मनालाही बाऊ होतोच.

By Admin | Updated: October 31, 2014 14:39 IST2014-10-30T19:50:56+5:302014-10-31T14:39:47+5:30

मला काय झालंय? माझं मन था-यावर आहे, मानसिक आरोग्य एकदम ठणठणीत! असं म्हणता तुम्ही, पण खरंच तसं असतं का?

Mind too | मनालाही बाऊ होतोच.

मनालाही बाऊ होतोच.

संज्योत देशपांडे

मला काय झालंय? माझं मन था-यावर आहे, मानसिक आरोग्य एकदम ठणठणीत! असं म्हणता तुम्ही, पण खरंच तसं असतं का?
--------------
तंदुरुस्त  मन नेमकं असतं कसं, ही घ्या यादी.
 
जागतिक मानसिक आरोग्यदिन साजरा’ अशा बातम्या तुम्ही काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रत वाचल्या असतीलही. पण याची नोंद कितीजणांनी घेतली? ‘मानसिक आरोग्य दिन’ नावाचा असा काही दिवस असतो हे तरी कितीजणांना माहिती असतं?
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘मानसिक आरोग्य’ म्हणजेच मनाचं आरोग्य सांभाळायला हवं हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. 
गेले काही महिने आपण विविध भावनांविषयी संवाद साधत आहोत. अनेकजण विचारतात की, या भावना आहेत हे समजलं, पण त्यांचा तोल सांभाळणं जमत नाही तर काय करायचं? 
तो ‘बॅलन्स’ जमणं हादेखील मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. पण त्याचसोबत मानसिक आरोग्याचे अजून काही निकष आहेत तेसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅरोल राइफ या मानसतज्ज्ञाने आणि त्यांच्या सहका:यांनी मानसिक आरोग्याचे काही निकष ठरवले आहेत.
 
स्वत:चा स्वीकार 
‘स्वीकार’ म्हणजे काय? स्वत:ला स्वीकारायचं म्हणजे काय करायचं? असा विचार आपण बरेचदा करतो. पण स्वीकार या टप्प्याआधी एक गोष्ट येते ती म्हणजे स्वत:बद्दल जाणीव निर्माण करण्याची ! जाणीव कसली तर स्वत:च्या क्षमतांची आणि मर्यादांची. ही जाणीव निर्माण झाली की, स्वत:चा विनाशर्त स्वीकार करणं फार महत्त्वाचं. आपण आहोत हे असे आहोत हे मान्य करणं. तसं केलं तरच आपण स्वत:कडं ेसकारात्मक पद्धतीने पाहू शकतो. स्वत:वर प्रेम करू शकतो. त्याचबरोबरीने स्वत:मध्ये सकारात्मक बदलही प्रयत्नपूर्वक करणं शक्य होतं. असं करणा:या माणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा गंड (न्यूनगंड अथवा अहंगड) आढळत नाही. अशाच व्यक्तींचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले स्वत:चा आहे तसा स्वीकार महत्त्वाचा. 
हे निकष लावा स्वत:ला आणि तुम्हीच ठरवा की, तुमचं मानसिक आरोग्य किती चांगलंय?
 
स्वत:चा विकास 
मानसिक आरोग्य सुदृढ असणा:या व्यक्ती नेहमीच स्वत:च्या विकासाबाबत जागरूक असतात. आपल्याला येणा:या चांगल्या-वाईट अनुभवातून काही शिकण्याची त्यांची तयारी असते. नव्या गोष्टींना, नव्या अनुभवांना, नवीन आव्हानांना सामोरे जायला ते तयार असतात. त्यांच्या विचारांमध्ये लवचिकता असते. त्यांचे विचार हट्टी, दुराग्रही, ताठर भूमिका असणारे नसतात. त्यामुळे ते त्यांच्यात आवश्यकतेनुसार बदल घडवून आणू शकतात. स्वत:चे विचार, भावना याची जबाबदारी ते स्वीकारतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला सामोरं जाताना ते पॉङिाटिव्ह विचार करतात, स्वत:त बदल करून सुधारणाही करतात.
 
