शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

मॉन्सून डलनेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:00 AM

मळभ येतंच या काळात, पण ते आपल्या मनावर येऊ नये म्हणून काय करता येईल?

- नितांत महाजन

ऋतू बदलतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमी असं भरून आल्यासारखं, रिझल्टची धाकधूक असल्यासारखं, टेन्शन आल्यासारखं वाटतं. उकाडाही असतो आणि मळभ दाटून येऊन पाऊस कधीही येईल याची एक आसवजा धास्तीही असते. म्हणून याकाळात मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. एकदम उदास वाटतं. आळसही येतो. अनेकदा एकदम डिप्रेस वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतिभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे. आता आपण त्या साऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.त्यावर उपाय काय?उपाय म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो.

१) व्हिटॅमिन डीआपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्री-पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरं तर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरून या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्त्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्त्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या.

२) प्रो बायोटिकफार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाºया हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्या-ताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नास्तयात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंकझिंक सप्लिमेण्ट प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनुका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानं झिंक सप्लिमेण्टची औषधं घेऊ शकतात.

४) आयर्नलोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पीठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरं तर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नास्ताहा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नास्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नास्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर. याकाळात अ‍ॅडमिशनची धावपळ असते तेव्हा घरातून निघतानाच भरपेट नास्ता आणि सोबत घरचा जेवणाचा डबा असणं उत्तम. एवढं केलं तरी आपण पावसाच्या स्वागताला सज्ज होतो.