शहरं
Join us  
Trending Stories
1
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
2
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
3
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
4
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
5
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
6
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
7
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

इन प्रेज ऑफ स्लोनेस हे पुस्तक वाचलंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 3:38 PM

स्पीडनं आपल्याला इतकं पछाडलंय त्याचे शरीर, मनावरचे परिणाम तर तपासा.

ठळक मुद्देतुम्हाला जर हा विषय असाच वेगात समजून घायचा असेल तर त्याचं टेड टॉकही तुम्ही यू टय़ूबवर ऐकू शकता. 

-प्रज्ञा शिदोरे    

आपण एका वेगवान जगात राहतो. आपल्याला सगळ्या गोष्टी ‘आज आत्ता ताबडतोब’ हव्या असतात. मग तो इंटरनेटचा स्पीड असो, व्हाट्सअ‍ॅपवरचा रिप्लाय असो, गाडीचा वेग असो किंवा आपली नाती असोत. सगळं इन्स्टंट! कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी ‘उपभोगाची’ सवय आपल्याला लागली आहे. ज्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यायलाच हवा तेदेखील आपल्याला वेगात हवंय सध्या. परवाच एक पाटी पाहिली - म्हणे ‘स्पीड-योगा’. हे सगळं हसायला ठीक आहे हो. पण ही गोष्ट हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. एवढं वेगात पळताना हा वेग आपल्या शरीरावर, मनावर काय परिणाम करत असतो हे आपल्याला कळतच नाही. आपण वेगवान आयुष्य तर जगतच असतो; पण चांगलं आयुष्य जगायला विसरूनच जातो. औद्योगिक क्र ांतीनंतर आपलं अख्खं जगच एका हायस्पीड गिअरमध्ये गेलं. आणि या वेगाच्या पंथामुळे आपण सगळे त्या वेगाचे भक्त एका कडेलोटावर येऊन थांबलो आहोत, असं ‘इन प्रेज ऑफ स्लोनेस’चा लेखक कार्ल ओनर म्हणतो. गांधींनी त्यांच्या ‘हिंद स्वराज्य’ हा पुस्तकात वेगवान आगगाडय़ांवरही ताशेरे मारले आहेत. त्यांच्या मते वेगामुळे होणारे मोठे बदल आपल्या मेंदूला पचत नाहीत आणि मग सगळाच लोचा होऊन बसतो. काहीशा याच विषयावर आधारित अशी ब्रिटनमध्ये ‘स्लो फूड’ मुव्हमेण्ट सुरू झाली. माणसाने अन्नाकडे अधिक समंजसपणे पाहावं आणि तसं करणं हेच आपल्या शरीरासाठी योग्य आहे, असं त्यांचं म्हणणं.    कार्ल ओनरचं हे पुस्तक आपल्याला सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघायला शिकवतं आणि त्याचं महत्त्व पटवतं. तुम्हाला जर हा विषय असाच वेगात समजून घायचा असेल तर त्याचं टेड टॉकही तुम्ही यू टय़ूबवर ऐकू शकता. बघा पटतंय का?