तरुण जगण्याला अकाली पोखरणार्या वाळवीला अटकाव करायचा, निराशेच्या अंधार्या बोगद्यात शिरून भेदायची मरणाची काळीछाया म्हणून आजच्या अंकात एक विशेष चर्चा. आज आंतरराष्ट्रीय आत्महत्त्या प्रतिबंधक दिन. ...
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कार्यालयात एक बाई आल्या. हातातल्या पिशवीत एक अल्बम. तो काढून दाखवत म्हणाल्या, हे माझ्या मुलाचे फोटो. तीन महिने झाले त्यानं आत्महत्त्या केली. घरातच गळ्याला फास लावून घेतला. आणि मी उत्तर शोधतेय की, का त्यानं असं के ...
स्ट्रेस, प्रेमभंग आणि डिप्रेशन या तीन कारणांमुळे आजही तरुण मुलं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करतात. परिस्थितीशी ‘कोप-अप’ न करता आल्यानं स्वत:च्या जिवावर उठतात. ...