शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

रोज नवे पर्याय दिसतात, एक निर्णय कसा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 7:20 AM

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक -2020 ! विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी?-लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

- इरावती सुजाता आनंद

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?

सगळ्यात भारी म्हणजे अभ्यासक्रमात इंटरडिसीप्लिनरिटी येतेय. माझी शैक्षणिक बॅकग्राउंड पॉलिटिकल सायन्सची आहे; पण मी इकोनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, डेटा अ‍ॅनालिटिक्स हे सगळं एकाचवेळी शिकायचा प्रय} करतेय. तेच फार एक्सायटिंग आहे.

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

मला सगळ्यात जास्त स्ट्रेस ‘अनसर्टनिटी’चा, अनिश्चिततेचा येतो. सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे नव्या गोष्टी सतत आयुष्यभर शिकत राहायला लागणार आहेत. ते केलं नाही तर मी ईररिलेव्हंट होण्याचा धोका आहे.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?

माझे मित्र-मैत्रिणी ही एक मस्त सपोर्ट सिस्टीम आहेत. त्यांच्यासह मी मजेत आहे.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? 

ंमाझे स्वतर्‍चे आइबाबा फारच चांगले आहेत; पण त्यांच्या पिढीलाच एकूण फार एक्सपोजर नव्हतं. त्यामुळे त्यांची विचारांची पद्धत फार रिजीड-बंदिस्त झालेली दिसते.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला  ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

दुसरा पर्याय. फार कॉम्प्लिकेटेड आहे.

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? नाही ठरलं माझं. दररोज खूप नवीन-नवीन माहिती येतेय. अशा परिस्थितीत एक्झ्ॉक्ट एकाच करिअरची वाट कशी ठरवता येईल?

7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?

मी परत येईन. इथं माझं ‘घर’ आहे, मला इथं कम्फर्टेबल वाटतं.

8. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?

अभिमान कशाचा वाटतो?- तर भारताच्या घटनेचा!आणि चीड याची येते की, अनेक प्रसंगांत असं वाटतं की, परस्परांच्या वेदना समजून घेण्याची क्षमताच आपण गमावून बसलोय. सहानुभूती, सहवेदना हरवतेय.