beauty ट्रिटमेण्ट कुठली कराल?घाई म्हणा किंवा अज्ञान, अतीच सुंदर दिसण्याचा हव्यास आणि त्यात होणार्या चुका यामुळे दरवर्षी अनेक मुली ( मुलंही बरेचदा) काही गोष्टीत हमखास चुकतात आणि मग ऐन नवरात्रीत पस्तावतात!
नवरात्रीपूर्वी बर्याच जणी पार्लर गाठतात, ब्यूटी ट्रिटमेण्ट करून घ्यायला. पार्लरमध्ये प्रचंड गर्दी. बहुतांश मुली नवरात्रीत ब्यूटी ट्रिटमेण्ट करतातच. फेशियलपासून स्पापर्यंत अनेक गोष्टी होतात. मात्र आपण नक्की काय करायचं हे माहिती नसेल तरकाही चुका होतात. अनेकदा ब्यूटी ट्रिटमेण्ट चांगली नाही झाली तर त्वचेला त्रासही होऊ शकतो.
ते सारं टाळून तुम्ही योग्य ब्यूटी ट्रिटमेण्ट्स कशा करायच्या?
फॅशनेबल काय हे समजून घेतानाच, हेल्दी काय हेही कसं लक्षात ठेवायचं?
त्यासाठीच याकाही प्री-नवरात्री ब्यूटी टिप्स.
एकतर नवरात्रीचा हा सिझन एकदम मस्त असतो. आल्हादायक, ऋतू बदलत असतो. त्यामुळे ब्यूटी ट्रिटमेण्ट करूनच घेणार असाल तर फक्त दांडिया,गरबापुरता विचार करू नका. परफेक्ट ब्यूटी ट्रिटमेण्ट करून घ्यायचा, आरोग्यदायी उपचार करून घ्यायचा विचार करा. गरबा/दांडियाला जाताना तुम्ही कोणते कपडे घालणार, कुठले दागिने घालणार, याचाही ब्यूटी ट्रिटमेण्ट करताना विचार करा.
या काळात अनेकजणी बॉडी मसाज आणि स्पा करून घेतात. स्पा ट्रिटमेण्ट घेताना जी तेलं वापरली जातात त्यानं रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. मसल टोन सुधारतो. तुमची एनर्जीही वाढायला मदत होते. एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे करणार असाल तर बॉडी मसाज करून घ्या.
अनेक मुली या काळात मोठय़ा गळ्याचे ब्लाऊज घालतात. बॅकलेसही घालतात. त्यांनी बॅक पॉलिशिंग करून घ्यायला हवं.
मुलींनीच नाही तर मुलांनीही चांगल्या प्रतीचं फेशियल करून घ्यायला हवं. त्यानं स्कीन रिहायड्रेट होते, त्वचेला तजेला येतो.
अरोमा फेशियल आणि स्कीन ब्राईटनिंग उपचारही अनेकजणी करतात. ते करायला हरकत नाही. त्यानं रिलॅक्सेशन मिळतं. पण हर्बल फ्लोरल अरोमा फेशियल करा. त्याचा जास्त उपयोग होईल.
याकाळात जास्त लिक्वीड, फ्रूट ज्युस घ्या. त्यानंही तुमची एनर्जी वाढेल, बॉडी क्लिंझिंगलाही मदत मिळेल.
फेशियलबरोबरच अनेकजणी मेहंदी आणि टॅटू बनवतात. मात्र तेही खात्रीशीर ठिकाणी करा. केमिकलचा त्रास होऊ नये. टेम्पररी टॅटू करून घेणार असाल तरी ते करतानाही तज्ज्ञाकडून करून घ्या.
इंडोअरेबिक मेहंदी डिझाईन्स आणि ग्लीटर हीना हे नवरात्रीतल्या घागरा-लेहंग्याबरोबर मस्त दिसतं. यंदा ते वापरून पहा.
पाठीवर, हातावर, मानेवरही टॅटू करून घेता येऊ शकतो. परमनण्ट की टेम्पररी हा निर्णय तुमचा.
मात्र हे सगळं करताना जरा जपून, खात्री करून आणि शांतपणे करा. शेवटच्या क्षणी धावपळ करू नका.