लूकिंग जपान टॉकिंग चायना, परदेशी भाषा शिकण्याचं नवं स्किल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 07:00 IST2019-08-08T07:00:00+5:302019-08-08T07:00:13+5:30
भाषा शिक्षणाला महत्त्व आहेच, तुमची डिग्री कोणतीही असो तुमच्याकडे चिनी-जपानीसह एखादी परकीय भाषेचं ज्ञान असेल तर नव्या काळात तुम्हाला संधी जास्त आहे.

लूकिंग जपान टॉकिंग चायना, परदेशी भाषा शिकण्याचं नवं स्किल!
- डॉ. भूषण केळकर
फ्रान्समध्ये गेल्यानंतर"Bon jouv म्हणून सुरुवात केलीत आणि पुढचं सर्व संभाषण इंग्रजीमध्ये केलंत तरी फ्रेंच लोकं तुम्हाला प्रेमानेच वागवतील’’, असा सल्ला तुम्हाला अनेक तज्ज्ञ व जाणकार लोक देतील आणि त्यात सत्यता आहेच. मला तर पुढं जाऊन वाटतं की, "Bon jouv नी सुरुवात केली आणि नंतर हसून मराठीत बोललो तरीही फ्रेंच लोक प्रेमाने वागवतील. विनोदाचा भाग सोडा; पण भाषेमध्ये जोडण्याची ताकद आहे तर खरंच !
मागील एका लेखमालेत आणि मागील आठवडय़ातील लेखात भाषाप्रभुत्व यातला आपण संवाद केला. त्याला उत्तम प्रतिसादपण होता आणि अनेक विद्याथ्र्याचे काही प्रतिनिधिक प्रश्नपण होते म्हणून तोच भाषाप्रभुत्व हा विषय आजच्या संवादला जरा पुढे नेऊ.
त्यानिमित्ताने मला तुम्हाला दोन घटना सांगू देत, की ज्यामुळे विशेषतर् विद्यार्थीवर्गाला हे लक्षात येईल की, परकीय भाषा शिकणं हे अत्यंत उपयुक्त ठरते.
माझा एक मित्र कॉमर्सला होता आणि बराच वेळ मोकळा असतो. म्हणून जपानी भाषा शिकला आणि ती भाषा खूप आवडली म्हणून त्याने बर्याच पातळ्या पार केल्या आणि केवळ बी.कॉम. झालेला हा माझा मित्र अमेरिकन कंपन्यांच्या जपान व सिंगापूरच्या ऑफिसेसमध्ये महत्त्वाची पदं भूषवतो आहे.
पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील एक मुलगी इंजिनिअरिंगमध्ये खूप विशेष प्रगती नव्हती; पण सेकंड क्लास नीट मिळाला होता. वर्गात साधारण समजली जात असल्यानं कॅम्प्समध्ये तिची निवड झाली नाही. परंतु तिने इंजिनिअरिंगच्याच पहिल्या वर्षापासून JLPTची म्हणजे जपानी भाषेची तयारी केली होती व त्यातील N3' या पातळीर्पयत पोहोचल्यामुळे तिला थेट जपानमधील क्योतो या शहरात नोकरी मिळाली आहे आणि तिच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींच्या चौपट पगार तिला सहज मिळणार आहे !
माझं तुम्हाला सांगणं आहे की, यापुढच्या काळात जर्मन व फ्रेंच या बरोबर किंवा मी तर म्हणीन काकणभर अधिकच म्हणून चिनी वा/आणि जपानी भाषा तुम्ही शिकावीत. तुम्हीच विचार करा की, तुमच्या आजूबाजूला जर्मन-स्पॅनिश फ्रेंच भाषा येणारे किती आहेत आणि चिनी-जपानी येणारे किती आहेत ! तुमच्या लक्षात येईल की जर्मन-फ्रेंचपेक्षा तुम्हाला चिनी भाषेचा प्रभाव वाढता आहे आणि जपानी भाषा येत असेल तर जपानमध्ये नोकर्या उत्तमरीतीने उपलब्ध आहेत. मागणी आणि पुरवठा यांच्या गणितात चिनी-जपानी भाषेची बाजू भरभक्कम होत जाणार आहे असं वाटतं.
अगदी ‘इंडस्ट्री 4.0’च्या म्हणजे तंत्रज्ञान वेगात बदलत असणार्या काळातसुद्धा अगदी गूगल ट्रान्सलेट किंवा NLP च्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातसुद्धा भाषाप्रभुत्व उपयुक्त ठरेलचं.
तंत्रज्ञानाचा वापर - विशेषतर् ज्याला अॅलमेंटेड रियालिटी- व्हच्यरुअल रिअॅलिटी व मिक्स्ड रिअॅलिटी म्हणतात त्याने आमूलाग्र बदल होतील याची जाणीवपण ठेवू. एका महिलेची हुबेहुब ँholographic प्रतिमा; तिला माहिती नसणार्या जपानी भाषेत तिचे भाषण कसे सादर करते आहे आणि जग कुठे चालले आहे. हे तुम्ही बघून ठेवणेपण आवश्यक आहे.
चिनी भाषा शिकणं महागडं आहे हे मला मान्य आहे; परंतु तुम्ही HSK3 व HSK34 या पातळ्यांर्पयतPeking University चा Coursera.org या वेबसाइटवरील विनामूल्य शिक्षणाचा लाभ घेऊ शकता, जगात कुठंही राहून हे करता येणं शक्य आहे.