reskilling & upskilling - what exactly it means. | reskilling & upskilling म्हणजे नक्की करायचं काय?

reskilling & upskilling म्हणजे नक्की करायचं काय?

ठळक मुद्देआपलं काम वरच्या स्तरात नेण्याचा, दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणं. 

जागतिक युवा कौशल्य दिवस आणि स्किल इंडियाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) तरुणांना एक व्हिडिओ संदेश दिला. त्यात ते म्हणतात, जगात अशाच माणसांना यश मिळतं जे सतत नवनवीन स्किल्स शिकत राहिले, तेच जग जिंकू  शकले. नव्या काळात ‘रिलेव्हण्ट’ राहणं ही मोठी गोष्ट आहे त्यासाठी नवनवीन स्किल्स शिकत राहावी लागतील. कौशल्य ही आपणच आपल्याला दिलेली एक मौल्यवान भेट आहे. त्यासाठी ते तरुणांना एक संदेशही देतात. एक मंत्र सांगतात. स्किल, री-स्किल आणि अप-स्किल.
हा मंत्र सोबत असेल आणि सतत कौशल्य शिकत, विस्तारत गेले तर अनेक संधी समोर येतील असं त्यांनी आपल्या व्हिडिओतून सांगितलं.
यातलं स्किल अर्थात कौशल्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ‘कुशल’ कामगार मिळत नाहीत अशी तक्रारही वारंवार दिसते. त्यामुळे काम करण्यासाठीचं आवश्यक स्किल्स-कौशल्य यासह सॉफ्ट स्किल्सही शिकणं किती महत्त्वाचं आहे याविषयी नेहमीच चर्चा होते.
मात्र री-स्किल आणि अप-स्किल करणं म्हणजे नक्की काय?
साधं गुगल करून पाहिलं तरी याविषयात सध्या अनेक  संस्था, कंपन्या आपल्या कर्मचा:यांसाठी काम करत आहेत.


री-स्किलिंग  म्हणजे काय?
1. पंतप्रधान म्हणाले तसं एक कौशल्य शिकलं, तेच कायम वापरलं असं करून चालणार नाही तर री स्किल म्हणजे आपण जे कौशल्य शिकलो आहोत, त्यात वारंवार सुधारणा करणं. 
2. आपल्याला अवगत आहेत त्या कौशल्यात भर घालत त्यातून नव्या गोष्टी करणं. नव्या गोष्टी त्या कौशल्याला पूरक -पोषक म्हणून शिकणं. 
3. आपण जे कौशल्य शिकलो, त्याच्याशी संबंधित कामच संपून जाईल अशी शक्यता याकाळात अधिक आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्याचा अंदाज घेऊन आपल्या कर्मचा:यांसाठी हे री-स्कि लिंग हल्ली करतात. 
4.  आधीच्या कौशल्यासोबत नवीन कौशल्य शिकवून ते कामासाठी ‘रिलेव्हण्ट’ कसे राहतील, हातचं काम कसं जाणार नाही याचा विचार केला जातो.
5. आपल्या कामात काय टेक्नालॉजी येऊ घातली आहे याचा विचार करून आपल्यासाठी नवीन स्किल शिकणं म्हणजे रि-स्किलिंग.

 


अप स्किलिंग  म्हणजे काय?

1. नवीन कौशल्य शिकून काम बदल करता येणंही शक्य आहे. रि-स्किलिंगमध्ये अनेकदा तेच होतं.
2. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जो आपल्या कामाचा विषय आहे त्यात आधुनिकता आणणं. 
3. त्यातून आधी कधीच न केलेलं काम करून पाहणं, कामाची जबाबदारी घेत त्यात अधिक कल्पकतेनं, नव्या कौशल्यासह नवीन गोष्टी करणं आणि त्यासाठी एखादा अभ्यासक्रम शिकणं, नव्या पद्धती, तंत्रज्ञान शिकून घेणं 
4. .. आणि आपलं काम वरच्या स्तरात नेण्याचा, दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणं. 

Web Title: reskilling & upskilling - what exactly it means.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.