही ऑटोमॅटिक व्हेंटिलेटर तयार केलं.हार्वर्ड विद्यापीठातील सर्जन डग्लस चिन यांनी अफगाण रोबोटिक टीमला मदत करण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणतात, ‘अस्तित्वात असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत साधारणत: 5क्,क्क्क् डॉलर आहे. त्या तुलनेत हे व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी सुमारे 5क्क् डॉलरचा खर्च येऊ शकतो.’रोबोटिक गल्र्सच्या या प्रयोगावर काही तज्ज्ञांनी शंका व्यक्त करत म्हटले की, या डिझाइनला एफडीएची मान्यता मिळणं कठीण आहे. पण या टीमकडे देशातील नागरिकांचे आयुष्य वाचवण्यासाठी याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्धही नाहीये.उत्तम क्वालिटीचं व्हेंटिलेटर उपलब्ध न होऊ शकल्यास हे उपकरण श्वसनाचा त्नास कमी करून जगण्यासाठी धडपडत असलेल्या पेशंटला तत्काळ दिलासा मिळवून देऊ शकतं, असं या कोरोना वॉरियर्सच म्हणतात. गेल्या सहा आठवडय़ांपासून टीम या डिवाइसवर अहोरात्न मेहनत घेत आहे.या डिवाइसचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एप्रिल महिन्यात त्याला डब्ल्यूएचओकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलं होतं. गेल्या आठवडय़ात त्याची फायनल चाचणी घेण्यात आली. दुस:या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.या उपरकरणासाठी केवळ 28 हजार 8क्क् रुपये खर्च आलेला आहे. कोरोना संकटात हे कमी खर्चातलं व्हेंटिलेटर तयार करून आपण काही मदत करू  शकलो याचा या मुलींना अभिमान वाटतो आहे.अफगाण ड्रीमर्स म्हणून ओळखल्या जात असलेल्या या रोबोटिक टीमचं लक्ष्य आता जगाला कमी किमतीत व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याचं आहे. टीम म्हणते की, ‘आमचा भविष्यात असं व्हेंटिलेटर तयार करण्याचा प्रयत्न आहे, जो गरीब देश केवळ 45 हजार रु पयात खरेदी करू शकेल.’या तरुण अफगाण मुली आपल्या देशाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तान गेल्या दोन दशकापासून युद्ध व दहशतीच्या छायेखाली जगत आहे. आकडेवारी सांगते की, तिथं महिला शिक्षणाचं प्रमाण केवळ 3क् टक्के आहे. अशा प्रकारच्या प्रतिकूल आव्हानांवर मात करत रोबोटिक टीमनं केलेलं हे कार्य विधायकच नाही तर  अफगाण पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे.

 

(कलीम मुक्त पत्रकार आहे.)