आयुष्य? जगतो कशासाठी?
ज्यांचं मानसिक आरोग्य निरोगी असतं ते नेहमीच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्याला अर्थ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचं याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता असते. आपल्या ‘असण्यानं’ अवतीभोवतीच्या जगात काहीतरी गुणात्मक बदल व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ‘दे वॉण्ट टू मेक अ डिफरन्स’. त्यामुळे त्यांचं आयुष्य भरकटत नाही. आपलं ध्येय गाठण्यासाठी स्वत:मध्ये काही कौशल्य निर्माण करण्याची त्यांची तयारी असते. अडथळ्यांना सामोर जायची हिंमत असते. आपलं ध्येय ते चिकाटीनं गाठतातच. 
 
लाईफ इन कण्ट्रोल
स्वत:च्या कार्यक्षमतेवरचा सुयोग्य विश्वास आणि त्या कार्यक्षमतेचा उत्तम वापर हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा निकष ! कोणत्याही गोष्टीत पुढे जायचं असेल, काही साध्य करायचं असेल तर आपली रोजच्या जगण्यावर पकड असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली जीवनशैली योग्य ठेवणं, आपण राहत असलेल्या, वावरत असलेल्या जागांची योग्य व्यवस्था करणं हेही यात महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य निरोगी असणा:या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यावरच्या नियंत्रणाची योग्य जाणीव असते. ते गोष्टी पक्क्या आवाक्यात ठेवतात.
 
स्वयंपूर्णता 
मानसिक पातळीवर निरोगी असणा:या व्यक्ती ख:या अर्थाने स्वयंपूर्ण असतात. सातत्याने इतरांवर अवलंबून न राहता जबाबदारी घेऊन काम करण्याची त्यांची तयारी असते. त्यांचा त्यांच्या विचारांवर, मूल्यांवर विश्वास असतो. त्यांचं मन निर्भय असतं. स्वत:सह इतरांच्या मताचा ते आदर करतात.
 
इतरांशी ‘पॉझिटिव्ह’ रिलेशन
इतरांशी उत्तम नातं असणं, प्रेमानं नाती जोडणं, जपणं हे मानसिक आरोग्याचं आणखी एक लक्षण. ही नाती जोडताना ते स्वत:च्या व इतरांच्या हिताची योग्य ती काळजी घेऊ शकतात. त्यात समतोल साधू शकतात. नातं जोडताना अपेक्षित असणारी संवेदनशीलता, तरलता त्यांच्यामध्ये असते. आपल्या जगण्यातलं नात्याचं महत्त्व ते जाणतात. ही नाती, आपण जोडलेली माणसं आपल्या जगण्यात ऊर्जा निर्माण करतात याची त्यांना जाण असते.
----------------
उत्तम मानसिक आरोग्य हवंय? -हे नक्की करा!
1) स्वत:च्या मनाकडे लक्ष द्या. त्यातले चढ-उतार समजून घ्या. 
2) स्वत:च्या मनाशी बोला. मन काय सांगतंय ते लक्षपूर्वक ऐका.
3) आपले हट्टी, दुराग्रही विचार, दृष्टिकोन तपासून पहा. त्यात बदल करण्याचा प्रयत्न करा. आपलंच खरं असं कधीच नसतं.
4) स्वत:शी जरा प्रेमानं वागा, तुमच्या गुणांचं तुम्हीच कौतुक करा. 
5) त्रस देण्याचा भावनांची, अडथळा निर्माण करणा:या विचारांची, वारंवारता तपासून पहा. त्या नीट हाताळा, कुठल्याच गोष्टीचा अतिबाऊ करू नका.
6) स्वत:च्या मनाला व्यक्त होण्याची मुभा द्या. जिवाभावाच्या माणसांशी बोला. लिहा, पण व्यक्त व्हा.
7) योग्य आहार, व्यायाम, कामं वेळच्यावेळी करण्याची सवय लावा स्वत:ला.
8) अडचण वाटल्यास न लाजता समुपदेशकाची मदत घ्या. डॉक्टरकडे जा.

 

Web Title: Mind too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.