शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

साध्या मोबाईलवर सायफाय शॉर्टफिल्म शूट करणारे नायजेरियाचे सिनेमाबहाद्दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 7:10 AM

नायजेरियाच्या कदुना राज्यातील 19-20 वर्षाची मुलं. त्यांच्याकडे ना पैसा आहे, ना टेक्नॉलॉजी, ना सिनेमा बनवण्याचं काही प्रशिक्षण; तरीही ते सायफाय शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत आणि त्या जगभर चर्चेतही आहेत.

ठळक मुद्देत्यांना विश्वास आहे की असा सिनेमा ते लवकरच तयार करतील.  त्यांचं काम या लिंकवर पाहता येईल.

- दीपिका वाघ 

बॉलिवूड-हॉलिवूडमध्ये किती बिग बजेट सिनेमे बनवले जातात. महागडे सेट्स, व्हीएफएक्स वापरून, देश-परदेशात शूटिंग करून रंजक दृश्यं आपल्याला मोठय़ा स्क्रीनवर बघायला मिळतात.पण नायजेरियातील तरु णांना भेटा. तिकडे मागास म्हणवणार्‍या नायजेरियातल्या नॉलिवूडमध्ये काही तरुण आपल्या हातातल्या साध्या तुटक्या- फुटक्या स्मार्टफोनवर सायफाय फिल्म्स बनवत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या फिल्म्सची ऑनलाइन जगात प्रचंड प्रशंसा होते आहे.  नायजेरियाच्या उत्तर पश्चिम भागातील कदुना राज्यातील गॉडविन जोसिया (वय-19) आणि त्याची चुलत भावंडं मिळून सायफाय प्रकारच्या शॉर्ट फिल्म्स बनवतात. सायफाय फिल्म म्हणजे सायन्स फिक्शन फिल्म. या फिल्म्स ते साध्या स्मार्टफोनवर तयार करतात. आजकाल सायफाय फिल्म्स या अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून तयार केल्या जातात; पण या मुलांनी बनवलेल्या फिल्म्स या दररोजच्या वस्तूंचा वापर करून केलेल्या असतात. तुटलेल्या मायक्र ोफोन स्टॅण्डपासून ते ट्रायपॉड बनवतात आणि ते शूटिंगला वापरतात. मागील बाजूस हिरव्या रंगाचे कापड टाकतात. एक ब्लोअरद्वारे हवा निर्माण केली जाते. ज्यामुळे कलाकार हवेतून उड्डाण करू शकतो. शिवाय स्पेशल इफेक्ट्स मिळवण्यासाठी यू-टय़ूब वरच्या अगणित व्हिडीओजची ते मदतही घेतात. त्यांच्यासाठी यू-टय़ूब हीच पाठशाळा आहे. भन्नाट शक्कल काढून ते या सायफाय फिल्म्स बनवतात. गॉडविन म्हणतो की, सोशल मीडियावर फेमस होणं हा आमचा हेतू नव्हता. कदुनामधील मुलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सर्व सर्वांनी बघावं हेच आमचं मुख्य उदिष्ट होतं. हे सर्व अचानक घडलं. आम्हाला वाटलं नव्हतं की लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल.’ दहा मिनिटांच्या त्यांच्या 20 शॉर्ट फिल्म्स या सुपर हिरो, एलियन आणि अलौकिक शक्तींबद्दल आहेत. फिल्म रेकॉर्ड करून ती एडीट करून त्याला स्पेशल इफेक्ट्स देऊन ती अपलोड केली जाते. त्यांच्या ग्रुपमधला रेमंड युसूफ सांगतो की, फिल्म बनवण्याची प्रोसेस खूप वेळखाऊ आहे. आमची पाच मिनिटांची चेस नावाची शॉर्ट फिल्म बनवायला आम्हाला दोन दिवस लागले होते. आमच्याकडे विजेची समस्या गंभीर आहे. न्यूज एजन्सी ऑफ नायजेरियानुसार, कदुना राज्याचे गव्हर्नर नासीर रु फाई यांनी या मुलांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या मुलांच्या ग्रुपमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा युसूफसुद्धा आहे. जो आता काही दिवसात माध्यमिक शाळेत प्रवेश घेईल. ही मुलं पैशांची बचत करून शूटिंगला लागणार्‍या हिरव्या कपडय़ाची खरेदी करतात. या मुलाचं काम बघून नॉलिवूड सिनेमाची निर्माती केमी अडेतीबा इतकी प्रभावित झाली की तिने जून महिन्यात या मुलांच्या कामाबद्दल ट्विट केलं होतं. हे ट्विट व्हायरल झाल्यावर त्यांना लोकांनी देणग्या दिल्या. त्यातून पाच हजार आठशे डॉलर्सची देणगी जमा झाली. यातून त्यांना मोठा सिनेमा बनवायचा आहे. त्यासाठी उपकरणांमध्ये सुधारणा करायची आहे. यापूर्वी असा सिनेमा कुणीही तयार केला नसेल असा सिनेमा त्यांना तयार करायचा आहे. त्यांना विश्वास आहे की असा सिनेमा ते लवकरच तयार करतील. त्यांचं काम या लिंकवर पाहता येईल.

https://youtu.be/D25NrAQZLng

(justrightcinema.com)