शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

आविष्कारचं पोर्टल

By admin | Updated: September 30, 2016 09:59 IST

कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिव्हलसाठीच बनवलं एक पोर्टल.

- भरत भुटाले

स्वप्न सत्यात उतरविण्याची तयारी असणारेच आव्हान स्वीकारतात आणि ती गोष्ट तडीस नेतात. हीच खासियत ‘केआयटी’च्या विद्यार्थ्यांची आहे. यावर्षीच्या प्रारंभी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेला (एनएसएस) आॅनलाइन स्वरूप देऊन शिवाजी विद्यापीठाला पोर्टल बनवून दिले. आता एमसीएच्या विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिव्हलचे पोर्टल बनविले असून, ते प्रायोगिक तत्त्वावर कुलगुरूंसमोर सादर केले आहे. या पोर्टलमुळे फेस्टिव्हलची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होणार आहे. त्याचबरोबर आॅनलाइनमुळे लाखो कागदांची बचत होणार असून, पर्यावरणपूरकतेच्या वाटचालीत आणखी एक पाऊल पडणार आहे.शिवाजी विद्यापीठातर्फे दरवर्षी यूथ फेस्टिव्हल साजरा केला जातो. कोल्हापूर, सांगली, सातारा कार्यक्षेत्र असलेल्या २८० कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा उपक्रम प्रत्येक वर्षी एका कॉलेजमध्ये आयोजिला जातो. यानिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी होतात. कार्यक्रम आयोजित करण्यापासून फॉर्म भरणे, त्यातील माहिती, फोटो, फी, तसेच शेवटी स्पर्धेचा निकाल, अशी खूप मोठी प्रक्रिया असते. पोर्टल टीममधील अक्षय मगदूम पोर्टलबद्दल उत्स्फूर्तपणे बोलत होता. शिवाजी विद्यापीठ व ‘केआयटी’चे अनेक माध्यमातून अटॅचमेंट असते. त्यातूनच यूथ फेस्टिव्हलसाठी पोर्टल बनविण्याची संकल्पना समोर आली. प्रा. अमित वैद्य यांनी आमच्यासमोर हा प्रस्ताव मांडला आणि आम्ही एमसीएच्या दहा जणांनी हे आव्हान स्वीकारलं. प्रा. मृदुला पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पोर्टलची निर्मिती केली. प्रारंभी शिवाजी विद्यापीठाच्या यूथ फेस्टिव्हलची माहितीपुस्तिका अभ्यासून ं२स्र.ल्ली३ ६्र३ँ टश्उ अ१ूँ्र३ीू३४१ी टेक्नॉलॉजीचा वापर करून पोर्टल बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर माहितीपुस्तिकेच्या आधारे डेटा इन्पुटची प्रक्रिया राबविली. त्यात स्पर्धकाचे नाव, जन्मतारीख, विद्यार्थ्याचा फोटो, पीआरएन, शिक्षण, संपर्क क्रमांक आणि पत्ता, तसेच नियमावली हे मुद्दे समाविष्ट केले. मथळ्यात शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरून डिझाइन तयार केले. या पोर्टलमुळे आॅनलाइन फॉर्म भरता येणार असून, तो सबमिट झाल्याची रिसिट मिळते. तसेच हा फॉर्म विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतर डी.एस.डब्ल्यू. (विद्यार्थी कल्याण मंडळ) विभागात त्याची लगेच पडताळणी होते. त्यामुळे अडीअडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.हे पोर्टल विद्यापीठाच्या डी.एस.डब्ल्यू. विभागात दोनवेळा सादर केल्यानंतर ही संकल्पना संबंधितांना पसंत पडली. त्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमोरही पोर्टलचे सादरीकरण केले. पोर्टलचे डिझाइन व रिपोर्ट जनरेशन, फंक्शन पाहून ते भारावून गेले. त्यांनी त्यात काही महत्त्वाच्या सूचना सुचविल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेले पोर्टल विद्यापीठाच्या मान्यतेनंतर महाविद्यालयांसाठी खुले केले जाणार आहे.(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)