शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

लव्ह बाइट्स शहरातल्या तारुण्याची मॉडर्न लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:11 PM

ती घरातून बाहेर पडली. तिच्या सोसायटीच्या जवळच्या गल्ल्यागल्ल्यातून फिरत चालली होती. पायांना दिशाच नव्हती तिच्या. मेंदूच्या कुठल्याच सूचना तिच्या पायापर्यंत पोहोचत नव्हत्या. सवयीचं होत गेलेलं चालणं तेवढं होतं.

- श्रुती मधुदीप

पंधरा दिवसातनं एकदा..ओपन रिलेशनशिपमध्ये रहायचंम्हणजे त्याचा हात धरायचा.पण कुठल्याही क्षणी तो सुटू शकेलयाची तयारी ठेवायचीकिंवा तो माझा आहे असं म्हणायचं;पण नसू शकतोहे मनाशी पक्कंहे कसं जमावं?ती घरातून बाहेर पडली. तिच्या सोसायटीच्या जवळच्या गल्ल्यागल्ल्यातून फिरत चालली होती. पायांना दिशाच नव्हती तिच्या. मेंदूच्या कुठल्याच सूचना तिच्या पायापर्यंत पोहोचत नव्हत्या. सवयीचं होत गेलेलं चालणं तेवढं होतं. गल्ल्यांना ‘बाय बाय’ करत ती मेनरोडवर केव्हा येऊन पोहोचली हे तिला कळलंसुद्धा नाही. रस्ता तिला आ वासून पहात होता; पण तिला त्याची काहीच फिकीर नव्हती. फिकीर न करायला, रस्ता तिच्याकडे पहातोय हेदेखील तिच्या ध्यानीमनी नव्हतं. ती नक्की कुठं चालली होती हे तिचं तिलाच ठाऊक नव्हतं. कुठल्याही क्षणी तिचं आभाळ कोसळलं असतं. हे आख्खं शहर, संध्याकाळच्या या स्ट्रीट लाइट्स सारे सारे तिच्या रडण्याचे साक्षीदार झाले असते. हळूहळू तिचं वेगवान चालणं मंदावलं, जणू या धिम्या पावलांनी तिला विचार करायचीच स्पेस दिली... आणि ती नकळतपणे त्याला आठवू लागली.त्याचं खुलणारं लख्ख हसू, हसण्यामुळे डोळ्यांभोवती होणारे छोटेसे वक्र , त्याची भुवया उडवायची नेहमीची पद्धत, काहीही झालं की तिच्या डोक्यावर हात ठेवणारा तो नि त्या हाताच्या स्पर्शानं आश्वस्त होणारी ती. आश्वस्त व्हायला आधाराचा असा तोच तिच्या आयुष्यात आहे, असं नव्हतं खरं तर. किती किती माणसं होती तिची अशी ! तिचं घर, तिचे जवळचे मित्रमैत्रिणी, असे कितीतरी लोक ! पण का कुणास ठाऊक चित्रकलेच्या एका वर्कशॉपमधे भेटलेला तो तिला खूप जवळचा, तिचा वाटत होता. तिचा म्हणजे नेमका कसा ते तिलाही कळत नव्हत; पण त्याच्या हावभावातला, वागण्या-बोलण्यातला सच्चेपणा, चित्रकलेविषयीची ओढ, माणसांच्या जगण्यातून निर्माण होणारी त्याची चित्रकलेची भाषा हे आणि यापल्याडही खूप काही तिला तिचं वाटतं होतं. तिच्या खूप खूप जवळचं ! आतलं !पण.. पण आज हे नक्की काय होतंय हे तिचं तिलाही समजत नव्हतं. मेंदू काम का करत नव्हता तिचा, ती का इतकी भावुक होत होती. पावलं अशी वेडीवाकडी का पडतायत आपली, आपल्या परवानगीविना, हे तिचं तिलाच समजेना. घट्ट बांधून ठेवावं स्वत:ला तर तसाही तिचा स्वभाव तिला करू देईना. बेभानपणे पावलांना हवं तसं जाऊ द्यावं तर ते बुद्धीला गहाण टाकल्यासारखं तिला वाटू लागलं. नि त्यामुळं ती अडकून पडली होती. पुन्हा पुन्हा तिला तो आठवू लागला. त्याला भेटावं आणि घट्ट मिठी मारून सारं काही व्यक्त होऊन जावं असं तिला वाटू लागलं. आणि म्हणून तिने तिचा मोबाइल फोन नकळत जीन्सच्या खिशातून बाहेर काढला. व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून तिने पाह्यलं तर त्याचं लास्ट सीन सहा वाजून पंधरा मिनिटांचं होतं आणि तिने त्याला मेसेज पावणेसहाला केला होता. Bhetuya?पण त्यानं या मेसेजला रिप्लाय केला नव्हता. हे पाहून तिला रडू कोसळणार इतक्यात तो आॅनलाइन आला. Typing....  