पीच कलर लिपस्टिक सी ब्ल्यू काजळ
By Admin | Updated: September 25, 2014 16:16 IST2014-09-25T16:16:53+5:302014-09-25T16:16:53+5:30
नऊ दिवस तेच ते, तोच लूक. तस्साच मेकप. सगळ्यांचा सारखाच, साच्यातून काढल्यासारखा ! आपणही नऊ दिवस असेच टिपीकल दिसू नये असं वाटत असेल तर ह्या खास मेकप टिप्स, नऊ दिवस तुमचा लूक वेगळा, फ्रेश आणि सुंदर दिसेल याची खात्री बाळगा.

पीच कलर लिपस्टिक सी ब्ल्यू काजळ
>
- धनश्री संखे, ब्यूटि एक्सपर्ट
नऊ दिवस तेच ते, तोच लूक. तस्साच मेकप. सगळ्यांचा सारखाच, साच्यातून काढल्यासारखा !
आपणही नऊ दिवस असेच टिपीकल दिसू नये असं वाटत असेल तर ह्या खास मेकप टिप्स, नऊ दिवस तुमचा लूक वेगळा, फ्रेश आणि सुंदर दिसेल याची खात्री बाळगा.
१) मेकप करताना एक बेसिक तत्त्व लक्षात ठेवा, रात्री गरबा संपेपर्यंत तुमचा मेकप सुंदरच दिसला पाहिजे. नाहीतर येताहेत रंगाचे ओघळ चेहर्यावर असं होऊ नये. त्यात खेळताना घाम खूप येतो, त्यामुळे मेकप स्वेटप्रूफ आणि वॉटरप्रूफच असला पाहिजे.
२) मेकप करण्यापूर्वी तुमचा चेहर्याचं प्रॉपर क्लिंझिंग करायलाच हवं. त्यासाठी उत्तम क्लिंझर वापरा. तुमच्या स्किनसाठी चांगले असे टोनर वापरा. शक्यतो ‘पीच बॅलन्स्ड’ टोनर वापरणं उत्तम.
३) चेहर्यावर पुरेसं मॉयश्चर असणं महत्त्वाचं. चेहर्यावरचे स्कार्स, अँकने, पिगमेण्टेड स्पॉट्स लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलर लावणार असाल तर त्यासाठी चेहर्यावर मॉयश्चर असणं गरजेचं असतं. मेकप बेस लावताना लिक्विड फाउण्डेशन लावण्यापेक्षा क्रिम किंवा मूस फॉर्ममधलं लावा.
४) कपडे ब्राईट कलरचे असतात त्यामुळे मेकपही व्हायब्रण्टच असला पाहिजे. त्यामुळे ग्लिटर लूक हवा असेल तर हौस करून घ्या.
५) मुळात फार मेकप न करताही वेगळा लूक हवा असेल तर ९ दिवस वेगवेगळ्या कलर थिमला आयमेकप करा.
६) ब्रॉन्झ लूक मेकप हा दांडियातल्या पिवल्या हॅलोजन लाईटमधे जास्त चांगला दिसतो.
७) मॅट इफेक्ट आय श्ॉडो वापरू नका त्यापेक्षा क्रिमी शिमर, मेटॅलिक आयश्ॉडो वापरणं उत्तम.
८) कॅण्डी ग्लिटर आयलायनर बाजारात मिळतात. ते ही वेगवेगळ्या रंगात ते वापरा.
९) पीच कलर लिपस्टिक, ग्लॅम शाईन लिपग्लॉस हे कॉम्बिनेशन ओठांसाठी एकदम परफेक्ट.
१0) सी ब्ल्यू काजळ पेन्सिल तर मस्टच.
११) हे सगळं झाल्यावर, गरबा खेळून आल्यावर मेकप काढतानाही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आधी आयमेकप काढा. म्हणजे तो चेहर्यावर पसरत नाही. त्यानंतर मेकप काढा. उत्तम टोनर लावा, रात्री झोपताना एखादी उत्तम हायड्रेटिंग क्रिक लावा. तरच चेहरा चांगला राहील.