शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

#RaiseTheWage- अमेरिकेची तरुण सिनेटर जेव्हा वेतनासाठी लढते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 06:00 IST

29 वर्षाची अमेरिकन सिनेटर अ‍ॅलेक्झाण्ड्रिया. तिनं आता रेस्टॉरण्ट कर्मचार्‍यांच्या सन्मानजनक वेतनासाठी तिनं मोहीम उघडली आहे.

ठळक मुद्देसमान आणि सन्मानजनक वेतनासाठी जगभरात आकार घेत असलेली एक चळवळ

 कलिम अजीम

कामगार हक्कांसाठी जगभरात आजवर अनेक आंदोलनं झाली. रशियन व फ्रेंच राज्यक्र ांती याच लढय़ाचं फलित होते. मात्र गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेला हा लढा आजही सुरूच आहे. अमेरिकेतील दोन महिला सिनेटरनी (खासदार) ‘रेज द वेज अ‍ॅक्ट-2019’ विधेयक मांडून कामगारांच्या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधलं आहे. नुसतं विधेयक मांडून त्या शांत बसल्या नाहीत तर  त्यासाठी त्यांनी अनोखा लढा उभारला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात महिला कामगारांच्या समान वेतन अधिकारांवर चर्चा सुरू झाली आहे.सिनेटर अ‍ॅलेक्झाण्ड्रिया ओकासियो-कॉर्टेझ, वय फक्त 29 वर्षे. गेल्या मे महिन्यात त्या चक्क वेटरच्या रूपात एका मेक्सिकन हॉटेलात दिसल्या. त्यांनी न्यू यॉर्कमधील या हॉटेलमध्ये जाऊन वेटरसारखा ग्राहकांच्या टेबलावर पिझा सव्र्ह केला. ही अनोखी शक्कल त्यांनी हॉटेल कामगारांची सुरक्षा व पगारवाढीसाठी लढवली. यासाठी त्यांनी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 31 तारीख निवडली. पगाराच्या दिवशी त्यांनी रेस्टॉरंट मालकांना कामगारांची व्यथा समजून घेण्याची गळ घातली. कामगारांना समान वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही त्यांनी मालकांकडे केली. या अनोख्या आंदोलनाच्या निमित्ताने अमेरिकेत ‘रेज द वेज अ‍ॅक्ट-2019’ म्हणजे किमान वेतनवृद्धी कायद्यावर चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार फास्ट फूड आउटलेट्स, कॉल सेंटर, थियटर, दुकान, सलून, रेस्नं आणि  गॅरेजमधील कर्मचार्‍यांना जेमतेम एक डॉलर वेतन देतात. अ‍ॅलेक्झाण्ड्रिया यांच्या मते इतकं कमी वेतन ही गुलामी आहे. वेटरला सन्मानजनक पगार मिळाला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. हॉटेलमालकांनी कर्मचार्‍यांना तासाला 2 डॉलर 13 सेन्ट (2.13) म्हणजे इतपत तरी पैसे द्यायला हवेत अशी मागणी आहे. अजून एक  महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची हमी त्यांनी हॉटेलमालकाकडून घेतली. यासंदर्भात दि गार्डियनला दिलेल्या प्रतिक्रि येत त्या म्हणतात, ‘‘बहुतांश हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये महिला कर्मचार्‍यांचा छळ केला जातो. अधिकचं काम करूनही त्यांना योग्य पगार दिला जात नाही. अन्य पुरु ष सहकारी महिलांचे लैंगिक शोषणही करतात. रेस्टॉरंट मालकांनी ‘बी हर्ड एक्ट’ कायद्याअंतर्गत सुधारित सुरक्षा नियमावली जाहीर करावी.’’अ‍ॅलेक्झाण्ड्रिया सिनेटर होण्यापूर्वी बारटेंडर होत्या. हॉटेल कामगारांचं दुर्‍ख माहीत असल्यानं त्यांनी ही मोहीम सुरू केली. गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत, नोकरी करताना आपल्यावर सहकार्‍यांनी लैंगिक अत्याचार केल्याचंही त्या सांगतात. अर्थात सध्या तरी रेस्टॉरण्ट असोसिएशनने पगारवाढीची त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. मात्र तरीही आता अधिक जोमानं त्या चळवळीला गती देत आहेत. अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरीस यांनीही पुरुष कर्मचार्‍यांइतकंच वेतन महिलांना मिळावं म्हणून मागणी केली आहे. समान वेतनाचा प्रश्न अमेरिकतेतही गंभीर आहे. पुरु ष कर्मचार्‍यांच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जातो. हा भेदभाव दूर करून पगार समपातळीवर आणावा अशी मागणी जगभरात सुरू आहे. गेल्या वर्षी लंडनमध्ये बीबीसी या जगप्रसिद्ध मीडिया हाउसमध्ये महिला कर्मचार्‍यांनी समान वेतनासाठी ‘जेंडर पे गॅप’ मोहीम सुरू केली होती. त्यानंतर ब्रिटनच्या अनेक कंपन्यांमध्ये समान वेतनासाठी महिलांनी लढा उभा केला होता.जगभरात ‘जेंडर पे गॅप’ दूर करण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अमेरिकेच्या महिला खासदारांनी हा विषय संसदेत मांडल्याने हा विषय प्रशासकीय पातळीवर चर्चेला आला आहे. जगभरातून या महिला खासदारांना पाठिंबा मिळत असून, सोशल मीडियावर यूजर्झनी फं्र2ीळँीहंॅी मोहीम सुरू केली आहे.