असं पाहून तिला हायसं वाटलं.'ag mala Swarala bhetayala jayachay. Ti aaj ragavaliye mazyavar. Chitrat itaka gurfatatos ki mala tu kadhihi visarun jashil, as hanate ti gamatit. Pan aaj jam ch chidaliye ti mazyavar...असा त्याचा रिप्लाय आणि त्यापुढे आलेली स्माइली पाहून तिने गिळलेले अश्रू सरर्कन तिच्या गोबºया गालांवरून घरंगळले आणि काही सेकंद फोन हॅँग व्हावं तशी ती हॅँग झाली. तिनं फोन खिशात ठेवला आणि आता ती जरा जास्तच वेगानं चालू लागली. तिच्या घरापासून किती दूर आली होती ती !खरं तर तिने हॅँग व्हावं असं काहीच नव्हतं. सारं काही आधीपासूनच क्र ीस्टल क्लीअर होतं. चित्रकलेच्या वर्कशॉपमध्ये तो तिचा चांगला मित्र झाला हे खरंच होतं. पण वर्कशॉप संपल्या संपल्या दाराबाहेर त्याची वाट पहात उभ्या राहिलेल्या स्वराला तिने कितीदा तरी पाहिलं होतं. नुसतं पाहिलं नाही. स्वराशीही तिची चांगली नाही; पण मैत्री झाली होती. नव्हे नव्हे तिने त्या दोघांना एकमेकांच्या नावावरून छेडलंही होतं. पण का कुणास ठाऊक त्याच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीत तिला तिच्या स्वप्नातल्या चित्रातला ‘तो’ सापडतोय असं वाटायचं. कधी कधी भावासारखा आहे म्हणून तो हवाहवासा वाटायचा, कधी खोडील मित्र म्हणून जवळचा वाटायचा आणि कधी कधी तर ! आता तिचे डोळे डबडबले. कुठल्या वाटेने जावं ? कुणीतरी हात धरून तिला घेऊन जावं असं तिला वाटू लागलं. आजूबाजूच्या गाड्या, रहदारीपण डबडबल्या डोळ्याच्या लेन्समधून ब्लर दिसू लागली.तिला त्याच्याविषयी इतकं काय काय वाटतंय, हीच एकमेव अडचण नव्हती खरं तर. त्यादिवशी तिचं चित्र पाहून तोही अक्षरश: वेडा झाला होता. तिच्या डोळ्यातली निरागसता पाहून त्यालाही ती त्याची वाटली होती. त्यानं तिच्यापाशी कबूल केलं होतं की, ‘‘माझ्या आयुष्यातली न सांगता येणारी; पण महत्त्वाची जागा घेतलीयेस तू. मी कधीच विसरू नाही शकणार तुला.’’त्यावेळी त्याचे ते शब्द ऐकून ती वेडी झाली होती. या आनंदाच्या भरात काय करू आणि काय नाही असं झालं होतं तिला. ‘किती अपेक्षाविरहित प्रेम करतेस तू ! किती खरीखुरी आहेस ! मला कौतुक वाटतं तुझं !’’ तो तिला एकदा म्हणाला होता. तिच्या ओठांवर हसू मावत नव्हतं. पण जेव्हा परवा दिवशी वर्कशॉपनंतर तिने त्याची वाट बघणाºया स्वराला दारापाशी पाहिलं तेव्हा तेव्हा ती खरी आतून हालली. अपेक्षाविरहित प्रेम करणं अशक्यच वाटलं तिला ! आतून खर्रकन काहीतरी ढासळून पडल्यासारखी ती कोसळून गेली.आणि तिला तिच्या मैत्रिणीची, समीराची आठवण आली. समीरा नेहमी म्हणायची की, मी ओपन रिलेशनशिपमध्ये राहीन. हे समीराचं वाक्य आठवून तिच्या पोटात खड्डा पडला. गलबलूनच आलं तिला. म्हणजे ओपन रिलेशनशिपमध्ये रहायचं म्हणजे त्याचा हात धरायचा. पण कुठल्याही क्षणी तो सुटू शकेल याची तयारी ठेवायची किंवा तो माझा आहे असं म्हणायचं; पण नसू शकण्याच्या शक्यतेच्या तयारीत? आता पुन्हा तिला तिचा रस्ता सापडत नव्हता. आक्रं दून रडावं. साºया जगाला ओरडून आपलं दु:ख सांगावं असं तिला वाटू लागलं ! हमसून हमसून ती रडू लागली. येणारे जाणारे लोक उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागले; पण कुणालाच ती समजू शकणार नव्हती. म्हणून तिने तिचे डोळे पुसले. जाणाºया येणाºया माणसांच्या तिच्यावर रोखलेल्या नजरांना तिने ‘बाय’ केलं. आणि व्हॉट्सअ‍ॅप उघडून तिने त्याच्या त्या मेसेजवर एक गोड स्माइली पाठवली.आता आपण घरी जायचं हे तिने ठरवलं !