कातील अदा

By Admin | Updated: September 19, 2014 15:08 IST2014-09-18T20:00:29+5:302014-09-19T15:08:48+5:30

मग दुसरं काहीही प्लॅन करण्यापूर्वी, एकदा ‘रामलीला’ सिनेमातला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा लूक पाहून घ्या.

Payday | कातील अदा

कातील अदा

>- धनश्री संखे (ब्युटी एक्सपर्ट)
 
गरबा/दांडिया खेळायला यंदा जाणार आहात तुम्ही? ठरलंय पक्कं?  मग दुसरं काहीही प्लॅन करण्यापूर्वी, एकदा ‘रामलीला’ सिनेमातला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा लूक पाहून घ्या. एकदम हॉट, कलरफुल, रस्टिक आणि फुल ऑफ एनर्जी ! ती एनर्जी मॅच करा अगर करू नका, पण तो लूक तुम्ही मॅच करू शकलात तर यंदा नवरात्रीत तुमच्या नावाचे चर्चे असतील !! तसंही सध्या दीपिका पदुकोणचा तो ‘अनडन’, ‘मेसी’ हेअरवाला लूक एकदम चर्चेत आहे ! स्ट्रेटनिंग करकरून सगळ्यांचे केस सारखेच दिसतात, लूकही तसाच साच्यातला दिसतो ! 
पण दीपिका पहा, तिचे केस काहीसे विस्कटलेले, लांबसडक, एका बाजूनं छोटछोट्या बटवेण्या घालून मोकळे सोडलेले केस, नाहीतर सरळ मानेवर गच्चं बांधलेला, तरीही विस्कटलेला अंबाडा.
लांब, घेरदार, रंगीबेरंगी लेहंगे आणि घागरे ! गळ्यात फार काही नाही, पण कानात मात्र मोत्याचे मोठमोठे झुमके आणि नाकात  छोटीशी नथनी ! कातील, एकदम कातील अदा!  हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा नवरात्री लूक एकदम म्हणजे एकदम खतरनाक सुंदर दिसू शकेल! त्यामुळे तुम्ही जर आता तयारीला लागला असाल, रोज उठून गरबा क्लासलाही जात असाल तर त्या स्टेप्स जमवता जमवता आणखी काही गोष्टींचा ताल जमायला हवा ! तो कसा जमवायचा? त्यासाठीच तर या काही एकदम लेटेस्ट हिंट्स. ट्राय इट!!

Web Title: Payday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.