शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

नोमोफोबिया

By admin | Updated: April 7, 2017 18:41 IST

दर सेकंदाला फोन वाजल्यावर तुम्ही तुमचा फोन चेक करता का? बराचवेळ फोन वाजला नाही तर तुम्ही मोबाइलकडे पाहात बसता का? मोबाइलमधला दिवा

- जीवाला काच लावणारा एक गंभीर आणि धोकादायक नवाकोरा आजारदर सेकंदाला फोन वाजल्यावर तुम्ही तुमचा फोन चेक करता का? बराचवेळ फोन वाजला नाही तर तुम्ही मोबाइलकडे पाहात बसता का? मोबाइलमधला दिवा जरासाही पेटला की तुम्ही लगेच तो हातात घेता का? तुमच्या फोनची बॅटरी थोडी जरी कमी झाली किंवा बॅटरी पूर्ण संपायला आली की तुम्ही अस्वस्थ होता का किंवा फोन हरवला आहे अशी कल्पना तुम्हाला अस्वस्थ करते का ? तुमचा मोबाइल जराही नजरेआड झालेला तुम्हाला चालत नाही का?या सगळ््या प्रश्नांची उत्तरे जर हो असली तर नक्कीच ही काळजीची बाब आहे. कारण ही सगळी नोमोफोबिया या आजाराकडे वाटचाल होत असल्याची लक्षणे आहेत. नोमोफोबिया म्हणजे नो मोबाइल फोन फोबिया. आपला फोन नाहिसा झाला, तो तुटला किंवा त्याची बॅटरी संपली तर काय होईल? असे वाटून येणारी अस्वस्थता यामध्ये रुग्णाला सारखी त्रास देत असते. मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे वाढलेल्या ताणतणावात्मक आजारांनी तरुणांना घेरण्यास सुरुवात केली आहे. आॅल इंडिया इन्स्टीट्यूट आॅफ इंडिया (एम्स)च्या न्युरॉलॉजी विभागाने केलेल्या अभ्यासातून मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमरची शक्यता १.३३ पटीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इमेल असं एकापाठोपाठ चेक करत बसायचं मग इन्स्टग्राम, टष्ट्वीटर पाहायचे ते संपलं की आणखी काही अ‍ॅप उघडून बसायचं तेवढ्यात कोणीतरी तुम्हाला पिंग करतं, त्याच्याशी चॅट करत बसायचं मध्येच फेसबूकवर आपल्या फोटोवर कोणी कमेण्ट केली ते पाहायचं हे सुरु असताना गाणी ऐकायची आणि रात्री यूट्यूबवर काहीतरी पाहात झोपी जायचं अशी काहीशी जीवनशैली तरुणाईची तयार झाली आहे. माझ्या फेसबुक वॉलवर मित्राने काही कमेंट केली असेल तिला मी लाइक केलं नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही तर अनर्थ होईल अशी नाहक भीती सगळ््यांना त्रास देत राहते. इतकेच नव्हे तर अजून कसं कोणी माझ्या फोटोवर, स्टेटसवर रिअ‍ॅक्ट झालं नाही असा प्रश्न तरुणांना सतावतो आणि मग ते अक्षरश: प्रत्येक सेकंदाला फोन उघडून बसतात. यामुळे फोन त्यांच्या आ़युष्याचा अविभाज्य अंग बनतो आणि त्यामुळेच फोनचे नसणे किंवा फोन नाही ही कल्पनाही त्यांना अस्वस्थ करते. नोमोफोबिया ही संज्ञा सर्वात प्रथम २०१० साली इंग्लंडमधील एका संशोधन संस्थेने तयार केली. त्यांनी केलेल्या अभ्यासाअंती इंग्लंडमधील ५३ टक्के लोकांना आपला फोन हरवला किंवा बॅटरी संपू लागली की अशी अस्वस्थता जाणवत होती. ५८ टक्के पुरुष आणि ४७ टक्के महिलांना या अस्वस्थतेने घेरलेले होते. त्यांच्या आणखी एका अभ्यासामध्ये ५४७ विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के मुलांना नोमोफोबिया होता तर ६४ टक्के मुलांमध्ये नोमोफोबिया होईल अशी भीती दिसून येत होती. या मुलांपैकी ७७ टक्के मुले एका दिवसात ३५ किंवा त्याहून अधिकवेळेस फोन तपासत होते. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार सर्वेक्षण केलेल्या १००० लोकांपैकी ६६ टक्के लोकांना फोन हरवण्याची काळजी वाटत होती.१८ ते २४ वयोगटातील मुलांपैकी ७७ टक्के लोकांना मोबाइलपासून काही मिनिटेदेखिल लांब राहणे असह्य आणि अशक्य वाटत होते. तसेच साधारणपणे ही मुले दिवसभरामध्ये ३४ वेळा फोन चेक करुन पाहात होती तर ७५ टक्के मुले बाथरुममध्येही फोन घेऊन जात होती.नोमोफोबिया कसा ओळखावा ?१) फोनच्या वापरामुळे तुमचा बहुमुल्य वेळ वाया जाऊ लागतो२)तुमच्या वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणानुसार ५१ टक्के लोकांना एक्स्ट्रीम टेक अ‍ॅन्झायटी म्हणजे स्मार्टफोनपासून दूर झाल्यास येणारी अस्वस्थता होती.३) फोनच्या अतिरेकी वापरामुळे तुमची झोप बिघडते, तुम्हाला झोप कमी येते किंवा सतत झोपमोड होते.नोमोफोबिया कमी करण्यासाठी काय कराल?१) झोपण्यापुर्वी एक तासभर आधी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइटस आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. आता दिवसभराचे काम संपले आहे याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.२) गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा टष्ट्वीटरवर आपण रिअ‍ॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.३) फोन पाहण्याच्या वेळा ठरवून ठेवा. आता मी तासभर वाचन करणार आहे किंवा तासाभरानंतरच फोनला हात लावेन असा निर्णय घ्या. तसेच पाचच मिनिटे फोन पाहेन असं ठरवून मगच फोनला हात लावा४) घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही. लहान मुलांपासून फोन दूर ठेवा५) नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा.